एक्स्प्लोर
'अस्पृश्यता' प्रत्येक वेळी वाईट असेलच असं नाही
एखाद्या व्यक्तीला किंवा गोष्टीला दुरुन पाहून लगेच आपण आपलं मत बनवतो. मग ते चांगलं असो की वाईट. पण असं करण्याआधी आपण स्वत:ला त्या व्यक्तीच्या जागी ठेवून पाहीलं पाहीजे. कारण प्रत्येक वेळी जसं दिसतं तसं असेलच असं नाही.

आपण आयुष्यात अनेक गोष्टी शिकतो. आपल्या गुरुकडून, पालकांकडून तर कधी पुस्तकातून... त्यामुळे एखाद्या व्यक्तीबद्दल जेव्हा आपलं मत बनतं, त्यावर या गोष्टींच्या संस्काराचा प्रभाव असतो. जो प्रत्येक वेळी खरा असेलच असं नाही.
एखाद्या व्यक्तीला किंवा गोष्टीला दुरुन पाहून लगेच आपण आपलं मत बनवतो. मग ते चांगलं असो की वाईट. पण असं करण्याआधी आपण स्वत:ला त्या व्यक्तीच्या जागी ठेवून पाहिलं पाहिजे. कारण प्रत्येक वेळी जसं दिसतं, तसं असेलच असं नाही.
आता मी जर तुम्हाला सांगितलं की अस्पृश्यता ही गोष्ट प्रत्येक वेळी वाईट असेलच असं नाही तर...!
ही गोष्ट आहे एका प्रवासाची…
मला भटकायला आवडतं. सह्याद्रीचे रानोमाळ पालथे घालून झाल्यावर मला वेध लागले ते हिमालयाचे. भटकायची हौस तर इतकी की कोणी मिळालं नाही म्हणून एकटाच निघालो. आधी दिल्ली मग हिमाचल.
एकट्याने फिरायचा एक मोठा फायदा होतो ते म्हणजे नवनवीन माणसं भेटतात. प्रत्येक व्यक्तिमचत्त्व वेगळं, त्यांचे विचार वेगळे, अनुभव वेगळे. यातून बऱ्याच नव्या गोष्टींची माहिती मिळते.
या प्रवासातील एक टर्निंग पॉइंट म्हणजे DORM वालं हॉस्टेल. इथ पहिल्यांदाच सोलो ट्रॅव्हलर्सच जग उमजलं. अनेक नमुने भेटले. एखादा गोड आवाजात एकटाच गात बसलेला असायचा. तर एक टेरेसवर दिवसभर चित्र रेखाटत बसायचा. खास योगा करायला आलेले काही युरोपियन होते. इथं केरळपासून हरयाणापर्यंतचे प्रवासी भटले. काही युरोपियन, रशियन आणि नॉर्थ अमेरिकन मुलीही भेटल्या ज्या सोलो ट्रॅव्हलर होत्या. इथले किस्सेही भन्नाट आहेत. पण ते नंतर कधी तरी..
हॉस्टेलमध्ये अनेक प्रवासी आणि गिर्यारोहकांशी गप्पा मारल्यावर एक गोष्ट लक्षात आली की खरं हिमालयन जग अनुभवायचं असेल तर अशा कमर्शियल टुरिस्ट ठिकाणी थांबून उपयोग नाही. हिमशिखरांच्या कुशीत दडलेल्या गावात इथली खरी संस्कृती वसतेय.
अशाच एका गावात निघालो. सरकारी बस होती. जीवघेणा रस्ता होता. बसमध्ये बरेच गावकरी होते. कंडक्टरने आधी तिकीट फाडलं मग मला विचारलं “पहिली बार आये हो?” मी बोललो “हो”. त्यानंतर त्याने मला जे सांगितलं ते माझ्यासाठी नवीन आणि विचित्र होतं. त्याच्याच शब्दात सांगायचं तर,
“साब आपके अच्छे के लिये बोल रहा हू, गाव मे छुआछुत काफी है. किसी को छुना मत. किसी के घर के आंगन मे भी मत जाना. गेस्ट हाऊस फुल हो तो शाम गाडी पकड के वापस जाव.”मग लक्षात आलं माझ्या बाजूची सीट मोकळी का राहिली. राग आला. मनोमन शिव्याही घातल्या. मग म्हटलं मरु दे आणि ऐसपैस पसरुन बसलो. पण गावात गेल्यावर लक्षात आलं की हे लोक तर तसं चांगलं बोलतात. वागवतातही. पण जराही शिवू देत नाहीत. आपल्या हातचं पाणीही पित नाहीत. लहान मुलाला एखादं चॉकलेट दिलेलंही त्यांना आवडत नाही. कोणाला तरी विचारायचं ठरवलं. संध्याकाळी निवांत आपल्या नातवासोबत खेळत बसलेली म्हातारी दिसली. इकडचं तिकडचं बोलून तिला लांबुनच विचारलं. “यहा छुआछुत क्यू है? ये तो अच्छी बात नाही ना दादी.” ती बोलली,
“बेटा अच्छे-बुरे की बात नाही है. तुम लोग निचेसे बिमारीया लेके आते हो. छुआछुत नही होती तोह पुरा गाव बिमार होता."आम्ही बोलत असताना मी 4-5 वेळा तरी शिंकलो असेन. खरं बोलत होती. जेव्हा तुम्ही दिल्लीच्या 40 डिग्री तापमानातून हिमालयातल्या 2 डिग्री तापमानात येता. तेव्हा सर्दी खोकला साहजिक आहे. ती लॉजिकली बरोबर होती. येथे अस्पृश्यता हायजिनसाठी होती. त्यांच्या आरोग्यासाठी होती. ज्यात काही चुकीचं नव्हतं. मग बाजूच्याच एका दुकानदाराला पैसे दिले आणि त्या म्हातारीच्या कुशीत बसलेल्या त्या चिमुकल्याला द्यायला सांगितले. बारकं खुश झालं की... म्हातारीलाही आता काही प्रॉब्लेम नव्हता. मग गेस्ट हाऊसकडे निघालो. नशिबाने जागाही मिळाली आणि एक चांगला अनुभवही.
View More























