एक्स्प्लोर

BLOG: भर सभेत हिजाब काढून फेकणाऱ्या अफगाणिस्तानच्या राणीची गोष्ट!

BLOG: अफगाणिस्तान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते जीव मुठीत घेऊन पळणारे अफगाणी, इथे तालिबान्यांसोबत राहण्यापेक्षा काहीही भविष्य नसलेल्या वाटेवरनं जीव की प्राण असलेला देश सोडणारे नागरिक अन् स्त्री म्हणून  वाट्याला येणाऱ्या तालिबान्यांच्या क्रूर शिक्षांची भिती डोळ्यात दिसणाऱ्या महिला. महिला एकटी बाहेर पडली म्हणून, शिक्षण घेतलं म्हणून, नोकरीवर गेली म्हणून किंवा मग नखशिखांत बुरखा नाही घातला तर तालिबानी किती छळ करतील याच भीतीच्या सावटाखाली अफगाणी महिला आता जगत आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर दिसतोय तो फक्त अंधकार आणि उध्वस्त होत चाललेलं वर्तमान.

तालिबान्यांच्या भीतीने अफगाणिस्तानच्या एकमेव गर्ल्स बोर्डिंग स्कुलची कागदपत्रं संस्थेच्याच  एका महिलेने भीतीपोटी काही दिवसांपूर्वी जाळली. तालिबान्यांनी महिला अँकरला कामावर येऊ नको असं सागितलं. मुलींनी शिक्षण घ्यायचं नाही, मुला मुलींनी एकत्र यायचं नाही, पुरुषाशिवाय स्त्रीने बाहेर पडायचं नाही असे अन्यायकारक फतवे तालिबान्यांकडून निघतायत. त्यामुळे अफगाणी महिलांप्रती सहानुभूती व्यक्त करण्यापलीकडे आपण काहीच करु शकत नाही.

पण याच अफगाणिस्तानमध्ये जवळपास 100 वर्षांपूर्वी एक अशी महिला होऊन गेली की जिने धर्मांध आणि रुढीवाद्यांच्या तोंडावर हिजाब काढून फेकला होता असं कोणी आता म्हटलं तर कदाचित खोटं वाटेल, पण हे खरं आहे.

एक काळ असा होता जेव्हा अफगाणिस्तानमधली परिस्थिती एकदम वेगळी होती. अफगाणिस्तान काळापेक्षाही आधुनिक होता ते एका महिलेमुळे. आज जेव्हा अफगाणिस्तानमधल्या महिलांना नखशिखांत बुरख्याची सक्ती केली जात असताना. याच अफगाणिस्तानमध्ये महिलांनी बुरखा घालू नये आणि पुरुषांनी एकाहून अधिक लग्न करु नये असा प्रगत विचार करणारी एक स्त्री अफगाणिस्तानात होती. तिचं नावं होतं  सोराया तार्जी. अफगाणिस्तानची राणी, बादशाह आमीर अमानुल्लाह खान यांची ती पत्नी. अमानुल्ला खान यांनी अफगाणिस्तानला ब्रिटिश साम्राज्यापासून स्वतंत्र केलं. सन 1919 साली त्यांनी स्वतंत्र अफगाणिस्तानची घोषणा केली.

जेव्हा सोरायांनी भर सभेतच हिजाब काढून फेकला...
राणी सोरायाने अफगाणिस्तानात 1921 मध्ये 'मस्तुरात स्कूल' नावाने पहिली  मुलींची शाळा स्थापन करुन स्वतःच्या दोन मुलींना त्या शाळेत पाठवून एक आदर्श निर्माण केला. इतकंच नाही तर उच्च शिक्षणासासाठी याच शाळेतल्या मुलींना त्यांनी परदेशात सुद्धा पाठवलं. त्याकाळात अविवाहित मुलींना शिक्षणासाठी बाहेर पाठवणं हा निर्णय खूप क्रांतिकारी होता. स्त्रियांचे शिक्षण आणि स्वातंत्र्याच्या त्या प्रखर पुरस्कर्त्या होत्या. सोराया आणि अमानुल्लाह यांनी बुरखा आणि बहुपत्नीत्वाविरोधात अभियान राबवलं.

