एक्स्प्लोर
'खुशियां बाटनेसे बढती है।'
या जाहिरातीने मला परत एकदा जाहिरातींच्या जगात नेलं. कौतुक वाटतं या जाहिरातदारांचं आणि अशा क्रिएटिव्ह जाहिरातींच्या मागे असणाऱ्या क्रिएटिव्ह लोकांचं. खरंतर कौतुक करावं अशा ब्रँड्सचं जे अशा वेगळा आणि सामाजिक संदेश देणाऱ्या जाहिराती तयार करण्यास प्रोत्साहन देतात.

क्रिकेट मॅच पाहात आरामात घरी बसले होते. दोन ओव्हरमधला तो ब्रेक होता. जाहिरातींचा आवाज बंद करून फक्तं हलणारे चित्र बघत होते.. आणि अचानक एक वेगळी जाहिरात लागली. पण आवाज सुरू करायच्या आधीच त्या जाहिरातीची पंच लाईन, टॅग लाईन आली कुच्छ मिठा होजाये.. खुशियाँ बाटने से बढती है। आणि संपूर्ण जाहिरात कळली.’ खुशियाँ बाटने से बढती है।
या जाहिरातीने मला परत एकदा जाहिरातींच्या जगात नेलं. कौतुक वाटतं या जाहिरातदारांचं आणि अशा क्रिएटिव्ह जाहिरातींच्या मागे असणाऱ्या क्रिएटिव्ह लोकांचं. खरंतर कौतुक करावं अशा ब्रँड्सचं जे अशा वेगळा आणि सामाजिक संदेश देणाऱ्या जाहिराती तयार करण्यास प्रोत्साहन देतात.
आजकाल अनेक वेळा अशा वेगवेगळ्या जाहिराती वेगवेगळ्या सोशल प्लॅटफॉर्मवर पाहिला मिळतात. अशीच अचानक ईदेच्या आदल्या दिवशी ‘सारे मैल धो डालो’ या टॅग लाईन खाली एक जाहिरात पाहिली. त्यात आपल्या जावयाचं कौतुक करणारी सासू मुलावर मात्र नाराज होते. कारण त्याच्या कपड्यांवर अन्नाचे डाग पडलेले दिसतात, तिचा मुलगा सुनला स्वयंपाकात मदत करत असतो. तेव्हा मुलाचे अब्बू मुलाला, आईला तिच्या जावयाकडे परत सोडून येण्याचा सल्ला देतात.. कारण जावई जो कुणा दुसऱ्याचा मुलगा आहे तो जर आपल्या मुलीला घराकामात मदत करत असेल तर त्याचं गोड-कौतुक होतं पण तिथेच आपला मुलगा सुनेला म्हणजे दुसऱ्यांच्या मुलीला घरकामात मदत करीत असेल तर तो जोरु का गुलाम( बायकोच्या पदरा खालचा गुलाम)!!!! इथेच अब्बू थांबत नाहीत तर ते सासूला( बायकोला ) म्हणतात की कपड्यांवरचे डाग धुण्यापेक्षा आपल्या मनावरचे डाग धूणे जास्तं गरजेचे नाही का? या एका वाक्यातून सासूला चूक कळते आणि ती सुनेला मदत करायला निघून जाते.. शेवटी येतं ‘सारे मैल धो डालो’... उत्तम .. काही सेकंदात उत्कृष्टपणे सामाजिक संदेश या जाहिरातीने दिला होता. अर्थात अशा सामाजिक संदेश देणाऱ्या जाहिराती किती पाहिल्या जातात आणि अशा संदेशांचा किती गांभिर्याने विचार केला जातो हा प्रश्नंच आहे.
