एक्स्प्लोर

BLOG : टाळूवरचं लोणी खाणं बंद करा!

कोरोनाचा रिपोर्ट पॉजिटीव्ह असताना तो निगेटिव्ह करून द्यायचा, रेमेडीसीवरचे औषध सांगून बनावट औषधे विकायची, १२०० - ४५०० रुपयाला  मिळणारे रेमेडीसीवर औषध ३५-४० हजाराला काळ्याबाजारात विकायचे, रेमेडीसीवरचा साठा करून ठेवायचा, देशावर आणि राज्यावर आरोग्याच्या आणीबाणीच्या संकटात उपचार देण्याच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा बिलं करायची असे सर्रास प्रकार सध्या आपल्याकडे सुरु आहेत. या कृत्याच्या विरोधात राज्याचा पोलिस विभाग आणि  प्रशासन जितके शक्य आहे त्यांना आळा घालायचा प्रयत्न करीत आहे. या अशा गोष्टी आपल्याकडे होत असताना कोरोना विरोधातील लढाई लढायची कशी? हा प्रश्न प्रामुख्याने पडतो. देशातील अनेक राज्यात स्मशानभूमीत एकाच वेळी ४०-५० कोरोनाबाधितांचे मृतदेह जळत असतानाचे अनेक छायाचित्र व्हायरल झाले आहेत, दफनभूमीत मृतदेह पुरायला जागा अपुरी पडत आहे, विद्युत शवदाहिनीत मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. काही रुग्ण ऑक्सिजन अभावी तडफडून मरत आहेत. नातेवाईकांचा हुंदका आणि आक्रोशाने संपूर्ण समाजव्यवस्था हादरून गेली आहे. हतबलतेपुढे नैराश्याने ग्रासलेले आणि भयभीत झालेले नातेवाईकांचे चेहरे हे दिसत नसेल का ?  या समाजकंटकांना. या अशा सडक्या मेंदू असणाऱ्या लोकांच्या वेळीच मुसक्या आवळल्या पाहिजे. 

कोरोनाला पायबंद करण्यासाठी राज्य शासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस प्रशासन, सामाजिक संस्था यांनी रात्र-दिवस मेहनत करायची आणि ह्या सगळ्या प्रकारात हे महाभाग अपकृत्य करून पैसे कसे मिळतील याच्या विचारत असतील तर या अशा दृष्ट लोकांमुळे आपण लढाई हरू. विशेष म्हणजे हे कृत्य करणारे लोक कुणी परग्रहावरून आलेले नाही तर आपल्याच आजूबाजूला असणारी ही मंडळी आहेत. मुद्दा असा आहे की त्यांची ही कृत्य आपल्या लक्षात येत नाही आणि ज्यावेळी लक्षात येतात त्यावेळी बराच वेळ निघून गेलेला असतो.  पॉजिटीव्ह असणाऱ्या रुग्णांना निगेटिव्ह रिपोर्ट करून द्यायचा म्हणजे 'आत्मघातकी पथक'  निर्माण करण्याचेच काम आहे. ज्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉजिटीव्हचा निगेटिव्ह करून देत असतील तर तो पॉजिटीव्ह रुग्ण प्रवासादरम्यान, त्याच्या दैनंदिन व्यवहारात किती तरी लोकांना कोरोनाचा प्रसार करत जाईल, याचा विचार सुद्धा न केलेला बरा. जसा हा रिपोर्ट बनविणारा मूर्ख आहे त्याच प्रमाणे तो रिपोर्ट बनवून घेणारा महामूर्ख आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही. कारण मागणी असेल तर पुरवठा होईल, जर कुणी अशा रिपोर्टची मागणीच केली नाही तर ते पुरवतील तरी कसा हा रिपोर्ट. 

सर्वात प्रथम रेमेडीसीवर औषध दिले तरच रुग्ण बरा होतो किंवा त्याचा जीव वाचतो हा भ्रम आधी रुग्णांच्या नातेवाईकाच्या डोक्यातून काढून टाकला पाहिजे. गेली १५-२० दिवस  मुंबई शहरासह राज्यातील अनेक भागात रुग्णाचे नातेवाईक 'रेमेडीसीवर' ह्या औषधाचं प्रिस्क्रिप्शन घेऊन हे औषध मिळविण्याकरिता पायपीट करताना दिसत आहेत. वैद्यकीय तज्ञांना याबाबत विचारले असता ह्या औषधांबाबतची शास्त्रीय आधारावर उपयुक्तता अजून ठरायची आहे. अजूनही  हे औषध दिल्यानंतर रुग्णाचा जीव वाचतोच असे कुणीही खात्रीलायक सांगू शकत नाही. ह्या औषधाबाबत चर्चा नव्हती किंवा हे औषध बाजारात उपलब्ध नव्हते त्यावेळी ही गंभीर रुग्णांना बरे करण्यात डॉक्टरांना यश आलेले आहे. काही रुग्णांमध्ये हे औषध वापरून बघितल्यानंतर त्याचा उपयोग झाला आहे, मात्र ते औषध मिळवण्यासाठी सुरु असलेली अगतिकता पाहून हे औषध मिळालं नाहीच तर मोठा अनर्थ होईल, ह्या मानसिकतेतून नागरिकांनी बाहेर पडणे गरजेचं आहे. यापूर्वीही अनेक वैद्यकीय तज्ञांनी हे औषध जीवनरक्षक नसल्याचे सांगितले आहे. मात्र नातेवाईक रुग्ण वाचविण्यासाठी कोणत्याही थराला  जात आहे. काही वेळा तर नातेवाईकच डॉक्टरांना हे औषध आमच्या रुग्णाला का दिले नाही म्हणून प्रश्न विचारत आहे.  चढ्या दराने हे औषध काळाबाजारातून विकत घेतले जात आहे. लोकांच्या  ह्या हतबलतेचा फायदा काही समाज कंटक घेत आहेत. काही ठिकाणी या औषधाचा साठा  करून ठेवला जात आहे. तर काही ठिकाणी रेमेडीसीवरच्या नावाखाली  बनावट औषधांची विक्री करण्यात येत आहे. अनेक सामाजिक माध्यमांवर सध्या अनेक गरजू नातेवाईक ह्या डॉक्टरांनी दिलेल्या 'प्रिस्क्रिप्शनचा' फोटो काढून हे औषध मिळेल का याची विचारणा करताना दिसत आहे.  ही परिस्थिती अगदीच गंभीर आहे. डॉक्टरांनी सुद्धा हे औषध बाजारात उपलब्ध नाही हे कळाल्यावर नातेवाईकांना हे औषध आणण्यास सांगू नये. ह्या औषधाचा काळाबाजार करताना काही जणांना अटक सुद्धा झालीआहे.

ह्या कोरोनाच्या महामारीच्या संकटामुळे बेड्सची मागणी जोर धरू लागल्यामुळे प्रशासनाने मोठे हॉस्पिटल्स सहित छोट्या नर्सिंग होमला सुद्धा कोव्हिडचे रुग्ण उपचार करण्यासाठी नियमानुसार परवानगी दिली आहे. त्यांनी त्याकरिता नियमावली आखून दिली आहे. कोरोनाबाधितांच्या रुग्णाच्या उपचाराचे दर निश्चित करण्यात आले आहे.  स्थानिक प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर या प्रकारावर आळा घालण्याकरिता लेखापरीक्षक, आणि अन्य कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. मात्र तरीही काही ठिकाणी रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिल उकळलं जात आहे. हे प्रकार थांबणं गरजेचे आहे. आजाराच्या भीती पोटी बेड्स मिळण्याच्या अगतिकतेमुळे रुग्ण पैसे भरत आहेत.     

राजकारणी मंडळींचं तर काय विचारायला नको, नुसता हैदोस घालून ठेवलाय. कोण बरोबर कोण चूक कळायला मार्ग राहिलेला नाही. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर कुरघोडी करण्याची एक संधी सोडत नाही. दोघेही एकमेकांवर आरोप करत आहेत. सत्ताधारी म्हणतायत केंद्र सरकार आडकाठी करतय, तर राज्यातील विरोधक म्हणतायत हे याचे अपयश  लपविण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवत आहे. शाब्दिक चकमकी आणि हमरीतुमरीत दिवसामागून दिवस जात आहेत. रुग्णबाधितांची संख्या वेगाने दरदिवशी नवे उचांक गाठत आहेत. मृत्यूचा आकडा वेगाने वाढत आहे. ह्या अशा परिस्थितीत हताश आणि निराश जनता आपला रुग्ण वाचविण्यासाठी शक्यतो सगळे प्रयत्न करीत आहे. राजकारण्यांना राजकरण करायची वेळ नाही हे काळात असून सुद्धा केवळ श्रेयवादावरून भांडण सुरु आहेत. गुणवत्तापूर्वक नागरिकांना उपचार कसे मिळतील याकरिता खरे तर दोघांनी मिळून भांडण्याची ही वेळ आहे. मात्र राज्याची आरोग्य व्यवस्था कोमात असताना राजकरण मात्र जोरात असल्याचे चित्र सध्या राज्यात बघायला मिळत आहे.    

शुक्रवार, 16 एप्रिलला 'माणसाने माणसाशी माणसासम वागणे' या शीर्षकाखाली लिहिलेल्या लेखात, कोरोनामय वातावरण दिवसेंसदिवस अधिक ' रोगट ' होत चालले असून रुग्णांच्या मनात या आजाराने दहशत निर्माण केली आहे. रुग्णाची चाचणी पॉजिटीव्ह आली की तो रुग्ण  आणि त्याचे कुटुंबीय याची अवस्था केविलवाणी होत आहे. यावर भर देण्यात आला होता. 

त्यासोबतच, त्या लेखात.. कितीही मोठी ओळख असली तरी ऑक्सिजन बेड्स, कोरोनाच्या उपचारवर लागणारी औषध तात्काळ मिळत नाहीत. सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते सतत मदत करून अपुऱ्या असणाऱ्या व्यवस्थेपुढे  हतबल झाले आहेत. या अशा काळात नागरिकांनीच नागरिकांना कोरोनाच्या अनुषंगाने सुरक्षित वावर ठेवून  मदत करण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. राजकीय नेत्यांनी पण आता श्रेयवादाची लढाई लढता कामा नये कारण ती ही वेळ नव्हे. तुम्ही जे काय चांगलं काम करताय ते जनता लक्षात ठेवेलच. काही लोकं आपल्या मतदार संघाकरिता, जिल्ह्याकरिता, पक्षाकरिता औषधं घेऊन जात आहे. पण ज्यांना ती औषधं मिळत नाही ती पण माणसचं आहेत हे विसरू नका. सगळ्या गोष्टी ह्या आपल्याकरिता आपल्या लोकांकरिता करू नका काही तरी समाजासाठी पण केले पाहिजे ज्याचा तुमचा त्या लोकांशी तेथील व्यवस्थेशी काही संबंध नाही. मागच्या काळात काहीनी आपल्या नातेवाईकांना मेडिकलचा स्टाफ दाखवून लशी दिल्या. हे सगळं आत कुठे तरी थांबलं पाहिजे. एकंदरच सगळं चित्र कीव आणणारे आहे. सामान्य नागरिकांचे कुणाला काही घेणे देणे नाही. त्याला आरोग्याच्या योग्य सुविधा मिळत आहे कि नाही. दिवसाला लाखो नवीन रुग्ण या देशात येत आहे. आपल्याकडे  प्रांतिक वाद उभे केले जात आहेत किंवा राजकारण्यांनी ते  वाद उकरून काढले आहेत. ते एकता, बंधुत्व, समता कुठे गेले का फक्त भाषणापुरते हे शब्द मर्यादित राहिले आहे. कोरोनाचा हा विषाणू नागरिकांचा जीव घेत आहे. दिवसागणिक शेकडो माणसं मरत आहे, आता तरी सावध व्हा.   असं मत व्यक्त केलं होतं.

सध्याची वेळ ही पैसे कमवायची नसून माणसाने एकमेकांना मदत करण्याची वेळ आहे. आरोग्याच्या अपुऱ्या सुविधेच्या अभावी नागरिक मात्र गलितगात्र झाला आहे. त्याच्या मस्तकाला आपल्याला काळाबाजाराने औषध देऊन लुटले जात आहे याचा विचार करायला वेळ पण नाही. परिस्थितीचा फायदा घेऊन अनेक लुटारूंच्या टोळ्या बाजारात सक्रिय झाल्या आहेत. ज्या ठिकाणी कुणी नागरिक हताश, हतबल दिसतील त्या ठिकाणी या टोळ्यांचे सदस्य सगळी बेकायदेशी अनैतिक कामे करून देण्यास सज्ज झाली आहेत त्याचा इमान फक्त पैशाशी आहे. त्यांच्यासाठी माणुसकी गेली चुलीत.  अशावेळी एकाबाजूला राज्यातील सगळी 'मशिनरी' कोरोनाला अटकाव कसा करता येईल यासाठी कष्ट घेत आहेत या अशा परिस्थतीत तरी माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गोष्टी करू नये. त्यामुळे माणसांचा माणसांवरील विश्वासाला तडा जाण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे आता तरी टाळूवरचे लोणी खाण्याचा धंदा बंद करा.

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRavindra Waykar : मंगेश पडिलकरजवळचा फोन निवडणूक अधिकाऱ्याचा? ड्रायव्हर बोलवण्यासाठी फोन वापरल्याचा दावाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PMAnandache Paan : माणूस 'असा' का वागतो? पुस्तकाच्या लेखिका Anjali Chipalkatti यांच्यासोबत खास गप्पा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
Embed widget