एकदा जाहीर सभा सुरु होती. अमानतुल्ला जनतेला संबोधित करत असताना त्यांनी म्हटलं,  इस्लाम महिलांना आपलं शरीर, चेहरा झाकण्याचा किंवा बुरखा घालण्याचा आदेश देत नाही. अमानुल्लाह यांचं हे भाषण संपताच सोराया यांनी आपला नकाब काढला आणि त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या महिलांनीही तेच केलं. आपल्या रुढींप्रती कट्टर असलेल्या समाजात उचललेलं पाऊल हे प्रचंड क्रांतिकारी आणि धाडसी होतं. 

परंपरावादी कबिले असलेल्या समाजाला हे सगळे विचार नवे होते. पण ते मांडण्याचं धाडस तिने केलं. अमानुल्लाह खान आणि सोराया तर्जी या दोघांनीही आधुनिक आणि व्यक्तीस्वातंत्र्य असलेल्या अफगाणिस्तानचं स्वप्न पाहिलं. त्या दिशेने जाणारे निर्णयही घेतले. 100 वर्षापुर्वी अफगाणी महिलांना आपल्या मर्जीने कपडे घालण्याचं स्वातंत्र्य दिलं. प्रगत आधुनिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्या ब्रिटनमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार 1918 मध्ये दिला, त्याच्या पुढच्याच वर्षी 1919 मध्ये अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा करत अमानुल्लांनी अफगाणिस्तानमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार दिला. अमानुल्लाह खान यांच्यावर राणी सोरायांचा प्रभाव इतका होता की माझी पत्नीच माझी शिक्षणमंत्री आहे असं ते बऱ्याचदा म्हणायचे. 

राणी सोराया यांना आधुनिक विचारांच्या कुटुंबाचीही पार्श्वभूमी होती. त्यांचे वडील अफगाणिस्ताचे मोठे राजकारणी होते. त्यांच्या आई अस्मा रस्मिया तर्जी यांनी तर एक यशस्वी महिलांच्या उल्लेखनीय कार्याचा उहापोह करणारं  नियतकालिक त्या काळात म्हणजेच 1927 साली सुरू केलं. 'इरशाद ए निस्वा' नावाच्या या नियतकालिकाच्या प्रकाशनात सोरायाही त्यांची मदत करत होत्या. महिलांच्या मार्गदर्शक असा 'इरशाद ए निस्वा'चा अर्थ आहे. 

1930 च्या दशकात जगातल्या सर्वात प्रभावशाली महिलांमध्ये त्यांना स्थान मिळालं ते त्यांच्या पुरागामी विचारांमुळे. महिलांनी शिक्षण घ्यावं, राजकारणात यावं याासाठी त्यांनी खूप प्रयत्नही केले. इतकंच नाही तर मुलींच्या लग्नाच्या वयाची मर्यादाही वाढवली. त्यांच्या या धाडसी भूमिकेमुळे 1927 च्या टाईम्स मॅगझीनच्या मुखपृष्ठावर त्यांचा फोटो झळकला. तसंच  जगातल्या 100 प्रभावी महिलांच्या यादीतही राणी सोरायाला स्थान मिळालं. काळाच्या पुढे असणारी महिला असं त्यांचं वर्णन जगातल्या माध्यमांनी केलंय.


BLOG: भर सभेत हिजाब काढून फेकणाऱ्या अफगाणिस्तानच्या राणीची गोष्ट!

