एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

बाप्पा माझा

कोकणातला गणेशोत्सव माझ्या हृदयाच्या जवळ आहे. इथला गणपती अजून कमर्शिअल झालेला नाही किंवा तो मुंबईसारखा इन्स्टंट आणि वेगवानही नाही. तो परंपरा जपतो. डेकोरेशनही पारंपरिक. देवघरात मंडपी बांधण्याची पद्धत आहे. मंडपी म्हणजे बाप्पाच्या डोईवरचं छत. तेरडा, सुपारी, हिरणीची फुलं, थोडक्यात त्या काळात उपलब्ध असलेल्या निर्सगातल्या सौंदर्याने बाप्पालाही सजवलं जातं. आणि इथला बाप्पा चित्रशाळेतून घरी डोईवरुनच येतो. कोकणात आजही मुंबईतल्यासारखा बाप्पा पोटाशी धरुन आणला जात नाही.

या वर्षी गणपती कधी आहेत..? सप्टेंबरला का..? मग आपल्याला जून-जुलै महिन्यातच बुकिंगचं बघावं लागेल. शनिवार-रविवार जोडून आहेत का..? मग तशी सुट्टी टाकायला. घरात नव्या वर्षाचं कॅलेंडर आलं की हा संवाद ठरलेलाच. कारण कोकण, कोकणातली माणसं आणि त्यांचा लाडका गणपती हे खास नातं आहे. त्याच्याशी वर्षभारतली ही अपॉईमेंट ठरलेली. त्यात कोणताच बदल नाही. किंवा कॉम्प्रमाईज नाही. गावातला गणेशोत्सव कोकणातल्या प्रत्येक माणसाचा हळवा आणि स्वप्नाळू कोपरा. कोकणात जावं तर गणेशोत्सवातच. या बद्दल माझं दुमत नाही. मी नशिबवान आहे असं म्हणते कारण मला कोकणातला म्हणजे अगदी तळ कोकणातला गणेशोत्सव लहानपणापासून जवळून अनुभवायला मिळतो. बाप्पा माझा गणपतीत कोकणातल्या गावी जाण्याची मजा काही वेगळीच. लहानपणी, शाळा, अभ्यास, क्लास, सुट्ट्या या कसलंच टेन्शन नसायचं. पण या काळात म्हणजे २०-२५ वर्षांपूर्वी मला आणि ताईला गणपतीसाठी गावी घेऊन जाणं आई-पप्पांसाठी खूप त्रासदायक होतं. तेव्हा कोकण रेल्वेची चैन नव्हती, गावात लाईट नव्हते, रस्त्यांचा पत्ता नाही, आमची गाई-गुरं नसल्यानं ताब्यांभर दूध मिळवणंही मुश्किल. रस्ता नसल्यानं घरापर्यंत एसटी नाहीच. एकदम करेक्ट सांगता येणार नाही पण मुख्य हायवेपासून घरी पोहोचण्यासाठी किमान तीनेक किलोमीटर्सची पायपीट ठरलेली. आणि हो, तेव्हा या प्रवासात पाऊस आत्तासारखा भाव खात नव्हता, तर तो धो-धो बरसायचा. माझं गावं सावडाव, खलांत्री वाडी. कणकवलीपासून सहा मैलांवर. माझ्या लहानपणी एसटीतून आम्ही जानवली किंवा हुंबरटला उतरायचोय तिथे चहाचं टपरीवजा दुकान होतं, कदाचित आताही असेल!  तिथे चवीला पांचट आणि गोड चहा प्यायचो आणि वाट तुडवायला(  तीन किलोमीटरची) सुरुवात. आजोबा आम्हाला घ्यायला यायचे. या प्रवासातली सगळ्यात भारी आठवण म्हणजे एका वहाळाची. वहाळ म्हणजे पाण्याचा छोटा ओढा. कोकणातल्या गावागावात असे लहान-मोठे वहाळ तुम्हाला बघायला मिळतील. पावसाच्या दिवसात या वहाळाला तुफान पाणी असायचं. त्याच्यावर पूल नव्हता. पप्पा किंवा आजोबा आम्हाला उचलून घ्यायचे. कोसळणारा पाऊस, पाण्यातनं काढायची वाट, हातातलं सामान आणि छत्री. प्रचंड करसतीचा हा प्रवास मला जाम थ्रिलींग वाटायचा. त्या वहाळाच्या पाण्याचा आवाज मात्र त्या वयात भीतीदायकच होता. काही वर्षांनी या वहाळावर साकव (पूल) बांधला आणि तो थ्रिलींग प्रवास तिथेच संपला. बाप्पा माझा गावी रात्री जाम भीती वाटायची. कारण गावात लाईटच नव्हते. कंदील आणि पेट्रोमॅक्सच्या बत्तीत आपण गावी दिवस काढलेत यावर आज सांगूनही विश्वास बसत नाही. जेवतानाची एक गंमत म्हणजे गावचा हातसडीचा तांदूळ लाल असतो, हा लाल भात आम्ही खाणार नाही यासाठी पसरलेलं भोकाड लख्ख आठवतंय. आणि आज जरा