GT vs SRH IPL 2025: फटक्यांचे प्रदर्शन, गिल, बटलर, अभिषेक, सुदर्शन

GT vs SRH IPL 2025: काल झालेल्या गुजरात विरुद्ध हैदराबाद या सामन्यात पाहायला मिळाले ते डोळ्यांना आनंद देणारे क्रिकेट मधील फटके...साई सुदर्शन वेळोवेळी दाखवून देत आहे त्याचा काय दर्जा आहे...चेंडूच्या अगदी जवळ जाऊन खेळणे...सुंदर पद लालित्य आणि अफलातून टायमिंग..या गोष्टीवर तो या स्पर्धेत धावा जमवत आहे...काल हरभजन सिंग सुद्धा म्हणाला की मी पैसे मोजून जर कोणाची फलंदाजी पाहीन तर ती साई सुदर्शनची...आज शमी ने टाकलेल्या तिसऱ्या षटकात त्याने शमि ला मैदानाच्या सर्व भागात फिरवून आणून पाच चौकार मारले.. शमीने टाकलेला प्रत्येक चेंडूवर सुदर्शन कडे उत्तर होते...भाविषात जर कसोटी सामन्यात शुभमन आणि सुदर्शन सलामीला आले तर ती क्रीडारसिकांसाठी मेजवानी असेल...क्रिकेट मधे दोन्ही सलामीचे फलंदाज शैलीदार असणे ही घटना क्वचित असते...भारताकडून सचिन गांगुली..सचिन सेहवाग..अशा जोड्या पाहायला मिळाल्या..
आजच्या सामन्यात सर्वच फटके पाहायला मिळाले...गिल जेव्हा खेळतो तेव्हा त्याचे काही ट्रेडमार्क फटके असतात...शॉर्ट आर्म पुल हा त्याचा आवडता फटका...तो इतका सहज खेळतो..त्याच बरोबर इनसाइड आउट...कट.. फ्लिक , लोफ्टेड ड्राईव्ह या फटक्यांची आज त्याने अहमदाबाद मध्ये बरसात केली...त्याला आज पुन्हा एकदा बटलर याने साथ दिली..बटलर जेव्हा फिरकी आणि वेगवान गोलंदाजांस सरळ त्यांच्या डोक्यावरून खेळतो तेव्हा त्याचे मोठेपण समजून येते..
या आय पी एल स्पर्धेत प्रत्येक सामन्यात निरनिराळे विक्रम होतात....आज सुदर्शन याच्या २००० धावा तर बटलर याच्या ४००० धावा पूर्ण झाल्या...त्याच बरोबर ही आय पी एल स्पर्धा झेल सोडण्याचा एक नको असलेला विक्रम करीत आहे... प्रत्येक सामन्या गणिक सरासरी तीन झेल सुटत आहेत..स्पर्धा संपल्यावर दोनशे झेल सोडणारी आय पी एल अशी सुद्धा ओळख होऊन जाईल...
गुजरात संघाकडून गिल, बटलर,सुदर्शन हे तिघे जण उत्तम फलंदाजी करीत आहेत. आज पुन्हा एकदा याच तिघांमुळे गुजरात संघ ,दोनशे पार झाला..त्याला हैदराबा द संघाचे गचाळ क्षेत्ररक्षण सुद्धा काही अंशी कारणीभूत आहे...
२२५ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या हैदराबाद संघाने आक्रमक सुरुवात केली..हेड चांगल्या फॉर्म मध्ये आहे असे वाटत असतानाच एका आखूड टप्प्याच्या चेंडूवर डीप स्क्वेअर लेग सीमारेषेवर रशीद ने अप्रतिम झेल घेतला.. आज पुन्हा एकदा अभिषेक फटक्यांची श्रीमंती दाखवून गेला...तो खेळत असलेल्या सिराज च्या पहिल्या चेंडूवर डीप एक्स्ट्रा कव्हर वरून षटकार खेचून त्याने आजच्या खेळाची सुरुवात केली..तो डावखुरा असल्या कारणाने जेव्हा तो मोठ्या फॉलो थ्रू ने षटकार खेचतो तेव्हा तोंडातून वाह येते...त्याने आज आपल्या ७४ धावांच्या खेळीत सहा षटकार मारले...पण त्याला अपेक्षित कोणाची साथ मिळाली नाही...आणि त्यांनी सर्धेतील सातवा पराभव पाहिला.. गुजरात संघाकडून आज पुन्हा एकदा प्रसिद्ध ने अप्रतिम गोलंदाजी केली. .या स्पर्धेत बॅक ऑफ लेंथ गोलंदाजी करून तो आणि मुंबईचा हार्दिक बळी मिळवित आहेत ..आज नेहरा गुरुजींनी सुद्धा त्यांना आखूड टप्प्याची गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला होता..प्रसिद्ध ने चार षटकात केवळ १९ धावा देऊन दोन बळी घेतले...२०/२० सामन्यात ही कामगिरी एखाद्या शतकापेक्षा कमी नव्हती...म्हणूनच तो सामनावीर ठरला. स्पर्धा अंतिम टप्प्यात आहे ..दोन .तीन चार..पाच क्रमांकावरील संघ मुंबई संघापेक्षा एक सामना कमी खेळला आहे...त्यांना प्ले ऑफ ची संधी थोडी अधिक आहे..मुंबई संघाला जर प्ले ऑफ मध्ये जायचे असेल..तर त्यांनी लॉ ऑफ एव्हरेजेस खोटा ठरविला पाहिजे.

























