मोठी बातमी! अदानी समुहानं केली 'या' मोठ्या कंपनीची खरेदी, 10422 कोटींचा व्यवहार
अदानी समुहानं आणखी एक मोठा व्यवहार केला आहे. अदानी ग्रुपच्या (Adani Group) अंबुजा सिमेंटने पेन्ना सिमेंट (Penna Cement) इंडस्ट्रीज लिमिटेड खरेदी करण्याची घोषणा केली आहे.
Adani Group Ambuja Cement News: उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या अदानी समुहानं आणखी एक मोठा व्यवहार केला आहे. अदानी ग्रुपच्या (Adani Group) अंबुजा सिमेंटने पेन्ना सिमेंट (Penna Cement) इंडस्ट्रीज लिमिटेड खरेदी करण्याची घोषणा केली आहे. अंबुजा सिमेंटने पेन्ना सिमेंटमधील 100 टक्के हिस्सा 0422 कोटी रुपयांना विकत घेतला आहे. यामुळं आता अंबुजा सिमेंटची वार्षिक सिमेंट उत्पादन क्षमता 14 दशलक्ष टनांनी वाढून वार्षिक 89 दशलक्ष टन झाली आहे.
दरम्यान, अंबुजा सिमेंटने स्टॉक एक्स्चेंजकडे नियामक फाइलिंगमध्ये या कराराची माहिती दिली आहे. कंपनीने आपल्या फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, 13 जून 2024 रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत पेन्ना सिमेंट इंडस्ट्रीज लिमिटेड (PCIL) मधील 100 टक्के हिस्सा खरेदी करण्यास कंपनीच्या संचालक मंडळाने सहमती दर्शवली आहे. अंबुजा सिमेंट पेन्ना सिमेंटचे सध्याचे प्रवर्तक पी प्रताप रेड्डी आणि त्यांच्या कुटुंबाकडून हा भागभांडवल खरेदी करणार आहे. कंपनी स्वतः या संपादनासाठी निधी देणार आहे.
पेन्ना सिमेंटच्या अधिग्रहणानंतर अंबुजा सिमेंट दक्षिण भारतात अस्तित्व मजबूत करणार
अंबुजा सिमेंटच्या वाढीच्या प्रवासाला गती देण्यासाठी ही खरेदी मैलाचा दगड ठरणार असल्याचे मत अंबुजा सिमेंटचे सीईओ अजय कपूर यांनी व्यक्त केले. पेन्ना सिमेंटच्या अधिग्रहणानंतर अंबुजा सिमेंट दक्षिण भारतात आपले अस्तित्व मजबूत करेल आणि संपूर्ण देशात सिमेंट उद्योगात आघाडीचे स्थान प्राप्त करेल. या संपादनानंतर, अदानी सिमेंटचा भारतातील बाजारपेठेतील हिस्सा 2 टक्क्यांनी वाढेल. दक्षिण भारतात हाच हिस्सा 8 टक्क्यांपर्यंत वाढेल. हा करार पूर्ण होण्यासाठी 3 ते 4 महिने लागणार आहेत. शेअर बाजाराचे आजचे ट्रेडिंग सत्र संपल्यानंतर काल (13 जून) अंबुजा सिमेंटने ही घोषणा केली आहे. तत्पूर्वी अंबुजा सिमेंटचा समभाग 0.63 टक्क्यांच्या घसरणीसह 664.50 रुपयांवर बंद झाला. अंबुजा सिमेंटचे मार्केट कॅप 1,63,674 कोटी रुपये आहे.
महत्वाच्या बातम्या: