News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट खेळ
X

ए. के. एज्युकेशनल कन्सल्टंट्सची एमबीबीएस अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची पहिली बॅच इमॅन्युएल कांत बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटीमधून उत्तीर्ण

इमॅन्युएल कांत बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये पदवीचे शिक्षण घेणारे पहिल्या बॅचमधील सर्व विद्यार्थी आता लवकरच पदवीधर होणार आहेत, याबद्दल ए.के.ई.सीची टीम अत्यंत आनंदात आहे.

FOLLOW US: 
Share:
x

नवी दिल्ली: ए. के. एज्युकेशनलकन्सल्टंट्स ही भारतातील एक आघाडीची स्टडी अब्रॉड परदेशी शिक्षण कन्सल्टन्सीआहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ भारतातील महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांना रशियातील प्रतिष्ठित वैद्यकीय विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवून देण्यास मदत करण्यासाठी ही कन्सल्टन्सी ओळखली जाते. ही संस्था एम. बी. बी. एस पदवी प्राप्त करणाऱ्या पहिल्या बॅचच्या ग्रॅज्युएशन समारंभासाठी सज्ज झाली आहे. कॅलिनिनग्राड येथील इमॅन्युएल कांत बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटी या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेत 5 जुलै 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या पदवीदान समारंभात या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणारआहे.

2017 च्या बॅचच्या यशस्वी प्रवेशप्रक्रियेनंतर एकेईसी या रशियन गर्व्हर्न्मेंट मेडिकल युनिव्हर्सिटीजची (रशियाची शासकीय वैद्यकीय विद्यापीठ) मान्यता प्राप्त असलेल्या आणि शैक्षणिक क्षेत्रात 23 वर्षांचा वारसा असलेल्या कंपनीतर्फे, रशियातील विविध स्टेट आणि फेडरल विद्यापीठांमध्ये वैद्यकीय शाखेत प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली आहे. दुसरीकडे, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या या कठोर प्रवासादरम्यान एकेईसीच्या एक्स्पर्टकडून नियमित मार्गदर्शन करण्यात येते. या प्रवासानंतर लवकरच अंतिम वर्षाचे विद्यार्थी फायनल स्टेट एक्झाम देतात.

ए. के. एज्युकेशनल कन्सल्टंट्सचे संचालक डॉ. अमित कामले म्हणाले, "या पदवीधर बॅचसमोर असलेल्या संधी पाहून मी अत्यंत उत्साहात आहे. गेली सहा वर्षे या विद्यार्थ्यांना अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आणि त्यांच्या परदेशी शिक्षणाच्या अनुभवाच्या प्रत्येक पैलूबाबत आम्ही त्यांना अविरतपणे मार्गदर्शन केले. आपले घर आणि देश सोडून परदेशी जाऊन अभ्यास करणे एकाच वेळी महत्त्वाकांक्षी आणि तितकेच धीर खचवणारे असू शकते याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. म्हणूनच, पालक आणि विद्यार्थ्यांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. या विश्वासामुळेच आम्ही या विद्यार्थ्यांना यशस्वी प्रवासात सुरळीतपणे घेऊन जाऊ शकलो. इमॅन्युएल कांत बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये पदवीचे शिक्षण घेणारे पहिल्या बॅचमधील सर्व विद्यार्थी आता लवकरच पदवीधर होणार आहेत, याबद्दल ए.के.ई.सीची टीम अत्यंत आनंदात आहे."

ए.के.ई.सीने वैद्यकीय शिक्षणामध्ये निभावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल इमॅन्युएल कांत बाल्टिक युनिव्हर्सिटीमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या मुंबईतील सोनाली सरदार म्हणाल्या, "डॉक्टर होण्याच्या माझ्या आणि माझ्या बॅचमधील इतर विद्यार्थ्यांना डॉ. अमित कामले सरांनी मार्गदर्शन केले. या प्रवासातील प्रत्येक पावलावर डॉ. कामले आणि त्यांच्या एक्सपर्ट्सच्या टीमने आम्हाला खूप मदत केली आणि मार्गदर्शन केले. आमच्या अभ्यासात ए.के.ई.सीच्या एक्स्पर्ट्सकडून मिळणारे मार्गदर्शन असो वा पदवी प्राप्त करेपर्यंतच्या आमच्या वास्तव्यातील इतर आवश्यकता असो, ए.के.ई.सी कायम आमच्यासोबत होती."

सोनालीचे वडील प्रवीण सरदार म्हणाले, "कॅलिनिनग्राडमध्ये माझ्या मुलीच्या पदवीदान समारंभासाठी मला उपस्थित राहता यावे, यासाठी डॉ. अमित कामले आणि त्यांच्या टीमने माझ्या व्हिसाची सोय केली. माझ्या मुलीच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या प्रसंगी मला तिच्यासोबत राहण्यास मदत करण्यासाठी, तसेच तिच्या उज्ज्वल करिअर मार्गावर तिला मार्गदर्शन केल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. ए. के. एज्युकेशनल कन्सल्टंट्सच्या माध्यमातून माझ्या मुलीला रशियामध्ये एम.बी.बी.एस करण्यास पाठवणे हा मी घेतलेला निर्णय योग्य होता, असे मला वाटते."

उदयोन्मुख वैद्यकीय विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय अनुभव मिळावा यासाठी मदत करण्यासाठी ए.के.ई.सीतर्फे प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येते. यामुळे या सतत बदलणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रात त्यांची प्रोफाइल अधिक चांगली होते. त्याचप्रमाणे ए.के.ई.सीतर्फे या विद्यार्थ्यांना कझान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, मॉस्को स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, व्होल्गोग्राड स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी अशा प्रतिष्ठित रशियन वैद्यकीय विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी मदत करण्यात येत असल्याने ए.के.ई.सी ही विद्यार्थी आणि पालकांसाठी एक विश्वसनीय कन्सल्टन्सी झाली आहे. एफएमजीईसारख्या (फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झॅमिनेशन) आव्हानात्मक भारतीय परवाना परीक्षांमध्ये 90 टक्क्यांहून अधिक'एकेईसी'कर उत्तीर्ण होतात. त्याचप्रमाणे भारतात प्रॅक्टिस करणे या पदवीधरांना सुलभ जावे यासाठी ए.के.ई.सी या वैद्यकीय प्रवासाच्या प्रवासात विद्यार्थ्यांना आधीपासूनच FMGE (एमएमजीई) आणि त्यानंतरचीNExT (नॅशनल एक्झिट टेस्ट) ही परीक्षा देण्याच्या दृष्टीने सज्ज करतात.

अर्ज भरण्याच्या मार्गदर्शनापासून ते लॉजिस्टिकसंबंधी समस्या सोडविण्यापर्यंत ए.के.ई.सीतर्फे उत्तर प्रकारे या प्रवेश प्रक्रियेत मदत करण्यात येते.  क्षेत्रात त्यांचा 23 वर्षांहून अधिक अनुभव आहे आणि अनेक उल्लेखनीय रशियन शैक्षणिक संस्थांमधील विविध शाखांमधील स्पर्धा-अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यास अनेक विद्यार्थ्यांना मदत करून त्यांची स्वप्नपूर्ती केली आहे. म्हणूनच ए. के. एज्युकेशनल कन्सल्टंट्सचा हीच दैदिप्यमान कामगिरी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासंदर्भातही करण्याचा आणि उत्तम शिक्षण घेतलेले आणि परदेशी शिक्षण घेतलेले अनेक डॉक्टर घडविण्यासाठी मार्ग तयार करण्याचा निर्धार आहे.

अधिक माहितीसाठी कृपया  https://www.akecindia.com/ या वेबसाइटला भेट द्या.



 

Published at : 10 Jul 2023 04:16 PM (IST) Tags: education medical education MBBS A K Educational Consultants