एक्स्प्लोर

भाजपशासित राज्यांमध्ये शेतकऱ्यांना मिळणार 12 हजार? बाकीच्या राज्यांमध्ये काय होणार? 

भाजपशासित राज्यांमधील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण या राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला आता 12 हजार रुपये मिळण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

Agriculture News : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या (Farmers) आर्थिक विकासासाठी अनेक योजना राबवत आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या सर्वात मोठ्या योजनांमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे (PM kisan samman nidhi scheme) नाव अग्रस्थानी आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी (Farmers) बांधवांच्या खात्यावर पैसे पाठवले जातात. या योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. हे पैसे तीन टप्प्यात शेतकऱ्यांना मिळतात. दरम्यान, या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

राजस्थानमध्ये पंतप्रधान मोदींचे आश्वासन (PM Modi)

पीएम किसान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आता वर्षाला 12 हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका जाहीर सभेला संबोधित करताना सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेच्या लाभार्थ्यांना 12,000 रुपये दिले जातील, असे सांगितले होते. याशिवाय, पीएम पीक खरेदी आणि एमपीसीवर बोनस देण्याबाबतही बोलले होते. अशा परिस्थितीत आता ज्या राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे तेथील शेतकऱ्यांना 12 हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे. 12 हजारांपैकी 6 हजार रुपये केंद्र आणि 6 हजार रुपये राज्य सरकार देणार आहेत.

आतापर्यंत PM किसानचे एकूण 15 हप्ते जारी

आतापर्यंत पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात तीन हप्त्यांमध्ये पोहोचते. योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण 15 हप्ते जारी करण्यात आले आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार आता भाजपशासित राज्यांतील शेतकरी बांधवांना वर्षाला 12,000 रुपये मिळू शकतात. तर बिगर-भाजपशासित राज्यांमध्ये शेतकऱ्यांना 12,000 रुपये मिळणे इतके सोपे राहणार नाही. अहवालानुसार, या राज्यांमध्ये केंद्र सरकारने दिलेल्या रकमेव्यतिरिक्त अतिरिक्त निधी देण्याची तयारी राज्य सरकारने दाखवणं गरजेचं आहे. 

शेवटचा हप्ता कधी मिळाला होता? 

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 15 वा हप्ता हा नोव्हेंबर रोजी मिळाला होता. झारखंड दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये योजनेअंतर्गत 15 व्या हप्त्याचे पैसे हस्तांतरित केले होते. शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती सुधारणे आणि त्यांना समृद्ध करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

वाढीव निधी देताना या गोष्टी विचारात घेतल्या जातील 

राज्याची आर्थिक स्थिती
शेतकऱ्यांप्रती राज्य सरकारची कटिबद्धता 
राज्यातील शेतकऱ्यांची संख्या

महत्त्वाच्या बातम्या:

तुमच्या खात्यात PM किसानचे पैसे जमा झाले का? झाले नसतील तर करा 'हे' काम अन्यथा....

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah : आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8PM 18 December 2024Mumbai Boat Accident Report : मुंबई बोट अपघातानंतर काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं हळूहळू सगळं सांगितलंMumbai Speed Boat  : रेस्क्यू ऑपरेशन संपलं,  तीन बेपत्ता प्रवाशांचा युद्धपातळीवर शोध सुरुMumbai Boat Accident : ...जेव्हा डोळयासमोर मृत्यू उभा राहतो! मुंबई बोट अपघाताची संपूर्ण कहाणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah : आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
Embed widget