एक्स्प्लोर

खादाडखाऊ : पुणे ते पुणे व्हाया पाबे घाट

बहुतेकांना शनिवार-रविवारी आपली गाडी बाहेर काढून पुण्यापासून तास-दोन तासावर भटकण्यात, तिथे एखाद्या ‘हटके’ स्पॉटला जेवून रात्री घरी परत येण्यात जास्ती रस असतो. त्यांना ‘फ्री-सजेस्ट’ करायला माझ्याकडे इतरांपेक्षा काही वेगळी ठिकाणं असायची. त्यातला एक म्हणजे हा रूट.

आठवड्याचे 6 दिवस काम करा आणि उरलेला सुट्टीचा 1 दिवस घरातली कामे करा! हा काळ मागे पडून एव्हाना एखादे दशक झालंय. घराची तेवढी कामं ऑनलाईन करून टाकायची, राहिलेली संध्याकाळी/रात्री घरी गेल्यावर आणि शनिवार-रविवार हा वेळ फॅमिली किंवा मित्रपरिवाराला द्यायचा हा पुण्यासारख्या अनेक शहरातला आवडता प्रोग्राम झालाय. त्यामुळे ”फ़ाईव्ह डेज-विक”च्या ह्या जमान्यात विकेंडचे वेध आजकाल बुधवारपासूनच लागतात आणि शुक्रवारी दुपारपर्यंत ‘विकेंडला’ कुठे जायचं, ह्याचं प्लॅनिंग ठरलेलं असतं. टुरिझममध्ये पिकनिक रेंटल देताना माझ्याकडे अश्या ठिकाणांची जंत्री तयार असायची. पण त्यातूनही काहींना बाहेर जाऊन 1 दिवस राहून यावं, इतका वेळ नसतो. पण ह्यापैकी बहुतेकांना शनिवार-रविवारी आपली गाडी बाहेर काढून पुण्यापासून तास-दोन तासावर भटकण्यात, तिथे एखाद्या ‘हटके’ स्पॉटला जेवून रात्री घरी परत येण्यात जास्ती रस असतो. त्यांना ‘फ्री-सजेस्ट’ करायला माझ्याकडे इतरांपेक्षा काही वेगळी ठिकाणं असायची. त्यातला एक म्हणजे हा रूट. पुण्यातून बाहेर पडून सातारा रस्ता पकडावा, कात्रजच्या बोगद्यातून आपण शिंदेवाडीत पोचतो. नॅशनल हायवेचा भाग असलेला पुणे-सातारा रस्ता पहिल्यापासूनच प्रचंड रहदारीचा. त्यातून वाट काढत पुण्यातून कात्रज बोगदा ओलांडून शिवापूरला येईपर्यंतच पूर्वी तासभर जायचा. साहजिकच कमी अंतर जाणाऱ्या गाड्यांचा पहिला थांबा शिवापूर, वेळू ह्या गावात असायचा. आता नव्या बोगद्यामुळे किंवा नवीन गाड्यांमुळे म्हणा तेच अंतर फारच कमी वाटायला लागलंय. पण त्यामुळे इथल्या हॉटेल्समधे घट होण्यापेक्षा त्यात वाढच झाली आहे. पूर्वी शिवापूरला फक्त कमर अली दरवेशबाबाच्या दर्ग्यावर आणि कोरडी भेळ खायला थांबणारी लोकं आता भेळ, पाणीपुरीपासून ते मटण-भाकरीपर्यंत सगळं खायला  शिवापुरात थांबतात. माहिती नसलेल्यांकरता सहज म्हणून, मेहमूदनी ‘बॉम्बे टू गोवा’मध्ये शिवापूरच्या आसपास हायवेवर, तर राज कपूरनी ‘बॉबी’मधले सिन्स शिवापूरच्याच काही हॉटेल्सच्या बाहेर शूट केलेत. शिवापूरची त्यावेळेची हॉटेल्स, जुना हायवे बघायलाही आता गंमत वाटते. ह्या भागातून अनेक वर्ष जाणंयेणं असल्याने इथली अनेक जुनी हॉटेल्स डोळ्यासमोर नव्या रुपात उभी राहिलेली पाहता आली आहेत. आता जुन्या झालेल्या कोंडे देशमुखांच्या ‘मुक्तांगण’ किंवा ‘जय भवानी’सारख्या अनेक हॉटेल्समधल्या खाण्याचा ती सुरु झाल्यापासून पहिल्या आठवड्यात आस्वाद घ्यायचा योग आलाय. त्यातही जय श्रीराम, वनपत्रे बंधूंची सुकी भेळ, कुलकर्णी ह्यांच्याकडची हॉटेलमध्ये सहसा न मिळणारी घोसाळ्याची भजी, अजून लक्षात राहिली आहेत. 2001-02 नंतर हायवे हळूहळू बराच रुंद होत गेला,कात्रजचा नवीन बोगदा झाला.