एक्स्प्लोर
Advertisement
BLOG : अंडरवर्ल्डशी लढणारा स्वत:सोबत मात्र हरला!
3 मे रोजी अचानक व्हॉट्सअॅपवर हिमांशू रॉय यांचा Congrats असा मला मेसेज आला...
राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक हिमांशू रॉय जेव्हापासून सुट्टीवर होते तेव्हाही माझं त्यांच्याशी फोनवर बोलणं व्हायचं. मी आणि माझा सहकारी गणेश ठाकूर नेहमी त्यांच्या प्रकृतीची आवर्जून विचारपूस करायचो. महिन्याभरातून एकदा तरी आम्ही त्यांना फोन करायचोच. त्यांनाही बरं वाटायचं. ते जेव्हा क्राईम ब्राँचचे सहआयुक्त होते तेव्हा त्यांना अनेक पत्रकार फोन करायचे. पण दुर्धर आजारामुळे ते जेव्हा मोठ्या सुट्टीवर गेले त्यावेळी आमच्या काही मोजकेच लोकं त्यांच्या संपर्कात होते. पण मागील काही दिवसांत त्यांच्याशी बोलणं झालं नव्हतं. पण 3 मे रोजी अचानक व्हॉट्सअॅपवर हिमांशू रॉय यांचा Congrats असा मेसेज आला.
कारण की, एक दिवस आधी जे डे यांच्या खून खटल्यात छोटा राजनला दोषी ठरवत मी दिलेल्या साक्षीचं कौतुकही केलं होतं. हेच वाचून त्यांनी माझं अभिनंदन केलं होते. या खटल्यात त्यांनीच मला साक्षीदार बनवलं होतं.
हिमांशू रॉय आणि माझी ओळख साधारण 2002 साली झाली. त्यावेळी ते मुंबई पोलीसच्या झोन 1 चे डीसीपी होते. पण मी, गणेश आणि त्यांची खरी मैत्री झाली ती हनुमानजींमुळे. मुंबई पोलीस आणि क्राईम बीट कव्हर करणाऱ्या सर्व पत्रकारांना माहिती आहे की, हिमांशू रॉय यांना हनुमान या दैवताबद्दल प्रचंड आस्था होती. आपल्या कार्यालयात, घरी त्यांनी हनुमानाचे अनेक कलात्मक फोटो लावले होते.
यामुळेच त्या दिवसांमध्ये क्राईम ब्रांचच्या कार्यालयाला लोकं मस्करीत हनुमान मंदिरही म्हणायचे. हनुमानाशी निगडीत बरचंस साहित्यंही त्यांनी वाचलं होतं. जर त्यांना पुरेसा वेळ असेल त ते हनुमानाच्या वेगवेगळ्या मुद्रा यावर प्रचंड आत्मयतीने चर्चा करायचे. हनुमानाच्या प्रतिमेनेच प्रेरित होऊन त्यांनी आपलं शरीरही तसंच कमावलं होतं. त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आपल्या व्हॉट्सअॅपचा डीपी हा हनुमानाचा फोटोच ठेवला होता. माझी आणि गणेशची हनुमानविषयी नितांत श्रद्धा आहे. आम्ही नेहमी नाशिक जवळच्या अंजनगड पर्वतावर ट्रॅकिंगलाही जातो. येथील स्थानिकांच्या मते, हे ठिकाण हनुमानाचं जन्मस्थळ आहे. तशा दंतकथाही सांगितल्या जातात.
एके दिवशी आमचा बोलता-बोलता सहज हा विषय निघाला. त्यावेळी आम्ही त्यांना सांगितलं की, तिथले रस्ते आणि मंदिर यांची परिस्थिती फारच वाईट आहे. त्यावेळी ते म्हणाले होते की, ‘त्या जागेसाठी मला काही तरी स्वत:हून करायचं आहे. जर याबाबत मला आधी माहित पडलं असतं तर नाशिकचा पोलीस आयुक्त असतानाच मी काही तरी केलं असतं.’ पण अंजनेरी जाऊन काही करण्यापूर्वीच त्यांना कर्करोगानं गाठलं.
