एक्स्प्लोर

बोस्टन टी पार्टी आणि चाय पे चर्चा

बोस्टन. अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स राज्याची राजधानी. कोपऱ्या कोपऱ्यावर विद्यापीठं आणि कोपऱ्या कोपऱ्यावर इतिहासाच्या पाऊलखुणा मिरवणारं शहर. याच शहरात एक राष्ट्र म्हणून अमेरिकेचा जन्म झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ‘बोस्टन टी पार्टी’नंच अमेरिकन राज्यक्रांतीची खऱ्या अर्थानं सुरूवात झाली होती. या शहरात इतिहास जणू थिजून राहिला आहे आणि भविष्याचं सावटही घोंगावतंय. बोस्टनची सैर करायची, तर सर्वात चांगला पर्याय आहे डक टूर. डक म्हणजे DUKW. अर्थात पाण्यात आणि जमिनीवर चालणारी Amphibian वाहनं. दुसऱ्या महायुद्धात सैनिकांची आणि सामनाची ने-आण करण्यासाठी या वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला होता. १९९४ पासून असे काही डक्स पर्यटकांना शहराचा सैर-सपाटा घडवून आणण्यासाठी वापरले जातायत. आणि डक चालवणारे ड्रायव्हर्स-कम-टूरिस्ट गाईड्सही मोठे मजेशीर आहेत. आमच्या गाईडच नाव होतं ‘फ्रिम जॉली’. बोस्टन टी पार्टी आणि चाय पे चर्चा आपल्या खास शैलीत फ्रिमनं आम्हाला बोस्टनमधल्या ऐतिहासिक जागांविषयी, इमारतींविषयी माहिती दिलीच, पण आसपासच्या घटनांविषयी त्याची मतंही मजेदार होती. युरोपातून इथं स्थलांतर केलेल्या लोकांनी - इमिग्रंट्सनी कशी बोस्टनची उभारणी केली हे सांगताना इमिग्रंट्स या शब्दावर त्यानं दिलेला जोर, लक्षात राहिला आहे अजूनही. एकीकडे ट्रम्प समर्थकांची इमिग्रंट्सना देशातून बाहेर काढण्याची भाषा आणि दुसरीकडे आपला देशच इमिग्रंट्सनी बनलाय हे सांगणारा फ्रिम. विशेष म्हणजे फ्रिमनं इमिग्रंट्सचा उल्लेख केल्यावर डकमधले अनेक अमेरिकन्सही स्मितहास्य करत होते. तसं इथले सामान्य नागरीक अनोळखी लोकांसमोर सहसा आपलं राजकीय मत थेटपणे मांडत नाहीत. पण कधी कधी जाता जाता एखादं वाक्य बोलतात, ज्यामुळं त्यांच्या मनात खदखद सुरू असल्याची जाणीव होते. फ्रिमला आणि आमच्या सहप्रवाशांना पाहून तेच जाणवतं. बोस्टनच्या रस्त्यांवरून फिरताना मध्येच आमचं डक चार्ल्स नदीत शिरलं आणि ट्रकची लगेच बोट बनली. अमेरिकेतली सर्वात स्वच्छ शहरी नदी म्हणून चार्ल्स नदीची ओळख आहे. याच नदीकाठावर अडीचशे वर्षांपूर्वी असंतोषाची ठिणगी पडली होती आणि त्यातूनच अमेरिका हे राष्ट्र जन्माला आलं, हे सांगताना फ्रिमच्या डोळ्यांत आणि आवाजात अभिमान दाटला होता. बोस्टन टी पार्टी आणि चाय पे चर्चा अभिमान वाटावा, अशा अनेक गोष्टी बोस्टनवासियांकडे आहेत. विद्यापीठं असोत, शतकांपूर्वीच्या इमारती असोत वा तिथं घडलेल्या घटना. बोस्टननं आपला वारसा जपून ठेवला आहे. ‘बोस्टन टी पार्टी’चाही त्याला अपवाद नाही. बोस्टनच्या आणि अमेरिकेच्याच नाही, तर जगाच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या घटनांपैकी एक म्हणजे बोस्टन टी पार्टी. 1773 साली ब्रिटिश सरकारनं ईस्ट इंडिया कंपनीला * कुठलाही कर न भरता अमेरिकन वसाहतींमध्ये चहा विकण्याची परवानगी दिली होती. पण वसाहतींमधल्या व्यापारावर ब्रिटनचं असं नियंत्रण अमेरिकन राष्ट्रवाद्यांना – पॅट्रियट्सनी मान्य नव्हतं. त्याचा निषेध करण्यासाठी १६ डिसेंबरच्या संध्याकाळी सॅम्युएल अॅडम्सच्या नेतृत्त्वाखाली क्रांतीकारक एकत्र जमले. पण बैठकीनंतर जमावानं बोस्टनच्या बंदरात घुसून तीन्ही जहाजांवरचा जवळपास तीनशे टन चहा समुद्रात फेकून दिला. या घटनेनं अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्याला वेग मिळाला होता. बोस्टनच्या बंदरात ज्या परिसरात ही घटना घडली, तिथं आता बोस्टन टी पार्टी म्युझियम उभारण्यात आलं आहे. १६ डिसेंबर १७७३च्या त्या संध्याकाळचा