त्यात ‘कलाकार ढाबा’ सारखी अनेक हॉटेल्स नामशेष झाली, तर काहींनी आपली नावं बदलली, काहींनी आपले व्यवसायाचे स्वरूपच बदललं. ह्या रूटवर फेरफटका मारायला बाहेर पडला असाल, तर शिवापूरवरून पुढे जायच्या आधी आमच्या मंगेश काळेच्या ‘साई छाया’मधली मिसळ खाऊन पुढे जाणं इष्ट. जेजुरीला आपल्या मामाकडे हॉटेल व्यवसायाची सुरुवात करणाऱ्या धडपड्या मंगेशनी 7-8 वर्षांपूर्वी ह्या हॉटेलची सुरुवात केली आणि अल्पावधीत अनेक सेलिब्रिटीजनी त्याच्या काळ्या रस्यातल्या मिसळीला भरभरून दाद दिली. मंगेशकडची मिसळ म्हणजे माझ्याही आवडत्या मिसळपैकी एक. मिसळ खाऊन झाल्यावर पुढे गेल्यावर आपली गाडी नसरापूर फाट्याला उजवीकडे आत घ्यावी. दोन-तीन किलोमीटरवर उजवीकडे बनेश्वर देवस्थानाची कमान दिसते. रस्त्याच्या किंचितसे आत असेलेले हे ठिकाण म्हणजे पुण्यातल्या पूर्वीच्या तमाम प्राथमिक शाळांचा पहिली-दुसरीच्या वार्षिक सहली न्यायचे ठिकाण, पुण्यात शिक्षण घेतलेल्या ‘पाल्यांना’ हे आठवतच असेल. खादाडखाऊ : पुणे ते पुणे व्हाया पाबे घाट बनेश्वर वनविहारात गेल्यावर हवेतला ‘पॉझिटिव्ह’ फरक लगेच लक्षात येईलच. गाडीतून उतरून आधी ती स्वच्छ, मोकळी हवा श्वासात भरून घ्यावी आणि पुरातन बनेश्वराच्या महादेवाचं दर्शन घ्यावं. बाहेरच्या कुंडात सोडलेली कासवं बघत दोन घटका निवांत टेकावं. नंतर देवळाच्या शेजारी महाराष्ट्र शासनाच्या वनखात्यानी तयार केलेल्या बागेत फेरफटका मारून यावं. एरव्ही शासनाने ‘मेंटेन’ केलेल्या अनेक गोष्टींना नाक मुरडणारेही, इथे येऊन खुश होताना दिसतात. सिझनमधे इथल्या नर्सरीमध्ये माफक किमतीत विकत मिळणारी रोपं आठवणीकरता विकत घ्यावीत. पार्किंगशेजारी मोजक्या टपऱ्यांवर मिळणारी गरमागरम कांदा भजी, शेतातून नुकत्याच खुडून आणून तळलेल्या ताज्या हिरव्या मिरच्यांचा आस्वाद घ्यावा. आणि गाडी वेल्ह्याच्या दिशेनी वळवावी. वेल्ह्याचा रस्ता म्हणजे मावळातल्या रस्त्याचं ‘टिपिकल’मॉडेल; लांबच लांब जाणारा पण बारीक वळणावळणांचा. पावसाळ्याच्या आसपास गेलात तर जोडीला असते रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेली भाताची शेती. वेल्हा, भोर ह्या भागातली जमीन अतिशय सुपीक आणि तांदूळ प्रचंड चविष्ट आहे. फक्त पूर्वीची ‘आंबेमोहोर’ची लागवड आता ‘इंद्रायणी’ तांदुळावर आली आहे. खादाडखाऊ : पुणे ते पुणे व्हाया पाबे घाट त्यामुळे पावसाळ्यात गेलात तर  दोन्ही बाजूला असलेली भाताची शेती मध्ये थांबायला भागच पाडेल. त्या शेताकडे बघत, थांबत निवांत पुढे निघावं. राजगड फाटा साधारण 30 किलोमीटरवर आहे. त्यामुळे पाहिजे तर वाटेतल्या एखाद्या शेतात, बांधावर उगाचच रेंगाळावं, आसपासच्या घरांच्या बाहेरच सुरु केलेल्या छोट्या हॉटेलमध्ये खऱ्याखुऱ्या गावरान भोजनाचा आस्वाद घ्यावा. मावळातल्या ताज्या भाज्या किंवा गावरान कोंबडीच्या रस्याबरोबर शेतातल्या तांदुळाच्या भाकऱ्या, मिरच्यांचा ठेचा खाण्यासाठी कुठल्या भिमथडी जत्रेतच गर्दी करून जायची गरज नसते. इथून निघाल्यावर एकदा पुढच्या रस्त्याचा अदमास घ्यावा (सध्या इथे रस्त्यांची कामे सुरु असल्याने रस्ता काही वेळासाठी बंदही ठेवण्यात येतो). राजगड फाटा सोडून जर्रासे पुढे गेलो की 10 किलोमीटरच्या