देशभरात कोविड -19 (कोरोनाचा) आकडा झपाट्याने वाढत असताना, लोकांच्या मनात या संसर्गजन्य आजाराबत धास्ती निर्माण झाली आहे. बहुतांश नागरीक आपल्याला हा कोरोना होऊ नये म्हणून सर्वोतपरी प्रयत्न करीत आहे. सुरक्षिततेचे नियम पाळले तर कोरोना होणार नाही असं बेंबीच्या देठापासून ओरडून सांगितले तरी लोकांना हा आजारच होऊ नये याकरिता प्रतिबंधात्मक औषधे हवी आहेत. सुरुवातीच्या काळात विविध घरगुती उपाय योजना करुन बघितले, मग त्यात गरम-कोमट पाण्यातील 'काढे' आलेचं, विविध गोष्टीचे रस घेऊन बघितले. मात्र 'व्हॉट्सअप' युनिव्हर्सिटी ह्या लोकांना काही केले शांत बसून देईना त्यामुळे त्यावरुन रोज नव-नवीन फंडे नागरिकांना मिळत आहे. शेवटी अखेर याने काहीच उपयोग होत नाही याची असं जाणवल्यानंतर लोकांनी आता थेट, अॅलोपॅथी, होमिओपॅथी आणि आयुर्वेद या शास्त्रशुद्ध पद्धतीतकडे आपला मोर्चा वळवला आहे.
अजूनही या आजारांवर कोणत्याही प्रकारचे खात्रीलायक रित्या सांगता येईल असे गुणकारी औषध निर्माण झालेले नाही किंवा कोणतीही लस अजून तरी बाजारात आलेली नाही. विविध प्रगत देशात अनेक तज्ज्ञ यावर लस शोधण्याकरिता रात्र दिवस यावर काम करीत आहे. कुणी लवकरच आपण बाजरात लस आणू असा दावा करत असले तरी शास्त्रीयदृष्टीकोनातून इतक्यात ते शक्य नाही. लस उत्पादित करत असल्याच्या रोज बातम्या येत आहे, मात्र याबाबत ठोस असं कुणी दावा केलेला नाही. अजून कुणी लस काढलीच तर प्रत्यक्षात रुग्णांना मिळेपर्यंत त्याला बराच अवधी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मात्र आता दबक्या आवाजात का होईना प्रतिबंधात्मक कोणती औषध घ्यावी यावर सर्व सामान्य जनता चर्चा करत आहे. प्रत्येक जणांकडे सध्या या औषधावरून नवीन युक्तिवाद सुरु आहे. कुणी अॅलोपॅथीचा उपयोग किती चांगला असून याचे ज्ञान पाजळीत असून त्याला प्रतिदावे म्हणून याचे साईड इफेक्ट्स कसे आहेत यावर गप्पांचा फड मेसेंजरवर रंगत आहे. तर कुणी होमॅपॅथीतील ह्या अमक्या औषधाला शासनाने मान्यता दिली आहे का? असे प्रश्न विचारणारे काही आहेत, तर आयुर्वेदाला साईड इफेक्ट्स नसतात अशा पद्धतीची विविध स्तरातून मत व्यक्त केली जात आहे.
कोरोनाबाधितांच्या संख्येत आपण ज्या चीन देशातून या कोरोना विषाणूची सुरुवात झाली त्यालाही मागे टाकले आहे. देशात महाराष्ट्र रुग्ण संख्येच्या बाबतीत आजही नंबर वनच आहे. राज्यातील प्रशासन या आजराला प्रतिबंध घालण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र तरीही दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढतच आहे. या सगळ्या प्रकारातून लोकांमध्ये कोरोनासंदर्भात दहशत निर्माण झाली आहे. तसेच कुणाला कोरोना झालाच तर काय हाल होतात हे ही ऐकले आहेच, किंवा रुग्णालयात दक्षाला करून घेण्यासाठी किती हाल होतात हेही पाहिलेलं आहेच. त्यामुळे नागरिकांनी हा कोरोना आपल्याला होणारच नाही यासाठी विविध व्ह्यूरचना करण्यास सुरुवात केली आहे. सध्या अशी परिस्थिती विशेषतः राज्यातील विविध शहरात दिसत आहे.
मुंबई शहर व परिसरात कोरोनाची विषाणूबाधा व मृत्यूचे प्रमाण जास्त असून त्यावर उपाययोजना व विश्लेषण करण्याकरिता सात सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. मुंबई शहरासाठी नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदी के.ई.एम. रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे सांगतात की, "सध्या बाजारात अशा विविध गोष्टीची चर्चा आहेच. सर्वांनी मात्र एक लक्षात घेतल पाहिजे की, सध्या जी काय प्रतिबंधात्मक औषध बाजारात मिळत आहे, त्यापैकी कोणतीही औषध प्रतिबंधात्मक आहे याला असा शास्त्रीय आधार नाही. अॅलोपॅथीमध्ये सध्या सगळीकडे गाजत असलेलं काही लोक जे एक प्रतिबंधात्मक औषध म्हणून हे घेत आहे, त्यावर विविध मतांतरे आहे. काही लोकं चांगलं म्हणतायेत, तर काही म्हणतायेत याचा वापर होत नाही. शिवाय या औषधामुळे ज्यांना हृदय विकारासारख्या व्याधी आहेत त्यांना हे औषध चालत नाही. दुसऱ्या बाजूला होमिओपॅथी आणि आयुर्वेदाचं तसेच आहे. मात्र औषधांमध्ये कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाही. फायदा होतो की नाही यावर शास्त्रीय अभ्यास झाल्याशिवाय सांगणे कठीण असते. मात्र या सगळ्या प्रकारात प्रत्येकानेच औषध घ्यायची असतील तर ती वैद्यकीय सल्ल्यानुसार घ्यावीत."
अपेक्षेनुसार महाराष्ट्रात लॉकडाऊनचा चौथा टप्पा जाहीर करण्यात आला असून 31 मे पर्यंत तो वाढविण्यात आला आहे. संपूर्ण देशाने आतापर्यंत तीन लॉकडाऊनचं पालन केलं होत. त्यामुळे चौथ्या टप्प्यातील लॉक डाऊनमध्ये थोडी शिथिलता आणून थोड्या फार प्रमाणात आर्थिक व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न शासनाकडून होऊ शकतो. मात्र रेड झोन मधील परिसरात कोणतीही शिथिलता करण्यात आलेली नाही. मात्र नागरिकांनी सजग राहण्याची गरज आहे, प्रतिबंधात्मक औषधे ज्याला घ्यायची आहे ते ती घेतील, परंतु सरकारने आखून दिलेले दोन व्यक्तींमधील अंतर पाळणे, मास्क घालणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे. याबरोबर वेळेवर संतुलित आणि सकस आहार, दररोज व्यायाम केल्याने रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहण्यास मदत होते, यामुळे कोरोना दूर राहण्यास मदत होते. शिवाय काही जीवनसत्व देणाऱ्या गोळ्याची बाजरात चांगलीच वाढल्याचे चित्र आहे. एकंदर काय कोरोनासाठी पासून दूर ठेवणाऱ्या किंवा प्रतिबंधात्मक या औषधांबाबत विविध मत असली तरी चलती आहे ह्या औषधांची एवढं मात्र खरं .
टीप : या मध्ये कोणत्याही औषधांची नाव टाकण्यात आलेली नाही. स्वतः औषध घेण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
BLOG | चॅलेंज, कोविड रुग्णाला अॅडमिट करुन दाखवा