सारे मैल धो डालो या टॅग लाईन वरून अशीच एक विरुद्ध टॅगलाईन आठवते ती म्हणजे ‘दाग अच्छे होते है।‘ सुंदर गल्ली. त्या गल्लीच्या दोन्ही बाजूला सुंदर घरं. घरांच्या छतावर लपून बसलेली बच्चेकंपनी. प्रत्येकाच्या हातात गुलाल आणि रंग. पाण्याने भरलेल्या बादल्या. जो येईल त्यावर रंगपंचमीच्या निमित्ताने रंग टाकायचा.. तेव्हढ्यात एक लहान मुलगी सायकल चालवत येते. तिच्यावर दोन्ही बाजूंनी रंग आणि पाणी टाकलं जातं.. रंगांचा पाऊस पडावा इतका रंग फेकला जातो.. ती सायकल स्वार मधेच थांबते आणि आपल्या दोस्तांना विचारते.. बस.. संपले रंग?.. छतावरची मुलं गोंधळून जातात त्यांच्याकडचे सगळे रंग संपलेले असतात. पाण्याच्या बादल्याही रिकाम्या असतात.. हे त्या सायकलस्वार मुलीला समजतं आणि आपल्या एका लाहान मित्राला बाहेर बोलावते आणि सायकलवर बसवून त्या मुलाला नमाजासाठी मशिदी समोर सोडते. मित्र आपल्या मैत्रिणीला म्हणतो आलोच हं मी नमाज पढून.. मग खेळू रंग.. काही सेकंदात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश. लहान मुलांमधला निरागसपणा इथे मानाला भावतो. कुठल्याही धर्माचा असो मैत्री ही सर्व श्रेष्ठ आहे हा संदेश.
मैत्री या शब्दावरून आठवलं की काही मैत्री वेगळ्या असतात.. त्या मैत्रीचं रुपांतर नात्यात होतं इतकी घट्ट ती मैत्री असते. पण प्रत्येक नात्याला प्रत्येक मैत्रीला समाजासाठी नाव देणं गरजेचं असतं असं म्हटलं जातं( मी मानत नाही) अशाच मैत्रीची ही जाहिरात.. ज्यात एक नातं निर्माण झालय आणि हे नातं त्यांना जगासमोर आणायचंय. काही वर्षांपूर्वी अचानक सोशल मिडियावर पाहायला मिळालेली जाहिरात..‘आय डू नॅट वाँट टू हाईड नाऊ’.. असं म्हणत तिने मूका घेतला.. आणि घट्ट मिठी मारली. एका ऑनलाईन फॅशन स्टोरची सोशल मिडियावरची जाहिरात. या जाहिरातीच्या सुरवातीलाच एक स्त्री तयार होतांना दाखवली जाते .. नवीन कपडे घालतेय..काजळ लावतेय.. बाजूलाच तिची मैत्रिण सोफ्यावर पहुडलेली दिसतेय... तिच्याकडून कुठले कानातले घालू याचा सल्लाही ती घेतेय.. हे सगळं अगदी साधं आणि सरळ वाटतं.. यात काय नवीन असा ही विचार मनात डोकावून जातो.. शेवटी कपड्यांचीच जाहिरात.. पण तेव्हढ्यात या जाहिरातीला वळण मिळतं.. दुसरी स्त्री पहिल्या तयार होण्याऱ्या आपल्या मैत्रीणीला विचारते.. तुला खात्री आहेना?.. तुझा विचार पक्का आहे? मग ती तयार होणारी मैत्रीण आपल्या विचारणाऱ्या मैत्रीणीला हळूच जवळ घेते.. तिच्या केसातून हळूच अलगद हात फिरवते.. कपाळावर चूंबन घेत म्हणते.. ‘yes! I am ready.. and now I don’t want to hide this anymore’.. व्हा!! अप्रतिम जाहिरात.. नव्या जगाची बिंधास्त जाहिरात. जे नातं समाज नकारतय तेच नातं इथे समाजाने स्विकारण्याची तयारी दाखवली आहे.. कारण या नात्या बद्दल तिच्या अस्तित्वा बद्दल, लेस्बियन असण्याचं सत्य आज ती तिच्या अप्पांना म्हणजे वडिलांना सांगणार होती.. जगाला सांगणार होती.. असं बोल्ड भाष्य या जाहिरातीच्या माध्यमातून आपल्याला