जे डे खून खटल्यात साक्षीदार बनवण्यापूर्वी 2011 साली पाकमोडिया स्ट्रीट शूटआऊट केसमध्येही मी साक्षीदार होते. ज्यामध्ये दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या ड्रायव्हर ठार झाला होता. याप्रकरणी कोर्टात माझी तब्बल तीन दिवस साक्ष सुरु होती. पहिल्या दिवसाच्या साक्षी आधीच रॉय यांचा मला फोन आला. ‘जीतेंद्रजी, उद्या तुमची साक्ष होणार आहे. मी स्पेशल ऑपरेशन स्क्वॉड (SOS) तुम्हाला संरक्षण देण्यास सांगितलं आहे.’
त्यावेळी मी संरक्षण घेण्यास नकार दिला. तर त्यांनी माझ्यावर दबाव टाकला. ‘हे पाहा, मी संरक्षण घ्यायला सांगतोय, घ्या. तुम्हाला सांगायची गरज नाही की, ते लोकं किती घातक आहेत.’ माझ्याविषयी असणारी चिंता त्यांच्या आवाजात मला स्पष्टपणे जाणवत होती. मी असाही विचार केला की, मी घाबरुन साक्ष देणार नाही म्हणून ते मला संरक्षण देऊ करत आहेत. अखेर मी संरक्षण घेतलं. दुसऱ्याच दिवशी कोर्टात साक्षीला येण्याआधीच AK-47 असलेला एका SOS कमांडो माझ्यासोबत आला. तो संपूर्ण दिवस माझ्यासोबत सावली सारखा होता. मी संरक्षण तर घेतलं पण मला फार विचित्र वाटत होतं. मी दुसऱ्या दिवशीच्या साक्षीसाठी जाण्याआधी जेव्हा मला SOS प्रमुखांचा फोन आला तेव्हा मी त्यांना कमांडो पाठवू नका असं सांगितलं. यामुळे त्यावेळी रॉय साहेब मला थोडे नाराज दिसले.
त्यांच्या आजारपणातही माझं त्यांच्याशी बोलणं व्हायचं. बोलताना ते नेहमी आशावादी वाटायचे. मला तरी कधीच वाटलं नाही की, ते नैराश्यात असतील. मधल्या काळात ते बऱ्यापैकी रिकव्हर झाले होते. पण पुन्हा एकदा कॅन्सरने डोकं वर काढलं. पण असं म्हणतात की, त्यातही आता सुधारणा होत होती. त्यांच्या मनात काय सुरु होतं हे त्यांनी कधीही सांगितलं नाही. खाकी वर्दीत ते जितके कणखर दिसायचे तेवढाच कणखरपणा त्यांच्या आवाजातही होता. त्यांच्याशी जेव्हा माझं बोलणं संपायचं तेव्हा आम्ही म्हणायचो ‘हनुमानजी सारं काही ठिक करतील.’
त्यांच्या मृत्यूनंतर अनेक लोकं त्यांच्याशी निगडीत वादही उकरुन काढत आहेत. पण खरं आहे. एकेकाळी ते महाराष्ट्र पोलिसांमधील सर्वात वादग्रस्त अधिकारी होते. पण नाशिकहून मुंबईत बदली झाल्यानंतर त्यांच्यात बरेच बदल झाले होते.
मुंबई पोलीस क्राईम ब्राँच प्रमुख आणि एटीएस प्रमुख या त्यांच्या यशाने त्यांनी आपल्याशी निगडीत वाद पुसून टाकले. हिमांशू रॉय यांच्या जाण्याने महाराष्ट्र पोलिसांनी एक कर्मठ आणि रिझल्ट देणार एक मोठा अधिकारी गमावला आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
नागपूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement