एक आयडिया सुचली अन् नशीब बदललं, कपडे शिवणारा व्यक्ती बनला 8300 कोटींचा मालक
आज आपण इरफान रझाक (Irfan Razak) यांची यशोगाथा पाहणार आहोत. रझाक यांनी अगदी शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. त्यांच्याकडे आज 8300 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
Success Story : कधी कोणाचे नशीब बदलेल हे काही सांगता येत नाही. आपली कष्ट करण्याची तयारी आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आपण कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतो. आज आपण अशीच एक वेगळी यशोगाथा (Success Story) पाहणार आहे. आज आपण इरफान रझाक (Irfan Razak) यांची यशोगाथा पाहणार आहोत. रझाक यांनी अगदी शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. त्यांच्याकडे आज 8300 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
प्रेस्टिज इस्टेट प्रोजेक्ट्स रिअल इस्टेटमधील आघाडीची कंपनी
सुरुवातीला इरफान रझाक (Irfan Razak) यांच्या वडिलांचा बंगळुरुमध्ये (Bengaluru) टेलरिंगचा व्यवसाय होता. यावेळी इरफान रझाक हेदेखील त्यांना यामध्ये मदत करत होते. यानंतर इरफान रझाक यांच्या वडिलांनी रिअल इस्टेटशी संबंधित छोटीशी कंपनी स्थापन केली. ही कंपनी आज देशातील आघाडीची कंपनी बनली आहे. देशातील पहिल्या दहा कंपन्यांमध्ये इरफान रझाक यांच्या वडिलांनी स्थापन केलेली कंपनी आहे. प्रेस्टिज इस्टेट प्रोजेक्ट्सचे असं या कंपनीचं नाव आहे. इरफान रजाक हे या कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. इरफान यांचा जन्म बंगळुरुमध्ये झाला होता. यावेळी त्यांचे वडिल कपडे शिवण्याचे काम करत होते. त्यानंतर वडिलांनी प्रेस्टीज ग्रुप स्थापन केला. आज हा ग्रुप एक नामांकित ग्रुप झाला आहे. या ग्रुपची धुरा इरफान रजाक हे सांभाळत आहेत.
कंपनीने आत्तापर्यंत 285 प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले
सुरुवातीच्या काळात छोटा असलेला प्रेस्टिज इस्टेट प्रोजेक्ट्स व्यवसाय सध्याच्या काळात एक मोठा व्यवसाय बनला आहे. करोडो रुपयांची उलाढाल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या कंपनीने आत्तापर्यंत 285 प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. तर सध्या 54 प्रकल्पांचं काम सुरु आहे. इरफान रजाक यांच्या कुटुंबियांची मोठी मालमत्ता आहे. 1 अब्ज डॉलर्सच्या पुढे म्हणजेच सुमारे 8300 कोटी रुपयांच्या पुढे इरफान रजाक यांच्या कुटुंबियांची संपत्ती आहे. तर या कंपनीच्या शेअर्समध्येही वाढ झाली आहे. कामाप्रती असणारं समर्पण आणि दूरदृष्टी यामुळं या क्षेत्रात यश मिलाल्याची माहिती इरफान रजाक यांनी दिली आहे. अलीकडच्या काळात तरुण वर्ग नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करताना दिसत आहे. व्यवसायातून देखील मोठा नफा कमवता येतो. छोट्या व्यवसायातून मोठा नफा मिळवणारे अनेक व्यवसायिकांची उदाहरणे आपल्यासमोर आहेत.
महत्वाच्या बातम्या:
गुलाबानं आणला तरुणाच्या आयुष्यात 'सुगंध', आज करतोय लाखो रुपयांची कमाई