एक्स्प्लोर

जिभेचे चोचले - स्पँनिश च्युरोज

जगभरातल्या पदार्थांची चव आपल्याच शहरात चाखायची चैन आपण करत असलो तरी युरोपातले अनेक देश मात्र याबाबतीत आपण भारतीयांकडून दुर्लक्षितच राहिले आहेत.

आम्हाला मॉडर्न क्युझिन किंवा प्रमुख्याने परदेशी पदार्थ खूप आवडतात असं अभिमानाने सांगणारे खूप जण असतात. पण अशांनाही आपल्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेले चायनिज, कॉन्टीनेंटल, इटालियन असे पदार्थच माहितीचे असतात आणि त्या चवींची सवयही झालेली असते. नाही म्हणायला आज चायनिजच्या पुढे जाऊन एशियन पदार्थ सर्व्ह करणारी बरीच स्पेशालिटी रेस्टॉरन्टस उघडली आहेत. या एशियन क्युझिनमध्ये थायलंडचं थाय पद्धतीचं जेवण, सुशीसारखे जपानी पदार्थ, अगदी ब्रम्हदेशातले बर्मिज पदार्थ यांचा समावेश असतो. त्यात चायनिजपेक्षा जरा वेगळे नूडल्स, ओल्या खोबऱ्याचा वापर करुन तयार केलेल्या ग्रेव्हीज लोकांना चांगल्याच आवडू लागल्या आहेत. तोच प्रकार कॉन्टीनेन्टल पदार्थांचा केवळ पिझ्झा, बर्गर, पास्ताच्या पुढे जाऊन आता लोकांचा पहिला चॉईस लेबनिज किंवा मोरोक्कन पदार्थ ठरु लागले आहेत. फलाफल आणि हुम्मस असे आपले काबुली चणे किंवा छोले ज्याला आंतरराष्टीय स्तरावर चिकपीज असं संबोधलं जातं, त्यापासून तयार केलेले वैदर्भिय डाळींच्या वड्यांशी साध्यर्म असलेला फलाफल नावाचा पदार्थ तर आपल्या देशात प्रचंड लोकप्रिय झाला आहे. पण जगभरातल्या पदार्थांची चव आपल्याच शहरात चाखायची चैन आपण करत असलो तरी युरोपातले अनेक देश मात्र याबाबतीत आपण भारतीयांकडून दुर्लक्षितच राहिले आहेत. classic churros- नाही म्हणायला ब्रिटीश फिश आणि चिप्ससारखे पदार्थ मिळतात आपल्याकडे, स्विस फॉन्द्युपण आता तरुणाईच्या फेवरेट लिस्टमधला पदार्थ झाला आहे. पण स्पेन, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस या युरोपियन देशांच्या खाद्यसंस्कृतीबद्दल इथे बसून फारच कमी माहिती मिळते आपल्याला आणि त्यांचे पदार्थ चाखायची संधी मुंबईसारख्या शहरात तरी फार दिसत नाही. मात्र, याही देशांमधले काही पदार्थ अतिशय लोकप्रिय आहेत त्यांच्या स्वत:च्या देशाबरोबरच जगभरातल्या इतर देशात आणि परदेशात जाऊन आलेले किंवा राहून आलेले लोक आवर्जून याबद्दल सांगतात, त्यामुळे अगदी मोजकेच का होईना पण असे पदार्थ विकणारी ठिकाणंही हळूहळू मुंबईत अवतरायला लागली आहे. नुकतेच असे दोन नविन पदार्थ आणि ती सर्व्ह करणारी ठिकाणं मुंबईत सापडली आहेत. त्यातलाच महत्त्वाचा आणि लोकप्रिय होऊ लागलेला पदार्थ म्हणजे ‘च्युरोज’ हा पदार्थ प्रामुख्याने स्पॅनिश आहे असं मानलं जातं. जिभेचे चोचले - स्पँनिश च्युरोज स्पेनचा राष्ट्रीय पदार्थ असं त्याला संबोधलं तरी वावगं ठरणार नाही इतका हा च्युरोज नावाचा गोड पदार्थ स्पेनमध्ये लोकप्रिय आहे. पण प्रत्येक पदार्थाच्या बाबतीत जे भांडण असतं. ते या च्युरोजच्या बाबतीतही आहे. पोर्तुगाल आणि स्पेन या दोन्ही देशांचा दावा आहे की