एक्स्प्लोर

चित्रपटांवरच्या बहिष्कारामागचं अ(न)र्थशास्त्र 

सलमानच्या किंवा अजून कुठल्याही अभिनेत्याच्या चित्रपटांवर बहिष्कार टाका, असं अनेकदा आवाहन केलं जातं, ते मला फारस पटत नाही. सिनेमा हा फक्त अभिनेत्याचा असतो, असा एक गैरसमज आपल्याकडे आहे. सिनेमा बनण्यामागे शेकडो अनामिक हात असतात. त्यामुळे एका अभिनेत्यामुळे या सिनेमांवर बहिष्कार टाकणं, म्हणजे एक फांदी सडलीये म्हणून पूर्ण झाडावर कुऱ्हाड चालवायचा प्रकार आहे.

सलमानला जोधपूरच्या न्यायालयाने काळवीट शिकारीप्रकरणी शिक्षा सुनावली. मागच्या ‘हिट अँड रन’ केसमध्ये सलमान निरपराध सुटल्याने एका मोठ्या वर्गामध्ये त्याच्याविरुद्ध असंतोष खदखदत होताच. इतर अनेक वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्यातल्या प्रकरणांनी सलमानची प्रतिमा मलीन झाली होतीच. सलमानच्या या मलीन झालेल्या प्रतिमेला उजळवण्यासाठी शिस्तबद्ध प्रयत्न करण्यात आले. 2007 पर्यंत सलमानचं नावं पुरत बदनाम झालं होतं. त्याच्या सहकलाकारांवर बीभत्स कॉमेंट करणाऱ्या काही टेप्स प्रदर्शित झाल्या होत्या. अपराधीक केसेस तर चालू होत्याच. ऐश्वर्या प्रकरणात पण त्याची खलनायक अशी प्रतिमा निर्माण झाली होती. वाईट म्हणजे त्याचे सिनेमे पण सपाटून आपटू लागले होते. याचवेळेस सलमानच्या टीमने त्याच्या इमेज मेकओव्हरचा निर्णय घेतला असावा. 2007 साली 'being human'ची स्थापना झाली. सलमान या संस्थेच्या माध्यमातून गरीब आणि गरजू लोकांना कशी मदत करत आहे, याच्या बातम्या वर्तमानपत्रांमध्ये झळकायला लागल्या. पत्रकारांचा एकेकाळी तिरस्कार करणारा सलमान एकदम मीडिया फ्रेंडली बनला. Man with golden heart अशी त्याची प्रतिमा पद्धतशीरपणे बनवली जाऊ लागली. सलमानने स्वीकारलेले रोल पण त्याच्या इमेज मेक ओव्हर मधला चाणाक्षपणा दाखवतात. ‘दबंग’मध्ये तो श्रीमंतांना लुटून गरिबांना मदत करणारा पोलीस ऑफिसर होता. ‘जय हो’मध्ये माजी सैनिक होता. ‘किक’मध्ये पुन्हा गरिबांना मदत करणारा चोर होता. ‘बजरंगी भाईजान’मध्ये लहान मुलासारखा भोळाभाबडा आणि भारत -पाकिस्तानमधल्या सीमारेषा पुसणारा माणूस होता. सलमानच हे पात्र बरचस शेकडो भारतीयांची ज्याच्यावर श्रद्धा आहे, अशा हनुमानाच्या स्वभावावर बेतलेलं आहे. ‘ट्यूबलाईट’मध्ये पुन्हा तसाच रोल होता. ‘एक था टायगर’मध्ये तो देशासाठी प्राणाची बाजी लावणारा रॉ एजंट होता. ‘सुलतान’मध्ये तो देशासाठी पदक जिंकणारा रेसलर होता. अजूनही याकाळात त्याने केलेल्या भूमिका या त्याच्या ब्रँड बिल्डिंगच्या नॅरेटिव्हला पूरक होत्या. त्याची सिनेमातली नावं पण विचारपूर्वक निवडलेली होती. बाहेरच्या जगात पण त्याकाळी भ्रष्टाचार विरोधाचा चेहरा बनलेल्या मोदींसोबत साहेबांनी पतंग वगैरे उडवून झाले होते. खान परिवार मोदींच्या अतिशय जवळचा मानला जाऊ लागला होता. अशा अनेक आघाड्यांवर ही इमेज मेकओव्हरची आघाडी चालू होती. ही मोहीम बरीच यशस्वी पण झाली होती. पण ब्लॅक बक्स शिकार प्रकरणावरचा निकाल या सगळ्यांवर