डाएट कॉन्शिअस झाल्यावर गावावरुन येताना तब्येतीला चांगला असलेला तोच UNPOLISHED तांदूळ माझ्यासाठी घेऊन ये असं आईला सांगताना जाम हसू येतं. खरंतर गावात आणि कोकणात जायच्या प्रवासात टप्प्याटप्यानं बदल होत गेले. कोकण रेल्वे आणि इतर सोयींमुळे गावाला जाणं खूपच आरामदायी बनलंय. गावी जाताना आता लालपरीची साथ सुटलीय. गावापर्यंत किंबहुना घरापर्यंत रस्ता झालाय. रिक्षा, गाड्या अगदी सहज उपलब्ध होतात. कणकवली रेल्वे स्टेशनवरुन अवघ्या अर्ध्या तासात घरी पोहोचता येतं. गावात लाईट तर केव्हाच आलेत, अगदी स्ट्रीट लाईटमुळे गणपतीच्या काळात दिवाळीचा भास होतो. गावची आणखी एक भारी आठवण म्हणजे पाण्याची. लहानपणी घरात पाण्याचा नळ नव्हता. खरंतर पाणी योजनाच नव्हती. त्यामुळे विहिरीवरुन पाणी भरण्याचं कम्पलशन असायचं. सकाळी उठलं की घरातले मोठे आणि आम्ही पोरं-टोरं पाणी मिशनवर. तासाभराचा हा कार्यक्रम झाला की मग बाकीची कामं. संध्याकाळी घरातलं पाणी संपलं तर पुन्हा मिशनवर निघायचं. आज विहीरीवर पंप बसलाय आणि घरी नळाला पाणी आहे. नगरपंचायतीचं पाणीही दोन तास असतं. आता विहिर सुनी पडलीय. फक्त शास्त्रापुरतंच तिकडे जाणं होतं. आणि लहानपणीच्या पाणी भरण्यासाठी घेतलेल्या छोटे हंडे-कळशा माळ्यावर पडून आहेत. बाप्पा माझा या झाल्या बाकीच्या गप्पा. कोकणातला गणेशोत्सव माझ्या हृदयाच्या जवळ आहे. इथला गणपती अजून कमर्शिअल झालेला नाही किंवा तो मुंबईसारखा इन्स्टंट आणि वेगवानही नाही. तो परंपरा जपतो. आजही घराघरातून नागपंचमीच्या दिवशी गणपतीच्या पाटाची पूजा करुन पाट मूर्तीकाराकडे जातो. हा मूर्तीकार, मूर्तीची ठेवण बऱ्यापैकी ठरलेली असते. डेकोरेशनही पारंपरिक. देवघरात मंडपी बांधण्याची पद्धत आहे. मंडपी म्हणजे बाप्पाच्या डोईवरचं छत. तेरडा, सुपारी, हिरणीची फुलं, थोडक्यात त्या काळात उपलब्ध असलेल्या निर्सगातल्या सौंदर्याने बाप्पालाही सजवलं जातं. आणि इथला बाप्पा चित्रशाळेतून घरी डोईवरुनच येतो. कोकणात आजही मुंबईतल्यासारखा बाप्पा पोटाशी धरुन आणला जात नाही. गणेशोत्सवातला महत्त्वाचा दिवस म्हणजे गौरी आगमन आणि पूजनाचा. गौराई आगमन आणि पूजन हे दोन्ही दिवस सुपरफास्ट स्पीडनं संपतात. गौराईसाठी खास नैवेद्य. भाजणीचे वडे, काळ्या वाटाण्याचं सांबार, लापशी, पाच प्रकारच्या भाज्या, भाकरी, पाल्याची भाजी आणि लापशी. या सगळ्याची चव त्या दिवशी काही वेगळीच लागते. बाप्पा जायच्या दिवशी पुन्हा मोदकांसह सगळं साग्रसंगीत जेवण. बाप्पा निघताना त्याच्यासोबत पुढच्या 11 महिन्यांची शिदोरीही बांधून देण्याची पद्धत इकडे आहे. गावातले सगळे बाप्पा एकत्र येतात आणि आम्हाला बाय-बाय म्हणतात. हा निरोपाचा क्षण खूप भावूक करुन जातो. बाप्पा माझा नशिबानं गावा-गावातल्या गणेशोत्सवांना अजूनही पारंपरिकपणाची झालर आहे. मुंबईत न भेटणारे लोक गावात भेटतात. निर्सग मुक्तहस्तानं हिरव्या रंगाची उधळण करत असताना बाप्पा येतो आणि पुढच्या वर्षभरासाठीचं जगणं रंगीबेरंगी करुन जातो. बाप्पा, आता तर सिंधुदुर्गात विमानही आलंय. प्रवास सोप्पा हाईल, वेळ वाचेल, परिसराचा विकासही वेग पकडेल. पण तुझा उत्सव असाच राहुदे. तू पळू नको. तू असाच आरामात, निवांत आमच्याकडे असलेला आम्हाला आवडतोस. गेली दोन वर्ष तुझ्यासाठी कोकणात येणं जमलं नाहीये रे मला. पण तुझं आगमनच इतकं हर्षोल्हासाचं की कुठेही असो या दिवसात जीव तुझ्यातच गुंततो.
