एक्स्प्लोर

Bad Boy ते Captain सिनेमाच्या स्क्रिप्टप्रमाणे आहे हार्दिक पांड्याची स्टोरी...

भारत हा सिनेमावेड्यांचा देश आहे असं म्हटलं तर चूकीचं ठरणार नाही, कारण भारत या एका देशात कितीतरी भाषांमध्ये कितीतरी सिनेमे रिलीज होत असतात. अशा या सिनेमावेड्यांच्या देशाच्या क्रिकेट टीममध्ये एक असा खेळाडू आहे, ज्याची लाईफ स्टोरीच अगदी एखाद्या सिनेमाच्या स्क्रिप्टप्रमाणे आहे...हा खेळाडू म्हणजे कुंग फू पांड्या अर्थात हार्दिक पांड्या...

तर पूर्वीपासूनच टीम इंडियाला एका चांगल्या पेसर ऑलराऊंडरची गरज आहे. महान क्रिकेटर कपिल देव यांच्यानंतर ही कमी खास कोणी भरु शकलं नाही...पण 2016 साली संघात एन्ट्री केलेला हार्दिक पांड्या ही कमतरता कुठेतरी भरुन काढत असल्याचं आपण मागील काही वर्षे पाहतोय...पण दुखापतीमुळे मागील काही काळ फॉर्मबाहेर गेलेला हार्दिक आता पुन्हा फॉर्मात परतलाय आणि टीम इंडियासह भारतातील क्रिकेटप्रेमींना दिलासा मिळालाय. पण दुखापतीतून सावरुन पुन्हा फॉर्मात आलेल्या हार्दिकची स्टोरी केवळ दुखापत आणि त्यावर मात इतकीच नसून कितीतरी चढ-उतारांसह रंगतदार आहे. त्यात हालाखीच्या परिस्थितीतील बालपण, क्रिकेट खेळण्यासाठी घेतलेली अपार मेहनत, एन फॉर्मात असताना नको त्या कॉन्ट्रवर्सीत अडकून संघाबाहेर जावं लागण आणि मग दुखापत अशा एक न अनेक संकटांचा समावेश आहे. पण स्वत:वरचा कॉन्फीडन्स आणि कष्टाच्या जोरावर सगळ्या संकटावर मात देऊन आज हार्दिक उभा आहे संघासाठी एक स्टार ऑलराऊंडर बनून...

तर हार्दिकच्या प्रवासाचा विचार केला तर सर्वात आधी त्याच्या बालपणीबद्दलचा विचार येतो...एका मुलाखतीत हार्दिक आणि त्याचा भाऊ कृणाल मॅगी खाऊनही दिवस काढत असल्याचं हार्दिकनं सांगितलं होतं... त्यावरुन त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज येतो.. तर 11 ऑक्टोबर, 1993 रोजी गुजरातच्या सुरतमध्ये जन्माला आलेला हार्दिक मोठा भाऊ कृणालसोबत बालपणीपासून क्रिकेटचे धडे गिरवत होता. घरची परिस्थिती त्यावेळी तशी चांगलीच होती... वडिलांचा गाड्यांचा बिझीनेस चांगला चालला होता.. पण मुलांच्या क्रिकेटसाठी ते सुरतहून बडोद्याला शिफ्ट झाले... आणि बसा-बसवलेला व्यवसाय तोट्यात जाऊ लागला... घरची परिस्थिती हलाखीची झाली दोन वेळच्या जेवनासाठीही संघर्ष सुरु झाला... पण या सर्वातही हार्दिकनं क्रिकेट सोडलं नाही...वेगवेगळ्या गावी जाऊन क्रिकेट स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी हार्दिक करतच होता, 2012-13 च्या सुमारास हार्दिक अवघ्या 19 व्या हार्दिक पांड्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली.

17 मार्च 2013 ला बडोद्याकडून मुंबईविरुद्ध हार्दिक पहिला सामना खेळला. त्यानंतर वर्षभरात त्याला बडोद्याकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्याची संधीही मिळाली. 2013 ते 2015 दरम्यान, हार्दिकनं देशांतर्गत क्रिकेटमध्ये कमाल अशी ऑलराऊंडर कामगिरी केली ज्यानंतर भारतीय क्रिकेट जगताला त्याची दखल घ्यावीच लागली आणि आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सनं 2015 मध्ये पांड्याला संघात सामिल केलं... आणि पुढे जाऊन हार्दिक संघाची ओळख बनला...आयपीएलमध्ये चमकल्यावर 2016 मध्ये टीम इंडियामध्ये हार्दिकनं एन्ट्री केली.  26 जानेवारी 2016 ला टी-20 सामन्यातून टीम इंडियामध्ये हार्दिकनं पदार्पण केलं. त्याच्या एंट्रीनं अखेर टीम इंडियाला वेगवान ऑलराऊंडर खेळाडू मिळाला.  मग लगेचच 16 ऑक्टोबर 2016 रोजी तो भारताच्या एकदिवसीय संघातगी आला आणि जुलै 2017 मध्ये त्याला कसोटी संघात खेळायची संधीही मिळाली.