पाणी फिरवून गेला. सलमानच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्यात, यावा अशी आवाहन समाजमाध्यमांमध्ये येऊ लागली. एखाद्या फिल्मस्टारच्या सिनेमांवर बहिष्कार टाकण्याची मागणी होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी पण आमीर खान आणि शाहरुख खान यांच्या सिनेमांवर त्यांनी केलेल्या काही राजकीय विधानांमुळे बहिष्कार टाकण्यात यावी, अशी मागणी विशिष्ट पक्षाच्या समर्थकांनी केली होती. पण सलमानच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याच्या मागणीची तीव्रता बरीच जास्त आहे. पण या निमित्ताने काही प्रश्न उपस्थित होतात. अशा बहिष्कारांची झळ खरच त्या अभिनेत्याला लागते का? अशा बहिष्कारांमुळे आपण काही तरी केलं, या मानसिक समाधानाच्या पलीकडे जाऊन काही होत का? बहिष्काराचे अस्त्र फक्त अभिनेत्यांविरुद्धच वापरायचं का? अनेक गंभीर गुन्ह्यांचे आरोप असणाऱ्या राजकीय नेत्यांविरुद्ध, करचुकवेगिरी करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध पण उपसायचं का? आपण ज्या मुक्त अर्थव्यवस्थेच्या युगात राहतोय, त्यामध्ये बहिष्काराचं अस्त्र कितपत उपयुक्त आहे? दुर्दैवाने यातल्या बहुतेक प्रश्नांची उत्तर नकारात्मक आहेत. मला कल्पना आहे कि, सध्याच्या भावनेने भरलेल्या काळात अशी उत्तर मिळणं अनेकांना आवडणार नाही. सलमानच्या किंवा अजून कुठल्याही अभिनेत्याच्या चित्रपटांवर बहिष्कार टाका, असं अनेकदा आवाहन केलं जातं, ते मला फारस पटत नाही. सिनेमा हा फक्त अभिनेत्याचा असतो, असा एक गैरसमज आपल्याकडे आहे. सिनेमा बनण्यामागे शेकडो अनामिक हात असतात. शेकडो डिपार्टमेंट्स कार्यरत असतात. स्पॉटबॉय पासून दिग्दर्शकापर्यंत अनेक लोकांचे अथक परिश्रम असतात. एका अभिनेत्यामुळे या सिनेमांवर बहिष्कार टाकणं, म्हणजे एक फांदी सडलीये म्हणून पूर्ण झाडावर कुऱ्हाड चालवायचा प्रकार आहे. पण व्यक्तिपूजा हाच स्थायीभाव असणाऱ्या देशात अभिनेता म्हणजेच सिनेमा हा समज असणं स्वाभाविकच आहे. सिनेमा म्हणजे फक्त अभिनेता हा गैरसमज ज्यादिवशी दूर होईल त्यादिवशी सिनेमा साक्षरतेकडे एक महत्वाचं पाऊल पडलेलं असेल. याची तुलना संपकाळात बसेससारख्या आपल्याचं सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करणाऱ्या आंदोलकांशी करता येईल. म्हणजे कशाचा तरी राग आला म्हणून स्वतः ला थापड बुक्क्या मारून घ्यायचा प्रकार थोडक्यात. सिनेमा हा फक्त ‘नायकाचा’ असतो अशी समजूत आपल्याकडे समाजमनात रुळलेली आहे. आपल्याकडच्या ‘व्यक्तीपूजा’ संस्कृतीला ते साजेसेच आहे. पण असे बहिष्कार टाकणाऱ्यांनी समजून घ्यायला पाहिजे की, सिनेमा फक्त नायकामुळे बनत नाही. त्यात लेखक, संकलक, सिनेमॅटोग्राफर, लाईटबॉय, स्पॉटबॉय मागे मॉबमध्ये नाचणारे नर्तक अशा शेकडो नाव नसलेल्या लोकांचा हातभार लागलेला असतो. आणि एखादा सिनेमा आपण नाकारतो तेव्हा या ‘अनसंग हिरोज’च काम पण आपण नाकारत असतो. उद्या ‘रेस 3’ किंवा ‘भारत’ नाही चालले, तर सलमानचे काही