मिळतं.. हीच आजची स्त्री.. दुती चांद.. अंतरराष्ट्रीय धावपटू.. तिने वेगवेगळ्या अंतरराष्ट्रीय स्पर्धेतून भारताला अनेक पदक मिळवून दिले आहेत. अशी ही दुती चांद जिने काही महिन्यांपूर्वी प्रत्येक वर्तमानपत्राचे मथडे गाजवले होते. कारण होतं तिने, तिचं समलैंगिक असणं निडर होऊन जगा समोर आणलं होतं. अनेकांनी तिच्या या निर्णयाचे स्वागत केले होते. आनेकांनी तिच्या या निर्णयाला पाठिंबा दिला होता. पण तरीही ती मनातून अस्वस्थ होती. कारण तिच्या मोठ्या बहिणेने तिच्या आईला या नात्या बद्दल नेमकं काय सांगितलंय याची कल्पना नव्हती. दुतीने एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या मुलाखतीत सांगितलं होतं. . ‘की माँला मी सांगितलं तर तिने माझ्यावर विश्वास ठेवला आणि फक्त घराण्याची आणि गावाची अब्रू जाईल असं काही करू नकोस हे म्हणाली. या वरून माझ्या नात्या बद्दल तिला किती कळलं आहे आणि काय सांगितलं गेलंय हे समजत नाही.’ समाजाची भीती आजही अनेक कुंटुंबाच्या मनात दडली आहे. ज्यामुळे समलैंगिक असणं हे सहज पालक किंवा आप्तस्वकीय समजून घेऊ शकत नाहीत. आणि म्हणून अशा बोल्ड आणि सामाजिक विषयांना हात घालणाऱ्या जाहिराती महत्वाच्या ठरतात.
अशा अनेक जाहिराती, नात्यातला गुंता समजावणाऱ्या, नवीन पिढीला आपलसं करणाऱ्या मात्र जुन्या पिढीचे संस्कार पकडून ठेऊन जगासमोर आपला संदेश व त्या माध्यमातून आपला ब्रँड लोकांसमोर आणणाऱ्या आहेत. दाद द्यायला हवी अशा क्रिएटिव्ह जाहिरातदारांना. हे सगळं आठवत असतांना परत ती जाहिरात टीव्हीवर आली.. या वेळीस आवाज म्यूट नव्हता.. लहानगा मुलगा आपल्या मोठ्या भावाला जो बॅटिंग करत असतो त्याला आपल्या उत्तम बॉलिंगने बाद करतो आणि जल्लोष करतो. त्याचा भैय्या नाराज होत एका हातात बॅट तर दुसऱ्या हातात बॉल घेऊन त्याला बॅट देण्यासाठी हात पुढे करतो.. पण त्याची नाराजी या लहानग्याला कळते आणि तो बॉल हातात घेऊन.. चलो एक चान्स और म्हणत मिश्किल हसतो.. भैय्या देखील खूश.. याच जोड-गोळीची काही महिन्यांपूर्वी जाहिरात आली होती.. हाच लहानगा आपलं संपलेल्या कॅडबरी डेअरी मिल्क चॉकलेटचा चुरगळलेला कागद टेबलावर ठऊन देवाकडे आणखिन एका चॉकलेट देण्याची विनवणी करत असतो. अचानक तो कागद जाऊन त्या जागी नवी चॉकलेट येतं आणि त्याचा आनंद गगनात मावत नाही. हा आनंद तो आपल्या भैय्याला सांगतो जो अभ्यास करत असतो.. माझ्यासाठी देखील मागायचं असतं ना.. असं भैय्या म्हणतो. आणि हा लाहनगा पुढल्यावेळीस नक्की म्हणून पळून जातो. त्यावर हा बदमाश लहानगा नुस्ताच भैय्या आपल्या हातातलं चुरगळलेलं चॉकलेटचं रॅपर पाहातो. आई म्हणते मी टाकू? आणि हसते.. ‘कुच्छ अच्छा हो जाये, कुच्छ मिठा हो जाये..खुशियां बाटने से बढती है।‘
ही टॅग लाईन या जाहिरातीच्या जगाला अगदी साजेशी आहे.. काही सेकंदात या ना अशा अनेक जाहिराती आपल्याला आनंद देऊन जातात हेच खरं.
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
व्यापार-उद्योग
मुंबई



















