एक्स्प्लोर

RBI कडून शेतकऱ्यांसाठी मोठी भेट! किसान क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये मोठे बदल, कर्ज मिळवणं होणार अधिक सोपं

भारतीय रिझर्व्ह बँकेने किसान क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आरबीआयच्या नियमांमधील या सुधारणेचा उद्देश किसान क्रेडिट कार्डचे वितरण अधिक पारदर्शक करणे आहे.

RBI Kisan Credit Card News : भारतीय रिझर्व्ह बँकेने किसान क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आरबीआयच्या नियमांमधील या सुधारणेचा उद्देश किसान क्रेडिट कार्डचे वितरण अधिक पारदर्शक करणे आहे. कर्ज मंजुरीचा कालावधी कमी करणे आणि लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना बँकिंग पतपुरवठा मिळवणे सुलभ करणे हा आहे. या सुधारणांद्वारे, आरबीआय किसान क्रेडिट कार्ड कर्जासाठी लागणारी कागदपत्रे कमी करून, सुलभ पतपुरवठ्यासाठी डिजिटल सार्वजनिक तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मच्या वापरास प्रोत्साहन मिळणार आहे. 

भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्ज मंजुरी आणि परतफेडीच्या वेळापत्रकात एकसमानता आणण्यासाठी, पीक हंगामाच्या व्याख्येला एकरूप करून किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) योजनेच्या निकषांमध्ये सुधारणा केली आहे. आरबीआयचे  निर्देश पुढील वर्षी जानेवारीपासून लागू होतील. केंद्रीय बँकेने म्हटले आहे की, कृषी आणि संबंधित व्यवसायांमध्ये गुंतलेल्या कर्जदारांच्या खेळते भांडवल आणि गुंतवणूक कर्जाच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने, केसीसी योजनेअंतर्गत बँकिंग प्रणालीकडून पुरेसा आणि वेळेवर पतपुरवठा सुलभ करण्यासाठी हे निर्देश जारी केले जात आहेत.

उत्पन्न ओळख आणि मालमत्ता वर्गीकरण (IRAC) नियमांनुसार सुसंगत होण्यासाठी पीक हंगामाच्या व्याख्येत सुधारणा करण्यात आली आहे. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, केसीसी योजनेच्या उद्देशांसाठी, पीक हंगाम अल्प-मुदतीच्या पिकांसाठी 12 महिने आणि दीर्घ-मुदतीच्या पिकांसाठी 18 महिने असा परिभाषित केला जाईल. पीक हंगाम म्हणजे पिकाच्या पेरणीपासून ते काढणी आणि विपणनापर्यंतचा कालावधी होय.

कर्जाच्या मर्यादेत कोणतीही वाढ नाही

फेब्रुवारीमध्ये, मध्यवर्ती बँकेने सुधारित केसीसी योजनेवर मसुदा मार्गदर्शक तत्त्वे जारी करून, जनता आणि हितधारकांकडून सूचना मागवल्या होत्या. आरबीआयने असुरक्षित कर्ज मर्यादा वाढवण्याच्या सूचना फेटाळून लावल्या. ही मर्यादा डिसेंबर 2024 मध्ये वाढवण्यात आली आहे आणि सध्या आणखी वाढीचा कोणताही प्रस्ताव नाही. 2 लाख रुपयांपर्यंतच्या कृषी कर्जासाठी सोन्या-चांदीचे ऐच्छिक तारण ठेवणे, हे कृषी क्षेत्रातील असुरक्षित कर्जासाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन मानले जाणार नाही.

पीक हंगामाचे नवीन नियम काय आहेत?

कर्ज वसुली आणि पिकांची काढणी यात ताळमेळ बसवण्यासाठी आरबीआयने पीक हंगामाची कालमर्यादा निश्चित केली आहे:

अल्पमुदतीची पिके: कमी कालावधीत येणाऱ्या पिकांसाठी पीक हंगामाचा काळ आता १२ महिने धरला जाईल.

दीर्घमुदतीची पिके: जास्त कालावधी घेणाऱ्या पिकांसाठी हा काळ १८ महिने निश्चित करण्यात आला आहे.

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, ' पीक हंगाम ' म्हणजे केवळ शेतात बी पेरण्यापासून ते पीक कापणीपर्यंतचा काळ नसून, कापणीनंतर ते उत्पादन बाजारात विकून हातात पैसे येईपर्यंतचा संपूर्ण कालावधी यात समाविष्ट असेल. यामुळे शेतकऱ्याला आपले पीक बाजारात किंवा सरकारी केंद्रावर विकून सन्मानाने कर्जाची परतफेड करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Russia Sanctions 100 Percent Tariff On India: भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
Multibagger Stock : संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Embed widget