एक्स्प्लोर

डायमंड पार्क्स, लोहगाव तर्फे माहेर संस्थेतील मुलांसोबत ख्रिस्तमस उत्साहात साजरा

डायमंड पार्क्स, लोहगावने सामाजिक सेवेचा आणि बांधिलकीचा वारसा पुढे चालू ठेवत, ख्रिस्तमस सण माहेर या गरजू मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेतील लहान मुलांसोबत वेळ घालवून व त्यांना भेटवस्तू देऊन साजरा केला. 

दिल्ली, 26 डिसेंबर : ख्रिसमस सण आपल्या सोबत आनंद, भरपूर प्रेम, शांतता आणि करुणेचा संदेश घेऊन येतो. यावर्षी, इंदुलकर समूहाअंतर्गत येणाऱ्या  ISO 9001:2015  प्रमाणित डायमंड पार्क्स, लोहगावने सामाजिक सेवेचा आणि बांधिलकीचा वारसा पुढे चालू ठेवत, ख्रिस्तमस सण माहेर या गरजू मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेतील लहान मुलांसोबत वेळ घालवून व त्यांना भेटवस्तू देऊन साजरा केला. 

सामाजिक सेवेच्या वचनबद्धतेसाठी ओळखले जाणार्या, डायमंड पार्क्स, लोहगाव मधील स्टाफने डायमंड पार्क्स मधील हिलटॉप मल्टिक्यूजीन रेस्टॉरंट आणि बारच्या आवारात बॉक्स ठेवला होता. त्याला उदंड प्रतिसाद देत डायमंड पार्क्स च्या स्टाफने त्यामध्ये लहान मुलांना उपयोगी अशा अनेक भेटवस्तू ठेवल्या होत्या. त्या भेटवस्तू माहेर या संस्थेत जाऊन तेथील लहान मुलांना देण्यात आल्या. त्याच बरोबर डायमंड पार्क्स च्या वतीने बनलेल्या सांताक्लॉज तर्फे लहान मुलांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले. लहान मुलं डायमंड पार्क्स टीमचा उत्साह आणि उपक्रम बघून भारावून गेली आणि त्यांनी अत्यंत जिव्हाळ्याने व आनंदाने टीम डायमंडचे स्वागत केले. 

या उत्सवाबरोबरच पार्क्स च्या आवारातील, हिलटॉप मल्टीक्युझिन रेस्टॉरंट, कोपा दि कोलिना येथे ख्रिसमसच्या सणाची सुरुवात एका नेत्रदीपक उत्सवाने झाली. अतिथींना अमर्याद आनंद देणारे आकर्षक खेळ, गरम पेये आणि सांताक्लॉज ची भेट आणि त्याच्या हस्ते भेटवस्तू अशा अनेक मनोरंजनांनी भरलेली संध्याकाळ साजरी करण्यात आली. सर्व वयोगटातील गेस्ट्सनी नाताळच्या वातावरणाचा आणि उत्सवाचा आनंद लुटल्यामुळे या कार्यक्रमाला प्रचंड यश मिळाले. 

एव्हढेच नव्हे, तर डायमंड पार्क्स, लोहगावने 21 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पाच दिवसांच्या ख्रिसमस कार्निव्हलचे आयोजन करून हा उत्सव आणखी एक पाऊल पुढे नेला. मुलांसाठी आणि प्रौढांसाठी खास मेनू, दररोज विशेष परफॉर्मन्स शो, मुलांच्या सुपर एक्सायटिंग सॉफ्टप्ले झोनमध्ये 12 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी खास 1 तास यासारख्या वैविध्यपूर्ण ऑफरसह हा उत्सव साजरा करण्यात आला.  

सेवाभावी प्रयत्नां बरोबरच नाताळचे चैतन्यमयी वातावरण घेऊन, डायमंड पार्क्स, लोहगाव, 31 डिसेंबर रोजी होणाऱ्या नवीन वर्षाच्या पार्टीसाठी सुसज्ज बनले आहे. संध्याकाळी 6:00 वाजता सुरू होणारा, हा अत्यंत रोमांचक कार्यक्रम पार्टी टाइम बरोबरच खास वॉटर पूल मधील आसन व्यवस्थेसमवेत, आल्हाददायक वातावरणातील कॅम्पिंग व मोफत नाष्ट्या समवेत, डी जे आणि त्याच्या
रॉकिंग म्युजिक समवेत, डान्स फ्लोअर, फटाक्यांची आतिषबाजी, अशा अनेक आकर्षणांनी भरलेली एक अविस्मरणीय संध्याकाळ देतो. त्या साठी बुकिंग अगदी जोरात सुरु आहेत. 

न्यू इयर च्या पार्टीच्या बुकिंग साठी www.diamondparks.com येथे किंवा 7720006622 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन डायमंड पार्क्स च्या वतीने करण्यात आले आहे.

(Disclaimer: ABP Network Pvt. Ltd. and/or ABP Live does not in any manner whatsoever endorse/subscribe to the contents of this article and/or views expressed herein. Reader discretion is advised)

आणखी वाचा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
Embed widget