सगळा घटनाक्रम इथं दररोज पुन्हा उभा केला जातो आणि संग्रहालयाला भेट देणाऱ्यांना त्या बोस्टन टी पार्टीत सहभागी होण्याचीही संधी मिळते. एकूण काय, तर तुम्ही थेट १७७३मध्ये जाऊन पोहोचता. बोस्टन टी पार्टी आणि चाय पे चर्चा संग्रहालयात प्रवेश करताच बोस्टन टी पार्टीची नायिका ‘सारा ब्रॅडली’नं आमचं स्वागत केलं आणि मी भारतातून आले आहे म्हटल्यावर ‘ईस्ट इंडिया कंपनी तिथेही त्रास देते आहे लोकांना’ अशी टिप्पणीही केली. सॅम्युएल अॅडम्सचं भाषण ऐकल्यावर, जहाजांवर आक्रमण केल्यावर आणि चहाचे खोके समुद्रात बुडवल्यावर आम्ही एका दालनात पोहोचलो. तिथं किंग जॉर्ज आणि सॅम्युएल अॅडम्सच्या बोलक्या पोर्ट्रेट्सनी आणि होलोग्राफ्सनी पुढचा घटनाक्रम उभा केला. मॅसॅच्युसेट्सच्या नागरिकांनी अमेरिकन क्रांतीमध्ये कसं योगदान दिलं होतं ते दाखवणारी फिल्मही पाहिली. टूर संपल्यावर साराशी बातचीत करण्याची संधी मिळाली. (तिचं खरं नावही साराच आहे.) रोज इतिहास जगणाऱ्या व्यक्तींना आजच्या अमेरिकेविषयी, ट्रम्पच्या अमेरिकेविषयी काय वाटतं, याविषयी मला उत्सुकता वाटत होती. बोस्टन टी पार्टी आणि चाय पे चर्चा साराला इतिहास जास्त आवडतो. लोकांनी इतिहासाविषयी जाणून घ्यायला हवं असं तिचं मत आहे. ‘तुम्ही कुणीही असाल, कुठल्याही देशाचे असाल, तुमची राजकीय किंवा वैचारिक भूमिका काहीही असेल, तरी इतिहासाची जाणीव ठेवायला हवी. लोकांमध्ये मतभेद आहेत. असायलाच हवेत. पण आपण आपली ही वेगवेगळी मतं का मांडू शकतो, याचं उत्तर इतिहासात आहे. इतिहास आपल्याला आपल्या गौरवशाली पार्श्वभूमीची आठवण करून देतो, तसंच चुकांची जाणीवही करून देतो.’ साराला विचारलं, आज तू सारा ब्रॅडलीची भूमिका साकारते आहेस, पण अजून २०० वर्षांनी लोक अशी आजच्या नेत्यांची भूमिका साकारतील का? सारा खळखळून हसली आणि म्हणाली, ‘काळच सांगेल काय ते, आत्ता विचारही करवत नाही.’ बोस्टन टी पार्टी आणि चाय पे चर्चा बोस्टन टी पार्टीच्या दिवशी तीन जहाजांमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारचा चहा भरला होता, त्या  प्रकारच्या चहांची चव चाखण्यासाठी म्युझियममध्ये खास टी रूम आहे. तिथं चहापान करताना एक इटालियन जोडपं भेटलं आणि आम्हा तिघांची चाय पे चर्चा सुरू झाली. मार्को आणि रोझा नेपल्सचे रहिवासी आहेत आणि सध्या बोस्टनमध्ये शिकणाऱ्या मुलाला भेटण्यासाठी आले आहेत. ‘मुलानं अमेरिकेत शिकण्याचा निर्णय घेतला खरा, पण आता इथं सगळ्याच परदेशी विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळणं जड जाईल अशी भीती वाटते आहे. आधीच ब्रेक्झिट, त्यात इटलीतही युरोपपासून वेगळं होण्याची मागणी सुरू आहे, आता अमेरिकेत काय होईल काही सांगता येत नाही.’ कुठल्याही भीतीपेक्षा किंवा असुरक्षिततेच्या भावनेपेक्षा ही अनिश्चितता अनेकांना जास्त त्रास देते आहे. टी पार्टी म्युझियमजवळच बंदरावर बोटींसाठीचा धक्का - अॅटलांटिक व्हार्फ आहे. तिथं खाडीच्या किनाऱ्यावर बेंचेस टाकले आहेत. दुपारच्या वेळेस बोस्टनियन्स तिथं ऊन खात बसतात. या बेंचेसजवळच बोस्टन बंदराची माहिती देणारे फलक आहेत. 1919 साली बोस्टनमध्ये डिस्टिलरीतील स्फोटात टँक फुटल्यानं काकवीचा पूर आला होता. त्याआधी 1872 आणि 1760 साली मोठ्या आगींमध्ये बंदर भस्मसात झालं होतं. मार्को आणि रोझासोबत मीही ती माहिती वाचत होते. बोस्टन टी पार्टी आणि चाय पे चर्चा आमच्यासोबत म्युझियमची सफर करणारा आणि एवढा वेळ आमची चर्चा ऐकणारा एक अमेरिकन पर्यटक न राहावून म्हणाला, “Boston has rebuilt itself again and again. It has endured the Great Fires. America will endure it too”, अमेरिका यातूनही बाहेर पडेल. -    जान्हवी मुळे
