अदानी आणि रामदेव बाबांच्या कंपनीचा IPO येणार, या महिन्यात कमाईची उत्तम संधी
गेल्या वर्षीच्या तेजीनंतर या वर्षीही कंपन्यांकडून चांगली रक्कम उभारण्याची अपेक्षा आहे. या महिन्यात देशातील गौतम अदानी यांची कंपनी Adani Wilmar, बाबा रामदेव यांची कंपनी Ruchi Soya यांचा IPO येणार आहे.
Latest IPO News: गेल्यावर्षी शेअर बाजार आयपीओ गजबजून गेला होता. कारण गेल्या वर्षा असे काही IPO आले की गुंतवणूकदारांची जबरदस्त कमाई झाली. मात्र, गुंतवणूकदारांची कमाई लुटणारे अनेक आयपीओ आले. पण एकूण आयपीओ परताव्याची सरासरी पाहिल्यास २०२१ वर्ष नफ्याचे ठरले. या वर्षीही शेअर बाजार आयपीओने गजबजणार आहे. या वर्षी अनेक मोठ्या कंपन्यांचे आयपीओ पाइपलाइनमध्ये आहेत. गेल्या वर्षीच्या तेजीनंतर या वर्षीही कंपन्यांकडून चांगली रक्कम उभारण्याची अपेक्षा आहे. या महिन्यात देशातील दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांची कंपनी Adani Wilmar, बाबा रामदेव यांची कंपनी Ruchi Soya (Ruchi Soya IPO) यांचा IPO येणार आहे. याशिवाय गो एअरलाइन्स आणि एलआयसीसारखे मोठे आयपीओही येतील. Mobikwik चा IPO देखील याच महिन्यात येणे अपेक्षित आहे. ESAF Small Finance Bank Limited आणि Traxon Technologies चा IPO देखील लवकरच येईल.
Adani Wilmar IPO
अदानी विल्मरचा आयपीओ या महिन्यात येणार आहे, जो सुमारे 4500 कोटी रुपयांचा असेल. अदानी विल्मार ही अदानी समूहाची बाजारातमधली लिस्टेड होणारी सातवी कंपनी असेल. अदानी विल्मर आयपीओ ही पूर्णपणे नवीन इश्यू असेल. कंपनी आयपीओमधून उभारलेल्या पैशाचा वापर कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी करेल.
Adani Wilmar Company
अदानी विल्मर कंपनी प्रसिद्ध फॉर्च्यून ब्रँड खाद्यतेलाचे उत्पादन करते. ही कंपनी तांदूळ, सोयाबीन, बेसन, डाळी, भाजीपाला, खिचडी, साबण, मैदा, साखर यासह डझनभर वस्तू तयार करते. बहुतेक वस्तू फॉर्च्युन शाखेच्या नावाखालीच बाजारात विक्रीला येतात. अदानी विल्मार कंपनीची स्थापना 1999 मध्ये अदानी समूह आणि सिंगापूरस्थित कंपनी विल्मार कंपनीसोबत संयुक्त उपक्रम म्हणून करण्यात आली. दोन्ही कंपन्यांची हिस्सेदारी 50-50 टक्के आहे.
अदानी विल्मारकडे खाद्यतेलाच्या बाजारपेठेत देशातील सर्वात मोठे डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क आहे. या कंपनीचे देशभरात 85 स्टॉक पॉइंट आणि 5000 डिस्ट्रीब्यूटर्स आहेत. किरकोळ बाजारात त्याचा वाटा सुमारे 10 टक्के आहे. त्याचे उत्पादन देशभरातील सुमारे 15 लाख रिटेल आउटलेट वर उपलब्ध आहे.
Ruchi Soya FPO
बाबा रामदेव यांची कंपनी रुची सोया फॉलो ऑन पब्लिक ऑफरिंग (FPO) लाँच करणार आहे. रुची सोयाचे प्रमोटर्स त्यांचे स्टेक कमी करण्यासाठी 4,300 कोटी रुपयांचा FPO आणत आहेत. रुची सोयामध्ये प्रमोटर्सची 98 टक्के हिस्सेदारी आहे आणि नियमांनुसार, सूचीबद्ध अर्थात लिस्टेड कंपन्यांच्या प्रमोटर्सनी कंपनीमध्ये 75 टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा ठेवू नये.
FPO म्हणजे काय
जेव्हा एखादी कंपनी आधीच शेअर बाजारात लिस्ट झालेली असते आणि जर ती अधिक निधी उभारण्यासाठी तिची शेअर्स बाजारात विकत असेल तर त्याला फॉलो-ऑन पब्लिक ऑफरिंग म्हणतात. FPO लाच सार्वजनिक ऑफर (पब्लिक ऑफर) देखील म्हणतात.