आसपास पाबे घाटाकडे जाणारा फाटा लागतो. वाटेत रस्त्यांचे माईलस्टोन्स, बोर्ड अगदी व्यवस्थित लावलेले आहेत. ह्या फाट्यावरून पानशेत शेजारचे खानापूर फक्त 20 किलोमीटरवर आहे. घाट रस्ता खूप चांगला नसला तरी अश्या दुर्गम भागात मेहनतीने प्रत्यक्ष रस्ता तयार करणाऱ्यांना सलामच करायला पाहिजे. घाट चढून जाताना वेल्ह्याच्या खोऱ्याचा नजारा दिसला की सगळा शीण ‘टोटल वस्सूल’ होतो. खादाडखाऊ : पुणे ते पुणे व्हाया पाबे घाट घाटाच्या मागे राज्यांच्या पहिल्या राजधानीची राजगडाची पद्मावती माची, शेजारी महाराजांनी पहिल्यांदा सर केलेला प्रचंडगड-तोरणा, पलीकडे सिंहगडचा कल्याण दरवाजा दिसत असतो. घाटमाथ्याच्या आसपास गाडी थांबवायला, फोटो काढायला जागाही बऱ्यापैकी आहे. अगदी घाटमाथ्यावर चहाची एकुलती एक टपरी आहे. चहामध्ये दूध पाहिजेच वगैरे जाचक अटी नसतील तर चहा प्यायला मिळतो. इथून पुढे उतरताना भलताच तीव्र उतार आहे, त्यातून घाट बऱ्यापैकी अरुंद आहे. त्यामुळे गाडी चालवताना काळजी घेतलेली चांगली. पण तो पार केला की आपण थेट खानापूरलाच म्हणजे अगदी पानशेतच्या रस्त्यावरच पोचतो. तिथून उजवीकडे सिंहगड बघत, डोणजे फाट्यावरून सरळ पुण्यात यावं. पुण्यातून निघून परत पुण्यात डेरेदाखल व्हायला साधारण शंभरेक किलोमीटर आणि जेमतेम अर्धा दिवस लागतो. पण नेहमीच्या त्याच ‘विकेंड पार्टी ‘करण्यापेक्षा गाडी घेऊन एक दिवस सह्याद्रीच्या वावरात भटकायचं असेल, मावळातल्या गावरान खाण्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर हा एक मस्त ऑप्शन नक्कीच आहे. बाकी आवड आपली आपली. संबंधित ब्लॉग खादाडखाऊ : पुण्यातील सर्वात बेस्ट 'ठक्कर' दाबेली ब्लॉग : पुणेकरांचा विश्वास-अग्रज खादाडखाऊ : पुण्यातील दोराबजी & सन्स खादाडखाऊ : 'धुंधुरमास' स्पेशल खादाडखाऊ : परफेक्ट दर्शन हुरडा : महाराष्ट्राच्या चवीची ऐतिहासिक ओळख  खादाडखाऊ : सवाईतल्या फूड स्टॉलचा अनुभव खादाडखाऊ : सुरेल सवाईला ‘फक्कड’ करणार चविष्ट, तेही पर्यावरणपूरक मार्गाने खादाडखाऊ : वहुमनचा बाबाजी खादाडखाऊ : पुण्यातले इराणी मित्रो !!! आज खिचडी पुराण खादाडखाऊ : दिवाळीनंतरचे ‘ओरीजनल’ मराठी चटकदार पदार्थ खादाडखाऊ : दिवाळीची खरेदी अन् पुण्यातील खवय्येगिरी!   खादाडखाऊ : अटर्ली बटर्ली पण फक्त डिलीशअस? खादाडखाऊ : जखमा उरातल्या खादाडखाऊ : चायनीज गाड्यांवरचे खाणे आणि अर्थकारण वडापाव -काही आठवणीतले, काही आवडीचे खादाडखाऊ : मराठी पदार्थांसाठी फक्कड खादाडखाऊ : गणेशोत्सवातली खाद्यभ्रमंती आणि बदलत चाललेलं पुणं खादाडखाऊ : गणेशोत्सव आणि मास्टरशेफ खादाडखाऊ : पुण्यातला पहिला ‘आमराई मिसळ महोत्सव’ खादाडखाऊ : खाद्यभ्रमंती मुळशीची खादाडखाऊ : मंदारची पोह्यांची गाडी खादाडखाऊ : आशीर्वादची थाळी खादाडखाऊ : पुण्यातील महाडिकांची गाडी खादाडखाऊ : पुन्हा एकदा लोणावळा खादाडखाऊ : ‘इंटरव्हल’ भेळ आणि जय जलाराम खादाडखाऊ : ‘तिलक’चा सामोसा सँपल खादाडखाऊ : प्रभा विश्रांतीगृहाचा अस्सल पुणेरी वडा ब्लॉग : खादाडखाऊ : हिंगणगावे आणि कंपनी खादाडखाऊ : पुण्यातील 106 वर्षं जुनी ‘वैद्यांची मिसळ’! खादाडखाऊ: खाद्य इतिहास पुण्याचा