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवारांनी राष्ट्रवादीची बैठक बोलावली, पण आमदार दांडी मारण्याची शक्यता; शरद पवार गटात परतण्याच्या चर्चांना उधाण
अजित पवारांनी राष्ट्रवादीची बैठक बोलावली, पण आमदार दांडी मारण्याची शक्यता; घरवापसीच्या चर्चांना उधाण
लोकसभा निवडणुकीत राज्यात 'वंचित फॅक्टर' निष्प्रभ, 36 मतदारसंघात डिपॉझिट जप्त
लोकसभा निवडणुकीत राज्यात 'वंचित फॅक्टर' निष्प्रभ, 36 मतदारसंघात डिपॉझिट जप्त
महायुतीच्या पराभवाचे पडसाद दिल्लीत, पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील खासदारांशी वन टू वन संवाद; चुका सुधारण्याचा सल्ला
महायुतीच्या पराभवाचे पडसाद दिल्लीत, पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील खासदारांशी वन टू वन संवाद; चुका सुधारण्याचा सल्ला
Sunil Lahri on BJP Ayodhya : अयोध्येत भाजपचा पराभवाने 'रामायण'मधील लक्ष्मणचा संताप, हिंदू समुदाय म्हणजे....
अयोध्येत भाजपचा पराभवाने 'रामायण'मधील लक्ष्मणचा संताप, हिंदू समुदाय म्हणजे....
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Kolhapur Shivrajyabhishek 2024 : शाहू महाराजांच्या उपस्थितीत पार पडतोय शाही शिवराज्याभिषेक सोहळाAjit Pawar NCP Election Result 2024 : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पराभवानंतर अस्वस्थता?Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार; पंतप्रधान मोदी, अमित शाह यांची भेट घेणारABP Majha Headlines : 09 AM : 06 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवारांनी राष्ट्रवादीची बैठक बोलावली, पण आमदार दांडी मारण्याची शक्यता; शरद पवार गटात परतण्याच्या चर्चांना उधाण
अजित पवारांनी राष्ट्रवादीची बैठक बोलावली, पण आमदार दांडी मारण्याची शक्यता; घरवापसीच्या चर्चांना उधाण
लोकसभा निवडणुकीत राज्यात 'वंचित फॅक्टर' निष्प्रभ, 36 मतदारसंघात डिपॉझिट जप्त
लोकसभा निवडणुकीत राज्यात 'वंचित फॅक्टर' निष्प्रभ, 36 मतदारसंघात डिपॉझिट जप्त
महायुतीच्या पराभवाचे पडसाद दिल्लीत, पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील खासदारांशी वन टू वन संवाद; चुका सुधारण्याचा सल्ला
महायुतीच्या पराभवाचे पडसाद दिल्लीत, पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील खासदारांशी वन टू वन संवाद; चुका सुधारण्याचा सल्ला
Sunil Lahri on BJP Ayodhya : अयोध्येत भाजपचा पराभवाने 'रामायण'मधील लक्ष्मणचा संताप, हिंदू समुदाय म्हणजे....
अयोध्येत भाजपचा पराभवाने 'रामायण'मधील लक्ष्मणचा संताप, हिंदू समुदाय म्हणजे....
मुख्यमंत्र्यांचा गड भेदला, अवघ्या 25 व्या वर्षी खासदार; कोण आहेत संजना जाटव ज्यांची होतेय देशभरात चर्चा!
मुख्यमंत्र्यांचा गड भेदला, अवघ्या 25 व्या वर्षी खासदार; कोण आहेत संजना जाटव ज्यांची होतेय देशभरात चर्चा!
सातारच्या समाज कल्याण अधिकारी सपना घाळवेंना लाच घेताना अटक, शिक्षण संस्थेकडे मागितली होती लाच
सातारच्या समाज कल्याण अधिकारी सपना घाळवेंना लाच घेताना अटक, शिक्षण संस्थेकडे मागितली होती लाच
राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, कोकणासह मध्य महाराष्ट्रात सरी; मान्सून कधी येणार?
राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, कोकणासह मध्य महाराष्ट्रात सरी; मान्सून कधी येणार?
T20 WC 2024 : कोण गेल, कोण धोनी ? रोहित शर्मापुढे सगळेच फेल, हिटमॅननं षटकारांचा केला मोठा विक्रम
T20 WC 2024 : कोण गेल, कोण धोनी ? रोहित शर्मापुढे सगळेच फेल, हिटमॅननं षटकारांचा केला मोठा विक्रम
Embed widget