एक्स्प्लोर

BLOG : अभ्यासोनी प्रकटावे

BLOG : 'आदिपुरुष'चे (Adipurush) संवाद लिहिण्यापूर्वी लेखकाने, ग. दि. माडगूळकर यांचं संपूर्ण गीतरामायण किमान एकदा जरी ऐकलं असतं, तरी असले सवंग आणि छछोर डायलॉग लिहू धजावला नसता.

एका गाण्यात आपल्या दूताने रावणाला काय संदेश द्यायचा हे सांगताना श्रीराम म्हणतात...
उतरविण्या गर्व तुझा ठाकला उभा
शौर्याचा सूर्य राम, सैन्य ही प्रभा
जाळील तव वंश, सर्व राज्य संपदा
शेवटचा करी विचार फिरून एकदा..
नामहि तव भूमीवर कठीण राहणे
आपणिली रामकृपा सुज्ञ बिभिषणे
लंकेच्या भूषवील तोच नृपपदां
शेवटचा करी विचार फिरून एकदा..
या वाक्यांत, या शब्दांत जी जरब आहे, जो सावध करण्याचा सूचक इशारा आहे, विजयाचा जो आत्मविश्वास आहे ती शब्दकळा झेपणारच नाही कदाचित, पण आपण करू ते सर्वश्रेष्ठच या आविर्भावतून मनोज मुंतशीर जरा बाहेर आला असता आणि रामायणाबद्दल बहुश्रुत होऊन लिखाण केलं असतं. एकमेकांचा बाप काढून भांडायला ते काय नाक्यावरचे टपोरी आहेत, की बॉलिवूडच्या पार्टीतले नशेखोर?

हनुमानाच्या शेपटीला आग लावल्यावर काय हाहा: कार उडाला होता, हे सांगताना ग. दि. माडगूळकर म्हणतात...
नगाकार घन दिसे मारुती
विजेपरी तें पुच्छ मागुतीं
आग वर्षवी नगरीवरती
गर्जना करी महावात
पेटवी लंका हनुमंत..
माय लेकरां टाकुन धावे
लोक विसरले नातीं नावें
उभें तेवढें पडें आडवें
अचानक आला कल्पांत
पेटवी लंका हनुमंत..
खड्गे ढाली पार वितळल्या
वीरवृत्ति तर सदेह जळल्या
ज्वाळेमाजीं ज्वाळा मिळाल्या
सघनता होय भस्मसात
पेटवी लंका हनुमंत..
जळतं शेपूट घेऊन प्रासाद आणि गोपूरांवर उड्या मारणारे हनुमंत, त्यामुळे उठलेला आकांत आणि परिस्थिती, जेवढी या शब्दातून कळते, डोळ्यासमोर उभी राहते तेवढी ती उच्च'कोटी' चे व्हीएफएक्स वापरूनही उभी करणं शक्य झालेलं नाही. रावणाच्या दहा तोंडाचा पसारा पाहता, हा रावण आहे की पिसारा फुलवलेला मायावी मोर तेच कळेना..
माझं हे वाक्य कदाचित धाडसी वाटेल, पण 'आदिपुरुष'पेक्षा लहान असताना मी जे बाल हनुमान हे ॲनिमेटेड कार्टून पाहिलंय त्यातही रामायण, त्यातली पात्र, त्यांचे परस्पर संबंध, आणि नात्यातले भाव जास्त सक्षमपणे आणि तरलतेने हाताळले आहेत... म्हणे सिनेमाच्या प्रीमियरला हनुमानासाठी राखीव सीट ठेवली होती. 
'मेघांसम मी अखंड प्राशीन
असेल तेथून श्रीरामायण, 
जोवरी भूवरी राम कथानक
तोवरी जन्म असावा' 
असा वर मागून चिरंजीव होणारे हनुमंत... हे असलं काहीतरी बघून कदाचित हळहळत असतील किंवा पुन्हा एकदा शेपूट पेटवून सिनेमाची संहिता शोधत असतील. 
राम, रामायण आणि रामचरित्र हे लोकांच्या मनामनात आहे. जेवढा भक्तिभाव प्रभू श्री रामांबद्दल आहे, तेवढाच आदर हनुमंतांबद्दलही आहे. नुकतीच अयोध्येत जाऊन आलेय, त्यामुळे हे सगळं जवळून अनुभवलं आहे. त्या पात्रांना हात घालताना आपल्या मनगटी तेवढं सामर्थ्य आहे का? आपले हात पोळणार तर नाहीत ना? किमान एवढं जरी तपासून पाहिलं असतं तरी असं हसं झालं नसतं. 
आता राहिला प्रश्न काही माणसांचा. ओम राऊत ने हिंदुत्ववाद्यांची कशी जिरवली, अपेक्षाभंग केला वगैरे वगैरे म्हणत ही माणसं माकडउड्या मारत आहेत. त्यांना एकच सांगणं आहे की जरी रामायण या अस्मितेच्या अत्यंत जवळच्या विषयावर हा सिनेमा असला तरी जे वाईट आहे त्याला वाईटच म्हणण्याचा सारासार विचार आहे त्यांच्या ठाई. आमचं ते सर्वश्रेष्ठ या आविर्भावात माझ्या परिचयातील एक वगळता फार कोणी नाही. (जे महनीय अपवाद आहेत त्यांना एकच सांगायचं आहे की, तुम्ही करता ते सगळं सर्वश्रेष्ठ असायला तुम्ही काही टाटा किंवा गेला बाजार चितळे नाहीत. त्यामुळे या सिनेमाच्या उदात्तीकरणाचा केविलवाणा प्रयत्न थांबवा.) बाकी ओम राऊत आणि मनोज मुंतशिर यांनी प्रभू श्रीराम आणि हनुमंताचे निस्सीम भक्त असलेल्या समर्थ रामदासांच्या
अभ्यासोनि प्रकटावे । नाही तर झाकोनी असावे ।
प्रकटोनी नासावे । हे बरे नव्हे ॥
या शिकवणीचा एकदा सखोल अभ्यास करायला हवा.

Adipurush Movie Review : अत्यंत निराशाजनक प्रभासचा 'आदिपुरुष'; वाचा रिव्ह्यू...

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
ABP Premium

व्हिडीओ

Navneet Rana Amravati : मी भाजपसाठी काम करते, ठाकरेंची दुकान आता बंद, नवनीत राणांचा घणाघात
CM Devendra Fadnavis : मुंबईत भाजपच मोठा पक्ष, मुख्यमंत्र्यांचा विजयी नगरसेवकांसोबत संवाद
Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
Embed widget