'प्रिन्सेस इंडिया'
अर्थात संपुर्ण अफगाणी समाज  या विचारांचा नव्हता. 1927 च्या सुमारास युरोप दौऱ्यावर असताना त्यांनी बुरखा न घालता डोक्यावर हॅट आणि स्लीवलेस घातलेले काही फोटो प्रसिद्ध झाले. या फोटोमुळे अफगाणिस्तानातले धार्मिक नेते नाराज झाले. असंही बोललं जातं की  सोरायांचं वर्तन कसं  अफगाणी संस्कृतीच्या विरुद्ध आहे हे भासवून बंडासाठी ब्रिटीशांनी आणि समर्थकांनी प्रोत्साहीत केलं. त्यामुळे शाही कुटुंबाविरोधात आक्रोश वाढत होता. शेवटी 1928 मध्ये गृहयुद्धाला सुरुवात झाली आणि देश सोडून त्यांना इटलीमध्ये आश्रय घ्यावा लागला.

1929 साली जेव्हा अमानुल्लाह खान यांना सत्तेतून बेदखल केलं तेव्हा त्यांनी भारतात आश्रय घेतला. मुंबईतच त्यांच्या लहान मुलीचा जन्म झाला. भारतावर त्यांचं इतकं प्रेम होतं की त्यांनी आपल्या लहान मुलीचं नाव चक्क 'इंडिया' असं ठेवलं.

त्यानंतर नादिर शाह सत्तेवर येताच मुलींची शाळा बंद करुन बुऱख्याचीही सक्ती करण्यात आली.  पण 1933 ते 1973 पर्यंत सत्तेत असणाऱ्या नादिर शाहाचा मुलगा मोहम्मद जहीर शाहने अमानुल्लाह यांचं धोरण पुढे नेले. त्यानंतर काय घडलं हा इतिहास ज्ञातच आहे. पण एवढं मात्र सत्य आहे की अफगाणिस्तानच्या महिलांना राणी सोराया यांनी जे स्थान देण्याचा प्रयत्न केला, धडपड केली. त्यापासून आजचा अफगाणिस्तान कोसो दूर गेलाय. पण महिलांच्या स्वातंत्र्याबद्दल बोललं की सगळ्यात आधी आजही अफगाणींना आठवतात त्या म्हणजे राणी सोराया आणि अमानतुल्ला खान.

महिलांच्या स्वातंत्र्यासाठी त्या नेहमीच कटिबद्ध 
"स्वातंत्र्य आपल्या सगळ्यांचं आहे, म्हणून आपण  ते साजरं केलं पाहिजे. देशाच्या सेवेत महिलांचाही सहभाग असला पाहिजे, जसा आपल्या देशाच्या सुरुवातीच्या काळात आणि इस्लामच्या उदयाच्या काळात महिलांचा सहभाग होता. आपण यातून शिकायला हवं, राष्ट्रनिर्माणात सर्वांनी सहभागी व्हायला हवं आणि हे शिक्षणाशिवाय  होऊ शकत नाही. त्यामुळे आपण अधिकाधिक ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेणेकरून इस्लामच्या सुरुवातीला महिलांनी जशी भूमिका बजावली, तशीच भूमिका महिला आता पार पाडू शकतील "हे विचार होते राणी सोरायांचे. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा या संदेशासोबत जवळीक साधणाराच हा सार्वकालिक विचार होता.  

स्त्रियांच्या अभिव्यक्तीला जबरदस्तीने पडद्याआड कोंबणाऱ्या पुरुषसत्ताक विचारांचा बुरखा तिने नेहमीच बंड पुकारत फाडला. पण इतक्या वर्षानंतरही अफगाणिस्तानमधली परिस्थिती मात्र बदलू शकली नाही. शेवटी पुरुषसत्ताक मानसिकतेने धर्माआडून लादलेला बुरखा घालायचा की आधुनिकतेची कास धरत  बुरख्यापलिकडच्या दृष्टीकोनातून जग बघायचं हे ज्याचं त्यानं ठरवावं.