च्युरोज या पदार्थाचं मूळ त्यांच्याच देशात आहे. अर्थात स्पॅनिश लोकांची च्युरोज कसा पहिल्यांदा तयार झाला याची कथाही रोचक आहे. खरं तर हा च्युरोज नावाचा पदार्थ पाहिला की आपल्या चकलीची आठवण येते. ’चकलीसारखे काटे असलेला पोकळ पण बऱयापैकी मोठा कुरकुरीत वेटोळा पदार्थ म्हणजे च्युरोज’. हा चवीला गोड असतो आणि तळलेला असतो. चॉकलेट सॉस किंवा तत्सम गोड सॉसला लावून लावून खाल्ला जातो. या च्युरोजला आणखी गोड करण्यासाठी तळल्यानंतर वरुन त्यावर बारीक साखरही पेरली जाते. आपली चकली कशी आकाराने बऱ्यापैकी छोटी असते, पण हे च्युरोज मात्र, भलेमोठे असतात आकारानी. पण खायला सुरुवात केल्यावर मात्र अतिशय चवदार असतात आणि अगदी चटकन जिभेवर विरघळतात. जिभेचे चोचले - स्पँनिश च्युरोज स्पेन आणि पोर्तुगाल या दोन्ही देशात तर पंचतारांकित हॉटेलांपासून थेट रस्त्यापर्यंत सगळीकडे च्युरोज मिळतात. स्पेनमधला अतिशय लाडका स्ट्रीटफूड पदार्थही च्युपोज आहे. हे च्युरोज गेल्या काही दिवसात मुंबईतही मिळायला लागलेआहेत. बा्द्र्याला कार्टर रोडवर द बॉम्बे च्युरोज, नावाचं खास च्युरोजचं एक छोटसं आऊटलेट निघालं आहे. तिथे वेगवेगळ्या फ्लेवरचे च्युरोज मिळतात. तसंच ज्या गोड सॉसमध्ये बुडवून च्युरोज खायचे असतात त्याचाही जबरदस्त व्हरायटी या बॉम्बे च्युरोजला मिळते. व्हाईट चॉकलेट, डार्क चॉकलेट, कॅरॅमल, कोकोनट सॉस असे कितीतरी फ्लेवर मिळतात च्युरोजच्या सॉसचे, तसंच एखादं आऊटलेट काढायचं तर भरपूर व्हेरायटी आवश्यकच ठरते. मग त्यातूनच पारंपरिक पदार्थाचे शेफने तयार केलेले नवनवीन व्हर्जन्स मेन्यूत समाविष्ट होतात. द बॉम्बे च्युरोजमध्येही चॉकलेट सॉससारखे वेगवेगळ सॉस थेट च्युरोजला लावून तसे च्युरोजही सर्व्ह केले जातात. म्हणजे आईस्क्रीमसारखे थेट तोंडात टाकता येतात हे च्युरोज. जिभेचे चोचले - स्पँनिश च्युरोज ठाण्यातही पाचपाखाडीच्या खाऊगल्लीत नुकतंच एक अमोर च्युरोज नावाचं केवळ आणि केवळ च्युरोज या एकमेव पदार्थाचे विविध प्रकार सर्व्ह करणारं छोटंसं आऊटलेट निघालं आहे. इथे तर पारंपारिक पद्धतीने गोड असलेल्या या पदार्थाचं सेवरी म्हणजे खारं रुपही मिळतं. खाऱ्या च्युरोजसाठी चिजचा सॉस किंवा आलंलसूण असलेला तिखट सॉसही अमोर च्युरोजला मिळतो. बांद्र्याचं द बॉम्बे च्युरोज आणि ठाण्याचं अमोर च्युरोज या दोन्ही ठिकाणी आईस्क्रीम च्युरोज नावाचा लहान मोठ्या सगळ्यांना आवडणारा पदार्थ मिळतो. आईस्क्रीमच्या जोडीनं हे तळलेले कुरकुरीत च्युरोज खूप चविष्ट लागतात. त्यामुळे केकसारख्या डेझर्टला एक चांगला पर्याय म्हणून आजकाल सगळ्या खवय्यांना च्युरोजचा पर्याय आवडू लागला आहे. आपल्याच शहरात थेट स्पेनचा राष्ट्रीय पदार्थ मिळत असेल तर एखाद्या दिवशी जेवणानंतर तोंड गोड करायला हा च्युरोजचा आस्वाद घ्यायला काहीच हरकत नाही. लहानग्यांना तर चटकन आवडेल असा हा स्पॅनिश च्युरो. संबंधित ब्लॉग : जिभेचे चोचले : ताज्या पदार्थांसाठी – दादरचं ओव्हनफ्रेश