तेव्हापासून आतापर्यंत हार्दिकनं आपली एक वेगळी स्टाईल कायम ठेवत गरज पडेल तिथे संघाला मदत केली आहे. कारण  क्रिकेटर म्हटलं की त्याच्याकडून चांगल्या बॅटिंगची, बॉलिंगची आणि सोबत फिल्डींगची अपेक्षा संघासह चाहत्यांना असते, पण या तिन्ही कसोट्यांवर खरे उतरणारे खेळाडू काहीच असतात, त्यातीलच एक हार्दिक आहे. पण इतक्या कठीण परिस्थितीतून येऊन कमाल क्रिकेट खेळूनही हार्दिकची संकटं संपली नव्हती.. त्याच्या डेरिंगबाज आणि बेधडक स्वभावामुळे इथवर आलेला हार्दिकला बेधडक बोलनंच थोडं अडचणीचं ठरलं आणि 2019 साली कॉफी विथ करन शोवर हार्दिकच्या कॉन्ट्रोवर्सियल वक्तव्यामुळे त्याला थेट टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवला गेला. कमालीच्या फॉर्मात करीयरच्या पिक टाईमवर असताना हार्दिकला संघातून बाहेर जावं लागलं.. सर्व क्रिकेट जगतातून त्याच्यावर टीका होऊ लागली... बॅड बॉय म्हणून हार्दिक बदनाम झाला... पण त्याने धीर सोडला नाही.. मी या सर्वातून माझ्या खेळाच्या जोरावर बाहेर पडेण असं हार्दिक भाऊ कृणालला म्हणाला आणि 2019 च्या आयपीएलमध्ये करीयरच्या हायस्ट अॅव्हरेजनं रन करत हार्दिकनं टीकाकारांची तोंड बंद केली. सोबतच आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागत त्यानं मोठं मनही दाखवलं... ज्यानंतर पुन्हा हार्दिक चमकू लागला..

पण मी सुरुवातीलाच बोलोय तसं अगदी सिनेमाच्या स्क्रिप्टप्रमाणे हार्दिकची स्टोरी आहे.. आणि सिनेमांत चढउतार असणारचं.. तसंच आता दुखापत नावाचा व्हिलेन हार्दिकसमोर आला  2018 मधली पाठीची दुखापत हार्दिकला पुन्हा सतावू लागली.. त्याच्या फॉर्मवरही याचा फरक पडला 2020-21 साली हार्दिक हवी तशी चमकदार कामगिरी करु शकला नाही... पण आयपीएल 2022 हार्दिकसाठी टर्निंग पॉईंट ठरला.. हार्दिकने नव्याने सामिल गुजरात टायटन्स संघाचं नेतृत्त्व खांद्यावर घेतलं आणि संघाला ट्रॉफी जिंकवून देत हार्दिकनं फलंदाजीसह गोलंदाजीतही जबरदस्त कामगिरी करून दाखवली. त्यानं 487 धावा करत 8 विकेट्सही घेतल्या ज्यानंतर टीम इंडियात दिमाखात हार्दिकनं पुनरागमन केलं.

भारताच्या आयर्लंड दौऱ्यात टी-20 संघाचा कॅप्टन झाला. विशेष म्हणजे भारतानं 2-0 च्या फरकानं ही मालिका जिंकली देखील... ज्यानंतर आशिया कपच्या सलामीच्या सामन्यात हार्दिकनं पाकिस्तानविरुद्ध विजयी षटकार ठोकत वर्ल्डकपसाठी मी तयार आहे अशी सिंहगर्जनाच केली...ज्यामुळे आता हार्दिक टीम इंडियाचा कणा झाला असून बोलिंग आणि बॅटिंग दोन्ही डिपार्टमेंटमध्ये त्याच्याकडे मोठी जबाबदारी आहे... आता हार्दिकची ही सारी कहानी पाहिली तर त्याने सर्व संकटावर मात देत इथवर मजल मारली आहे, ज्यामागे त्याच्या एका सवयीचा मोठा वाटा आहे.. ती म्हणजे कोणत्याही परिस्थितीत स्वत:वर विश्वास ठेवायचा... अगदी बालपणीच्या हलाखीच्या परिस्थितीपासून ते कॉन्ट्रोवर्सी आणि दुखापत अशा साऱ्या संकटामध्ये पांड्याचा कॉन्फीडन्स तीळभरही कमी झाला नव्हता... ज्यामुळेच तो या साऱ्यातून बाहेर निघालाय.. त्यामुळे हार्दिकडून आपण सारेच सेल्फ कॉन्फीडन्स नक्कीच शिकू शकतो...

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
Khel Ratna And Arjuna Awards : मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
Ahilyanagar Crime :  नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
Fact Check: भाजप नेत्यांकडून आपच्या अवध ओझांचा सिसोदियांना 'घाबरट' म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल, दावा ठरला खोटा, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
आपचे नेते अवध ओझांनी मनीष सिसोदियांना घाबरट म्हटल्याच्या दावा खोटा, एडिटेड व्हिडीओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast | राज्यातील बातम्यांच्या सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर | Superfast News | 17 January 2025ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 03 PM 17 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्सSaif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीLadki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHA

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
Khel Ratna And Arjuna Awards : मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
Ahilyanagar Crime :  नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
Fact Check: भाजप नेत्यांकडून आपच्या अवध ओझांचा सिसोदियांना 'घाबरट' म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल, दावा ठरला खोटा, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
आपचे नेते अवध ओझांनी मनीष सिसोदियांना घाबरट म्हटल्याच्या दावा खोटा, एडिटेड व्हिडीओ व्हायरल
Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
High court: पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Embed widget