एक्स्प्लोर

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता

DA Hike Update News : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ होऊ शकते. महागाई भत्ता 4 टक्क्यांवरून 5 टक्के केला जाण्याची शक्यता आहे.

7th Pay Commission Latest News : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) मोठी वाढ होऊ शकते. महागाई भत्ता 4 टक्क्यांवरून 5 टक्के केला जाण्याची शक्यता आहे. 1 जुलै 2022 पासून या वर्षाच्या महागाई भत्त्याच्या दुसऱ्या टप्प्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ केली जाईल असा अंदाज या आधी वर्तवण्यात येत होता. आता औद्योगिक कामगारांसाठीच्या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या अलीकडील आकडेवारीनंतर, महागाई भत्ता 4 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत वाढवला जाण्याची शक्यता आहे.

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता मिळतो. हा महागाई भत्ता 38 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची अपेक्षा होती. मात्र महागाई भत्त्यात 5 टक्क्यांनी वाढ होणार असल्याचं मानलं जात आहे. एप्रिल महिन्यातील अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार हा अंदाज वर्तवला जात आहे.

देशातील वाढती महागाई पाहता, जुलै महिन्यात केंद्र सरकार महागाई भत्ता (DA) वाढवण्याचा विचार करत आहे. असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरून 39 टक्क्यांपर्यंत वाढवल्यास केंद्रीय कर्मचार्‍यांचा पगार 8 हजार रुपयांवरून 27 हजार रुपयांपर्यंत वाढू शकतो.

मिळालेल्या आकडेवारीनुसार, केंद्र सरकारच्या या निर्णयाचा परिणाम 47 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांवर होणार आहे. महागाईबरोबरच ईएमआयही महाग होत आहे, अशा परिस्थितीत महागाई भत्त्यात वाढ केल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. सर्वसाधारणपणे 1 जानेवारी आणि 1 जुलैपासून महागाई भत्ता वाढवण्याची पद्धत ट्रेंड आहे. त्यामुळे आता केंद्रीय कर्मचारी आतुरतेने याची वाट पाहत आहेत.

केंद्र सरकारकडून किरकोळ महागाईच्या आकडेवारीच्या आधारे जानेवारी आणि जुलै महिन्यात वर्षातून दोनदा DA आणि DR मध्ये सुधारणा करण्यात येते. देशातील महागाई RBI च्या अंदाजाच्या पुढे गेली आहे. देशातील किरकोळ महागाई RBI च्या सहनशीलतेच्या 6 टक्क्यांच्या वर गेली आहे. किरकोळ महागाईचा दर मार्चमध्ये 6.95 टक्क्यांवरून एप्रिलमध्ये 7.79 टक्क्यांवर पोहोचला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
Horoscope Today 29 March 2024 :  धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल, जाणून घ्या मेष ते मीन राशींचे शुक्रवारचे राशीभविष्य
धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल, जाणून घ्या मेष ते मीन राशींचे शुक्रवारचे राशीभविष्य
Rishabh Pant : चांगली सुरुवात करुनही अपयश,रिषभ पंत प्रचंड संतापला, आऊट होताच जे केलं ते धक्कादायक
रिषभ पंत चहलच्या बॉलिंगवर आऊट होताच प्रचंड संतापला, रागात बॅट भिंतीवर आपटली, पाहा व्हिडीओ
Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 07 AM :  29 March 2024 : Maharashtra NewsUddhav Thackeray Group On Shinde  Group : गोविंदाला पक्षात घेताना भाजपला नक्की विचारलंय ना?Jayant Patil On Govinda : गोविंदाचे चित्रपट चालत नाही,जयंत पाटलांचा टोला : ABP MajhaTOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 29 March 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
Horoscope Today 29 March 2024 :  धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल, जाणून घ्या मेष ते मीन राशींचे शुक्रवारचे राशीभविष्य
धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल, जाणून घ्या मेष ते मीन राशींचे शुक्रवारचे राशीभविष्य
Rishabh Pant : चांगली सुरुवात करुनही अपयश,रिषभ पंत प्रचंड संतापला, आऊट होताच जे केलं ते धक्कादायक
रिषभ पंत चहलच्या बॉलिंगवर आऊट होताच प्रचंड संतापला, रागात बॅट भिंतीवर आपटली, पाहा व्हिडीओ
Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Rajasthan Royals Vs Delhi Capitals Score:  20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
Hardik Pandya: आदर की भीती?, लसिथ मलिंगा-पोलार्ड खुर्ची सोडून उठले, हार्दिक पांड्याचा नवीन व्हिडिओ आला समोर
आदर की भीती?, लसिथ मलिंगा-पोलार्ड खुर्ची सोडून उठले, हार्दिक पांड्याचा नवीन व्हिडिओ आला समोर
Rajasthan Royals Vs Delhi Capitals: 6 चेंडूत 17 धावा, आवेश खानचा टिच्चून मारा; राजस्थानचा 12 धावांनी विजय, दिल्लीचा सलग दुसरा पराभव
6 चेंडूत 17 धावा, आवेश खानचा टिच्चून मारा; राजस्थानचा 12 धावांनी विजय, दिल्लीचा सलग दुसरा पराभव
Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
प्रफुल्ल पटेल यांना दिलासा! 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून क्लीन चीट
Embed widget