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai High Court : मुलीला एकदा फॉलो करणे गुन्हा नाही; सतत पाठलाग करणे हा कायदेशीर गुन्हा! उच्च न्यायालयाने आरोपींची शिक्षा केली कमी
मुलीला एकदा फॉलो करणे गुन्हा नाही; सतत पाठलाग करणे हा कायदेशीर गुन्हा! उच्च न्यायालयाने आरोपींची शिक्षा केली कमी
Ladki Bahin Yojana: खटाखट नोंदणी वाढवण्यासाठी भाजपचा नवीन फंडा, 2100 रुपये देतो सांगून पक्ष सदस्यत्त्वाचे फॉर्म फरुन घेतले
लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये देतो सांगून भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष सदस्यत्त्वाचे फॉर्म भरुन घेतले
Pushpa 2 Box Office: 'पुष्पा 2'नं किती कोटींचा गल्ला जमवला? 800 की, 1200 कोटी? बॉक्स ऑफिसच्या आकड्यांचं गूढ तुम्हाला उलगडलं?
'पुष्पा 2'नं किती कोटींचा गल्ला जमवला? 800 की, 1200 कोटी? बॉक्स ऑफिसच्या आकड्यांचं गूढ तुम्हाला उलगडलं?
Suresh Dhas On Walmik Karad Dhananjay Munde: वाल्मिक कराडची सटकली अन्...; धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप
वाल्मिक कराडची सटकली अन्...; धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha at 730AM 06 January 2025 माझा गाव, माझा जिल्हाABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 06 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha at 630AM 06 January 2025 माझा गाव, माझा जिल्हासकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 06 January 2025  एबीपी माझा लाईव्ह ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai High Court : मुलीला एकदा फॉलो करणे गुन्हा नाही; सतत पाठलाग करणे हा कायदेशीर गुन्हा! उच्च न्यायालयाने आरोपींची शिक्षा केली कमी
मुलीला एकदा फॉलो करणे गुन्हा नाही; सतत पाठलाग करणे हा कायदेशीर गुन्हा! उच्च न्यायालयाने आरोपींची शिक्षा केली कमी
Ladki Bahin Yojana: खटाखट नोंदणी वाढवण्यासाठी भाजपचा नवीन फंडा, 2100 रुपये देतो सांगून पक्ष सदस्यत्त्वाचे फॉर्म फरुन घेतले
लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये देतो सांगून भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष सदस्यत्त्वाचे फॉर्म भरुन घेतले
Pushpa 2 Box Office: 'पुष्पा 2'नं किती कोटींचा गल्ला जमवला? 800 की, 1200 कोटी? बॉक्स ऑफिसच्या आकड्यांचं गूढ तुम्हाला उलगडलं?
'पुष्पा 2'नं किती कोटींचा गल्ला जमवला? 800 की, 1200 कोटी? बॉक्स ऑफिसच्या आकड्यांचं गूढ तुम्हाला उलगडलं?
Suresh Dhas On Walmik Karad Dhananjay Munde: वाल्मिक कराडची सटकली अन्...; धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप
वाल्मिक कराडची सटकली अन्...; धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप
एसटी घोटाळ्यात चौकशीचा ससेमिरा; कागदपत्रे सादर करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश 
एसटी घोटाळ्यात चौकशीचा ससेमिरा; कागदपत्रे सादर करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश 
Beed Crime: संतोष देशमुखांना संपवल्यानंतर सुदर्शन घुले आसऱ्यासाठी भिवंडीत सोन्या पाटलांकडे पोहोचला पण सगळा प्लॅनच फसला
संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे भिवंडीतील सोन्या पाटील कनेक्शन समोर, सुदर्शन घुलेचा प्लॅन कसा फसला?
Santosh Deshmukh : आकाच्या 'आका'वर सर्वपक्षीयांचा 'आक्रोश', बीडच्या गुंडगिरीची चर्चा अन् धनंजय मुंडेंकडे 'मोर्चा'
आकाच्या 'आका'वर सर्वपक्षीयांचा 'आक्रोश', बीडच्या गुंडगिरीची चर्चा अन् धनंजय मुंडेंकडे 'मोर्चा'
Manoj Jarange : धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
Embed widget