जिभेचे चोचले :  चवदार मिल्कशेक्सचा ब्रॅण्ड : ‘केवेंटर्स’

जिभेचे चोचले : भारतीय पदार्थांचं इंडिया बिस्ट्रो... जिभेचे चोचले : द अमेरिकन जॉईंट जिभेचे चोचले : आजीच्या पोतडीतील पदार्थांसाठी 'ग्रॅण्डमामाज् कॅफे' जिभेचे चोचले : खवय्यांचं लाडकं लिजेंडरी स्टेटस  जिभेचे चोचले : अंडे का फंडा – एव्हरीडे अंडे जिभेचे चोचले - सीएसटीपेक्षाही जुनं पंचम पुरीवाला जिभेचे चोचले : फ्रेंच फ्राईजसाठी  – ‘द जे’ जिभेचे चोचले : भारतीय वैविध्याचं दर्शन – 29 जिभेचे चोचले : मुलुंडचं केक्स एन केमिस्ट्री जिभेचे चोचले : पारंपरिक चायनीजचा स्वाद – मेनलॅण्ड चायना जिभेचे चोचले : स्पेशालिटी ट्रिपल ट्रिट जिभेचे चोचले : जिवाची मुंबई – पंचतारांकित रेनेसॉंचा संडे ब्रंच जिभेचे चोचले : वाह ताज !– मसाला क्राफ्ट जिभेचे चोचले : पारंपरिक जेवणाचा थाट – भगत ताराचंद जिभेचे चोचले: बोटीच्या थीमचं हार्बर ओ फोर जिभेचे चोचले : डोशासारख्या क्रेप्ससाठी ‘डी क्रेप्स’ कॅफे जिभेचे चोचले : लिजेंडरी क्रिम सेंटर जिभेचे चोचले : तरुणाईचा ‘चिजी’ अड्डा, प्युअर मिल्क सेंटर जिभेचे चोचले: उडुपी संस्कृतीचा पारंपारिक थाट जिभेचे चोचले : आस्वादचा ‘आस्वाद’ जिभेचे चोचले : स्पेशल सिझलरसाठी ‘फुड स्टुडियो’ जिभेचे चोचले : ‘फ’ से फ्यूजन… ‘फ’ से फूड जिभेचे चोचले : ढाब्याची आठवण – चौबारा 601 जिभेचे चोचले : ग्लोबल एशियन फ्युजन जिभेचे चोचले : हम काले है मगर… आईस्क्रीमचा भन्नाट फ्लेवर जिभेचे चोचले : महाराष्ट्राचा काठ आणि घाट जिभेचे चोचले: केक चॉकलेट पेस्ट्रीचं रोलिंग पिन जिभेचे चोचले : पाणीपुरी – ‘तोंडभर’ आनंद जिभेचे चोचले: पावभाजी – विथ लव्ह फ्रॉम मुंबई जिभेचे चोचले: इराणी हॉटेलांचा मॉडर्न अवतार जिभेचे चोचले : मुंबईतलं मिनी दक्षिण भारत : इडली-डोशाचं गाव जिभेचे चोचले : मुंबईचं मॉडर्न कॅन्टीन जिभेचे चोचले : कुटुंबसंस्थेचं सेलिब्रेशन जिभेचे चोचले : सफर विस्मरणातल्या खाद्यसंस्कृतीची जिभेचे चोचले : हवाहवासा प्रवास जिभेचे चोचले : गल्लीतला ‘खाऊ’ जिभेचे चोचले : पंचतारांकित रसनातृप्ती जिभेचे चोचले : चमचमीत ग्रील आणि बार्बेक्यू जिभेचे चोचले : तरुणाईची हँगआऊट प्लेस जिभेचे चोचले : टूमदार, चटकदार घराची ‘स्टोरी’ जिभेचे चोचले: विलक्षण पाहुणचार जिभेचे चोचले – खाद्यपदार्थांची न्यारी दुनिया !  जिभेचे चोचले : मुंबईतला नवा ट्रेण्ड- मॉडर्न फुड विथ ट्विस्ट
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना वेगळा तिळगूळ दिला, आधीचा प्रचारबंदीचा नियम मोडून घरोघरी पैसा वाटपासाठी सत्ताधाऱ्यांना आजचा दिवस दान दिला; संजय राऊतांचा हल्लाबोल
निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना वेगळा तिळगूळ दिला, आधीचा प्रचारबंदीचा नियम मोडून घरोघरी पैसा वाटपासाठी सत्ताधाऱ्यांना आजचा दिवस दान दिला; संजय राऊतांचा हल्लाबोल
Eknath Khadse On Irrigation Scam: अजित पवारांना 25 वर्षांनी 'त्या' फाईलची आठवण, म्हणजे तुम्हीदेखील भ्रष्टाचाराला संरक्षण दिलंय; सिंचन घोटाळ्यावरुन एकनाथ खडसेंचा हल्लाबोल
अजित पवारांना 25 वर्षांनी 'त्या' फाईलची आठवण, म्हणजे तुम्हीदेखील भ्रष्टाचाराला संरक्षण दिलंय; सिंचन घोटाळ्यावरुन एकनाथ खडसेंचा हल्लाबोल
Sandeep Deshpande on Adani: राज ठाकरे अदानीला बोलल्यावर भाजपवाल्यांना मिरच्या का झोंबल्या? मनसेच्या संदीप देशपांडेंचा खरमरीत सवाल
राज ठाकरे अदानीला बोलल्यावर भाजपवाल्यांना मिरच्या का झोंबल्या? मनसेच्या संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
Vijay Pandhare On Ajit Pawar Sinchan Scam: सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांचा युती सरकारवर गंभीर आरोप; आता जलसिंचन विभागाच्या तत्कालीन मुख्य अभियंतांचा खळबळजनक दावा
सिंचन घोटाळ्यावरून अजितदादांचा युती सरकारवर गंभीर आरोप; आता तत्कालीन अभियंतांचा खळबळजनक दावा
ABP Premium