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune traffic Update: थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर
थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर
Pune Mahanagarpalika Election 2026: 15 जागांची यादी पाहून भाजपने विषयच सोडला, पुण्यात शिवसेना-भाजपची युती कशी तुटली, वाचा इनसाईड स्टोरी
15 जागांची यादी पाहून भाजपने विषयच सोडला, पुण्यात शिवसेना-भाजपची युती कशी तुटली, वाचा इनसाईड स्टोरी
BJP Candidate : भाजपच्या दिग्गज नगरसेवकांना धक्का, तरुण कार्यकर्त्यांना संधी; पुण्यात निम्म्या विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, नागपुरात 11 तरुण नवे चेहरे
भाजपच्या दिग्गज नगरसेवकांना धक्का, तरुण कार्यकर्त्यांना संधी; पुण्यात निम्म्या विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, नागपुरात 11 तरुण नवे चेहरे
Prakash Surve : एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार, वॉर्ड 4 आणि 5 मधून कोण रिंगणात?
एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report
Zero Hour Full : तिकीट न मिळाल्यानं कार्यकर्त्यांच्या नाराजीचा महापालिका निकालांवर किती परिणाम?
Chhatrapati SambhajiNagar BJP तिकीट का कापलं? निष्ठावंतांच्या भावनांचा कडेलोट, आयारामांना झुकतं माप?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune traffic Update: थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर
थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर
Pune Mahanagarpalika Election 2026: 15 जागांची यादी पाहून भाजपने विषयच सोडला, पुण्यात शिवसेना-भाजपची युती कशी तुटली, वाचा इनसाईड स्टोरी
15 जागांची यादी पाहून भाजपने विषयच सोडला, पुण्यात शिवसेना-भाजपची युती कशी तुटली, वाचा इनसाईड स्टोरी
BJP Candidate : भाजपच्या दिग्गज नगरसेवकांना धक्का, तरुण कार्यकर्त्यांना संधी; पुण्यात निम्म्या विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, नागपुरात 11 तरुण नवे चेहरे
भाजपच्या दिग्गज नगरसेवकांना धक्का, तरुण कार्यकर्त्यांना संधी; पुण्यात निम्म्या विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, नागपुरात 11 तरुण नवे चेहरे
Prakash Surve : एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार, वॉर्ड 4 आणि 5 मधून कोण रिंगणात?
एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार
Chhatrapati Sambhaji Nagar Rashid Mamu: चंद्रकांत खैरेंच्या नाकावर टिच्चून छत्रपती संभाजीनगरध्ये रशीद मामूंनी उमेदवारी मिळवलीच, अंबादास दानवेंची सरशी
चंद्रकांत खैरेंच्या नाकावर टिच्चून छत्रपती संभाजीनगरध्ये रशीद मामूंनी उमेदवारी मिळवलीच, अंबादास दानवेंची सरशी
Suspense Thriller Marathi Movie Case Number 73: चार खून, शून्य पुरावे... मुखवट्यामागील गडद रहस्य 'केस नं. 73'; डोकं भंडावून सोडणारा मराठी सिनेमा
चार खून, शून्य पुरावे... मुखवट्यामागील गडद रहस्य 'केस नं. 73'; डोकं भंडावून सोडणारा मराठी सिनेमा
India Women vs Sri Lanka Women, 5th T20I: टीम इंडियानं श्रीलंकेचा धुव्वा उडवला; वर्ल्डकपपूर्वी 5-0 ने व्हाईटवाॅश देत निर्विवाद वर्चस्व
टीम इंडियानं श्रीलंकेचा धुव्वा उडवला; वर्ल्डकपपूर्वी 5-0 ने व्हाईटवाॅश देत निर्विवाद वर्चस्व
बांगलादेशच्या माजी पीएम खालिदा झिया यांचे निधन; पाकिस्तानात नजरकैद, गोळीबारात वाचल्या, पीएम होताच भारताचा विरोध
बांगलादेशच्या माजी पीएम खालिदा झिया यांचे निधन; पाकिस्तानात नजरकैद, गोळीबारात वाचल्या, पीएम होताच भारताचा विरोध
Embed widget