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबई महानगरपालिकेतील सर्व विजयी उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबईतील सर्व विजयी उमेदवारांची यादी
मोठी बातमी! भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजय; दहीसरमध्ये ठाकरेंना 'दे धक्का'
मोठी बातमी! भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजय; दहीसरमध्ये ठाकरेंना 'दे धक्का'
लातुरात काँग्रेसकडून भाजपला 'दे धक्का'; संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांची मुलगी आघाडीवर
लातुरात काँग्रेसकडून भाजपला 'दे धक्का'; संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांची मुलगी आघाडीवर
Chhatrapati Sambhjinagar: मतमोजणीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा, पोलिसांकडून कार्यकर्त्याला लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?
मतमोजणीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा, पोलिसांकडून कार्यकर्त्याला लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबई महानगरपालिकेतील सर्व विजयी उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबईतील सर्व विजयी उमेदवारांची यादी
मोठी बातमी! भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजय; दहीसरमध्ये ठाकरेंना 'दे धक्का'
मोठी बातमी! भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजय; दहीसरमध्ये ठाकरेंना 'दे धक्का'
लातुरात काँग्रेसकडून भाजपला 'दे धक्का'; संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांची मुलगी आघाडीवर
लातुरात काँग्रेसकडून भाजपला 'दे धक्का'; संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांची मुलगी आघाडीवर
Chhatrapati Sambhjinagar: मतमोजणीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा, पोलिसांकडून कार्यकर्त्याला लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?
मतमोजणीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा, पोलिसांकडून कार्यकर्त्याला लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?
Maharashtra Zilla Parishad Election 2026: इकडं मनपा निवडणुकीचा निकाल तिकडं आजपासून जिल्हा परिषदांची रणधुमाळी आजपासून रंगणार
इकडं मनपा निवडणुकीचा निकाल तिकडं आजपासून जिल्हा परिषदांची रणधुमाळी आजपासून रंगणार
Jalgaon Election Result 2026: जळगाव महापालिकेत महायुतीचा बोलबाला? बहुतांश उमेदवार आघाडीवर, कोण ठरणार किंगमेकर? वाचा एका क्लिकवर...
जळगाव महापालिकेत महायुतीचा बोलबाला? बहुतांश उमेदवार आघाडीवर, कोण ठरणार किंगमेकर? वाचा एका क्लिकवर...
Nashik Election Results 2026: कायद्याच्या बालेकिल्ल्यात मतदानादरम्यान जोरदार राडा, पण एकही गुन्हा दाखल नाही, चर्चांना उधाण
कायद्याच्या बालेकिल्ल्यात मतदानादरम्यान जोरदार राडा, पण एकही गुन्हा दाखल नाही, चर्चांना उधाण
Pune municipal corporation election results 2026 : याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो
याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो
Embed widget