व्हिडीओ

Mahapalika Election Update : प्रचाराचा 'दी एन्ड', आता सुरु 'माईंड गेम' Special Report
Akola Politics : मतदारांना 'तीळगूळ', उमेदवारांवर 'संक्रांत'? अकोल्यात मतदारांच्या घराबाहेर ठेवल्या साड्या Special Report
Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना वेगळा तिळगूळ दिला, आधीचा प्रचारबंदीचा नियम मोडून घरोघरी पैसा वाटपासाठी सत्ताधाऱ्यांना आजचा दिवस दान दिला; संजय राऊतांचा हल्लाबोल
निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना वेगळा तिळगूळ दिला, आधीचा प्रचारबंदीचा नियम मोडून घरोघरी पैसा वाटपासाठी सत्ताधाऱ्यांना आजचा दिवस दान दिला; संजय राऊतांचा हल्लाबोल
Eknath Khadse On Irrigation Scam: अजित पवारांना 25 वर्षांनी 'त्या' फाईलची आठवण, म्हणजे तुम्हीदेखील भ्रष्टाचाराला संरक्षण दिलंय; सिंचन घोटाळ्यावरुन एकनाथ खडसेंचा हल्लाबोल
अजित पवारांना 25 वर्षांनी 'त्या' फाईलची आठवण, म्हणजे तुम्हीदेखील भ्रष्टाचाराला संरक्षण दिलंय; सिंचन घोटाळ्यावरुन एकनाथ खडसेंचा हल्लाबोल
Sandeep Deshpande on Adani: राज ठाकरे अदानीला बोलल्यावर भाजपवाल्यांना मिरच्या का झोंबल्या? मनसेच्या संदीप देशपांडेंचा खरमरीत सवाल
राज ठाकरे अदानीला बोलल्यावर भाजपवाल्यांना मिरच्या का झोंबल्या? मनसेच्या संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
Vijay Pandhare On Ajit Pawar Sinchan Scam: सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांचा युती सरकारवर गंभीर आरोप; आता जलसिंचन विभागाच्या तत्कालीन मुख्य अभियंतांचा खळबळजनक दावा
सिंचन घोटाळ्यावरून अजितदादांचा युती सरकारवर गंभीर आरोप; आता तत्कालीन अभियंतांचा खळबळजनक दावा
Jalgaon Crime : कारमध्ये आढळली तब्बल 29 लाख रोकडसह 3 किलो सोने अन् 8 किलो चांदी; पावत्या नसल्याने मुद्देमाल जप्त, जळगावात स्थिर सर्व्हेक्षण पथकाची कारवाई
निवडणुकीच्या धामधुमीत जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; कारमध्ये आढळली तब्बल 29 लाख रोकडसह सोने-चांदी, पावत्या नसल्याने संशय बळावला
भ्रष्ट माणसाच्या हातात पालिका देऊ नका... तेजस्विनी पंडितची रोखठोक पोस्ट चर्चेत, काय म्हणाली ?
भ्रष्ट माणसाच्या हातात पालिका देऊ नका... तेजस्विनी पंडितची रोखठोक पोस्ट चर्चेत, काय म्हणाली ?
Ladki Bahin Yojana : काँग्रेसने लाडकी बहिणींचा हप्ता थांबवायला लावला; नागपुरात घराबाहेर पत्र ठेवून पळाले, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, नेमकं प्रकरण काय?
काँग्रेसने लाडकी बहिणींचा हप्ता थांबवायला लावला; नागपुरात घराबाहेर पत्र ठेवून पळाले, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, नेमकं प्रकरण काय?
काही निर्मात्यांची मस्ती उतरवायला हवी, महाराजांचा सिनेमा म्हणून मी गप्प..दिग्पाल लांजेकरांवर मनसे नेता संतापला
काही निर्मात्यांची मस्ती उतरवायला हवी, महाराजांचा सिनेमा म्हणून मी गप्प..दिग्पाल लांजेकरांवर मनसे नेता संतापला
Embed widget