एक्स्प्लोर

होमिओपॅथीचे जनक (ख्रिस्तिअन फ्रेड्रिक सम्युअल हॅह्नेमॅन)

होमिओपथिक औषधाचा योग्य वापर करुन अनेक शस्त्रक्रियाही टाळता येऊ शकतात, हे सिद्ध झाले आहे. तसेच आजकाल त्रासदायक ठरलेल्या विषाणूजन्य आजारांवर चिकुनगुनिया,डेंग्यू, काविळ, कांजण्या, गोवर, आदी आजारावर ही औषधे गुणकारी आहेत. आपण माझ्या चिकुन गुनियावरील संशोधनाबद्दल परिचित आहातच, आज हे कार्य जगभर होत आहे याचा आम्हाला आभिमान वाटतो.

10 एप्रिल हा दिवस वैद्यकीय क्षेत्रातल्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे. दि. 10 एप्रिल 1755 या दिवशी ख्रिस्तिअन गोत्फ्रिएड हॅह्नेमॅन (Christian Gottfried Hahnemann ) यांच्याकडे एक बालकाचा जन्म झाला या बालकाने ख्रिस्तिअन फ्रेड्रिक सम्युअल हॅह्नेमॅन (Christian Fridrich Samuel Hahnemann ) पुढे वैद्यकीय क्षेत्रात क्रांती करून होमिओपथि या वैद्यकीय शाखेचा शोध लावून संशोधन करुन मानवतेच्या हितासाठी व आजारी रुग्णासाठी आयुष्य वेचलं. त्यांनी आयुष्यामध्ये अनेक अडचणीचा सामना करत आपल्या निश्चयावर ठाम राहून या वैद्यकीय शाखेचे महत्त्व पटवून दिले.   ख्रिस्तिअन फ्रेड्रिक सम्युअल हॅह्नेमॅन यांचा अल्पपरिचय सुरुवातीला घराची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना बालपणी शाळा शिकता आली नाही. आई-वडिलांनी त्यांना घरीच लिहिणे वाचणे शिकवले, त्यानंतर 20 जुले 1767 मध्ये त्यांच्या गावातल्याच प्रिन्स स्कूलमध्ये जावू लागले. त्यांची हुशारी पाहून सर्वजण त्यांना जीव लावत असत, त्यांचे मुल्लर (Dr . muller) नावाचे शिक्षक तर त्यांचा मुलाप्रमाणे सांभाळ करत. वेळप्रसंगी त्याची शाळेची फी सुद्धा ते स्वत: भरत असत. वयाच्या 20 व्या वर्षी पुढील अभ्यासासाठी लेप्सिक (Leipsic) मध्ये वैद्यकिय शिक्षणासाठी रवानगी झाली. परिस्थितीने व वडिलांनी त्यांना एक शिकवण दिली होती, की सर्व गोष्टी अनुभवूनच अंगिकार व चांगल्या गोष्टी लवकर आत्मसात करा . त्यानंतर त्यांनी Verna मध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले व MD पदवी मिळवली. वैद्यकीय सेवा (1779- 1792) या दरम्यानच्या काळात त्यांनी वैद्यकीय व्यवसाय चालू ठेवला पण त्यात त्यांचे मन रमेना, कारण त्यांच्या लक्षात आले कि आपण जो उपचार करत आहोत त्यामध्ये आपण रुग्णाचे पूर्ण समाधान, अथवा रुग्ण पूर्ण बरा करु शकत नाही. आपण फक्त तात्पुरते रुग्णांना बरे करत आहोत. पूर्णत: समाधान देऊ शकत नाही व त्यांना फसवेगिरी जाणवली. त्यामुळे त्याचे सेवांमध्ये रस वाटेना. त्यामुळे त्यांनी काही वैद्यकीय पुस्तके भाषांतर करण्याचे काम सुरु केले दरम्यान भाषांतर करताना एक The Cullens Mataria Medica  नावाचं पुस्तक भाषांतरित करत असताना त्यामध्ये असे आढळून आले की Chincona Bark नावाचे औषध हिवतापासाठी वापरले जाई, पण त्याच्या खालचा मुद्दा असे नमूद केले होते, की जर निरोगी माणसाने त्याचे सेवन जर केले, तर त्यालाही हिवतापासारखी लक्षणे दिसतात, त्यांच्या जिज्ञासू वृत्तीला ते खटकले. त्यांनी स्वत: त्याचा रस पिऊन बघितला, त्यांना हिवतापासारखी लक्षणे जाणवली त्यांनी नंतर घरातील व्यक्तींनाही ते औषध देऊन बघितले. त्यानाही त्याच प्रकारे लक्षणे जाणवली. येथेच होमिओपथि या वैद्यकीय शाखेचा जन्म झाला. त्यानंतर त्यांनी विविध औषधे स्वत:वर तपासून बघितली. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, ज्या औषधामध्ये आजारासारखी लक्षणे तयार करण्याची ताकत आहे, तेच औषध तो आजार बरा करू शकते, हे नैसर्गिकरित्या सिद्ध झाले तो “सम समा समायान्ति” Natur s law of Cure SIMILIA SIMILIBUS CURANTER . त्यानंतर अनेकविध औषधाच्या चाचण्या करुन अनेक प्रकारे अभ्यास करुन काही नियमावली तयार केली, काही सिद्धांत मांडले . दरम्यानच्या काळात विविध समस्यांना प्रतिकार करत त्यांनी आपले संशोधन चालू ठेवले व त्यांची अथक परिश्रमानंतर होमिओपथी हे वैद्यकीय शास्त्र अस्तित्वात आले अशा थोर संशोधकास त्रिवार प्रणाम. होमिओपथिक औषधाचा योग्य वापर करुन अनेक शस्त्रक्रियाही टाळता येऊ शकतात, हे सिद्ध झाले आहे. तसेच आजकाल त्रासदायक ठरलेल्या विषाणूजन्य आजारांवर चिकुनगुनिया,डेंग्यू, काविळ, कांजण्या, गोवर, आदी आजारावर ही औषधे गुणकारी आहेत. आपण माझ्या चिकुन गुनियावरील संशोधनाबद्दल परिचित आहातच, आज हे कार्य जगभर होत आहे याचा आम्हाला आभिमान वाटतो. पुन्हा एकदा अशा थोर संशोधकास त्रिवार वंदन व प्रणाम. (या लेखातील मते लेखकाची वैयक्तिक आहेत.)
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
ABP Premium

व्हिडीओ

Rana vs Owaisi : जास्त मुलं जन्माला घालण्याचा नेत्यांचा सल्ला, राणा Vs ओवैसी भिडले Special Report
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
Embed widget