(Source: ECI/ABP News/ABP Majha)
31 मे दिवशी जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे 1000 रुपये, अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त उपक्रम
अहिल्यादेवी होळकर जयंतिनिमित्त जीवनआधार फाऊडेंशन (Jeevan Aadhaar Foundation) मिटकलवाडी यांच्या वतीनं एक वेगळा उपक्रम सुरु केलाय. 31 मे दिवशी जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे 1000 रुपये दिले जाणार आहेत.
Ahilyabai Holkar jayanti : दरवर्षी 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती (Ahilyabai Holkar jayanti) साजरी केली जाते. या जयंतीनिमित्त राज्यभर विविध उपक्रमांचं आयोजन देखील केलं जातं. या जयंतिनिमित्त जीवनआधार फाऊडेंशन (Jeevan Aadhaar Foundation) मिटकलवाडी यांच्या वतीनं एक वेगळा उपक्रम सुरु केला आहे. अहिल्यारत्न ठेव योजनेच्या माध्यमातून 31 मे दिवशी जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे 1000 रुपये डिपॉजीट केले जाणार आहेत. हा उपक्रम संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासाठी राबवण्यात येणार असल्याची माहिती फाऊडेंशनचे अध्यक्ष किशोर सलगर (Kishor Salgar) यांनी दिली आहे.
संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात ही योजना राबवण्यात येणार
31 मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती येत आहे. यांच्या जयंतीनिमित्त 31 मे दिवशी जन्माला येणाऱ्या मुलींच्या नावे 1000 रुपये डिपॉजीट केले जाणार आहेत. अहिल्यारत्न ठेव योजनेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षापासून हा उपक्रम राबवला जात असल्याची माहिती किशोर सलगर यांनी दिली आहे. दरवर्षी ही योजना माढा तालुक्यापुरती मर्यादीत होती. मात्र, यावेळस योजनेचे कार्यक्षेत्र वाढवलं आहे. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात ही योजना राबवण्यात येणार आहे.
मुलींच्या पालकांनी जन्मतारखेचा दाखला घेऊन संपर्क करावा
31 मे या दिवशी ज्या मुलींचा जन्म होईल त्या मुलींच्या पालकांनी जन्मतारखेचा दाखला घेऊन संपर्क करावा असे आवाहन किशोर सलगर यांनी केलं आहे. आम्ही घरी येऊन त्या मुलीचे आम्ही स्वागत करणार असल्याची माहिती किशोर सलगर यांनी दिली.
31 मे 1725 या दिवशी चौंडी इथं जन्म
महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी, तालुका जामखेड, हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान आहे. याच गावात 31 मे 1725 या दिवशी अहिल्यादेवी यांचा जन्म झाला. पुढे सुभेदार मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव यांच्याशी त्यांचा विवाह झाला. अहिल्याबाई बालपणापासूनच चाणाक्ष, तल्लख आणि कुशाग्र बुद्धीच्या होत्या. कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या सूनबाई अहिल्याबाई यांच्यावर सासरे मल्हारराव होळकर यांचा मोठा विश्वास होता. पुष्कळ महत्त्वाचा पत्रव्यवहार ते अहिल्याबाई यांच्यावर सोपवत असत. अहिल्याबाईंना वयाच्या 28 व्या वर्षी वैधव्याला सामोरे जावे लागले. कुंभेरीच्या लढाईत पती खंडेराव मरण पावले. त्यावेळी सासरे मल्हारराव अहिल्याबाईंना म्हणाले, माझा खंडूजी गेला; म्हणून काय झाले ? तुझ्या रूपाने माझा खंडूजी अजून जिवंत आहे. तू सती जाऊ नकोस. अहिल्याबाईंनी ते ऐकले आणि मल्हाररावांनी अहिल्याबाईंच्या हाती सत्तेची सूत्रे दिली.
तत्त्वनिष्ठ राज्यकारभार
अहिल्याबाई होळकरांचे प्रजाहिताकडे लक्ष दिले. अहिल्याबाईंचा मूळ स्वभाव सौम्य असला, तरी राज्यकारभारात त्या तत्त्वनिष्ठ आणि कठोर होत्या. त्यांनी मनरुपसिंह सारख्या कुविख्यात डाकूला फाशी दिली होती. अहिल्याबाई यांनी पूर्वीच्या कायद्यांमध्ये परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या. करपद्धती सौम्य केली गावोगावी न्याय देणारे पंच अधिकारी नेमले.
महत्वाच्या बातम्या:
'या' आहेत संकट काळात वरदान ठरणाऱ्या योजना, सविस्तर माहिती एका क्लिकवर