नुकसान होणार नाहीये. त्याचं घर भरलेलं आहे. त्याचा फटका शेकडो अनाम तंत्रज्ञाना आणि कलाकारांना बसणार आहे. हे समजून घेण्यासाठी चित्रपटसृष्टीच अर्थकारण आपण समजावून घ्यायला हवं. फिल्म चालली नाही तर फिल्मशी रिलेटेड अनेक लोकांना पेमेंट मिळत नाही. हे पेमेंट टप्प्याने होत असत. फिल्म फ्लॉप गेली की, निर्माता हात वर करतो. त्यामुळे अनेकांना मोठा हप्ता मिळतच नाही. अर्थातच सन्माननीय अपवाद असणारे निर्माते आहेत. दुसरं म्हणजे फ्लॉप सिनेमाशी रिलेटेड लोकांना दुसरं काम मिळणं अवघड जात खूप. स्टारचा अपवाद. त्यांना काम मिळत राहतात. तिसरं म्हणजे जितक्या फ्लॉप फिल्म जास्त, तितकं इंडस्ट्रीचे नुकसान होत. एकूणच निर्मिती कमी होते. कामच कमी होतं. त्यामुळेच म्हणतोय बहिष्काराची झळ या मस्तवाल बैलांना बसत नाही. झळ बसते ती ‘नाही रे’ वर्गाला. सरकारला चित्रपटातून जो कररुपी महसूल मिळतो तो बुडतो तो वेगळाच. आणि शेवटी चित्रपटसृष्टीच्या अर्थकारणातून पाहिलं, तर एखादा ‘मसान’ किंवा ‘तितलि’ बनण्यासाठी ‘दबंग’सारखे करोडो रुपये कमावणारे चित्रपट बनत राहणं आवश्यक आहे. बरं नटांच्या एका विधानामुळे चित्रपटांवर बहिष्कार टाकणारे आपल्या लाडक्या नेत्यांचे विखारी, समाजात फूट पाडणारे विधान नजरेआड करून त्याच्यावर जीवापाड प्रेम करत असतात. हा दुट्टपीपणा का? राजकीय नेत्याविरुद्ध ‘ब्र’ काढायची हिंमत नाही म्हणून? का फिल्मइंडस्ट्री ‘सॉफ्ट टारगेट’ आहे म्हणून? त्यामुळे एखाद्या नटाचे एखादे विधान ‘मूर्खपणा’चे वाटते किंवा पटत नाही, म्हणून चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचा आततायीपणा करू नका. चित्रपट म्हणजे ‘हिरोइझम’ नाही. त्यापलीकडे जाऊन शेकडो अनाम कलाकारांनी मिळून बनवलेली भली बुरी पण कलाकृतीचं आहे. 2015 च्या आकडेवारीनुसार देशभरात दहा हजारच्या आसपास सिंगल स्क्रीन चित्रपटगृह आहेत. त्यातले काही बंद पडले असतील. यातले बहुतेक चित्रपटगृह छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात आहेत. प्रत्येक चित्रपटगृहात प्रोजेक्टर चालवणारे, डोअर कीपर, साफसफाई करणारे, फुड स्टॉल लावणारे इत्यादी. 10 ते 15 लोक असतात. म्हणजे छोटी शहरे आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या फार मर्यादीत संधी असतात. तिथं ही चित्रपटगृह रोजगाराच्या थोड्याफार संधी काही लोकांना का होईना उपलब्ध करून देतात. प्रत्येक चित्रपटगृहावर त्या परिसरातले काही परीवार आर्थिकदृष्ट्या विसंबून असतात. म्हणजे देशात एक लाखाच्या आसपास लोक आणि त्यांच्या परिवाराचे लोक सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांवर उदरनिर्वाहासाठी अवलंबून आहेत. पण एक प्रॉब्लेम आहे. भारतात दरवर्षी बॉलिवूड आणि प्रादेशिक फिल्म इंडस्ट्री मिळून 800 च्या आसपास चित्रपट प्रदर्शित होतात. त्यातले इनमीन 50च्या आसपास चित्रपट चालतात. काही अबोव्ह ऍव्हरेज धंदा करतात. बाकी सातशेच्या आसपास चित्रपट माती खातात. सिंगल स्क्रीन थिएटर्सचे मालक हे नेहमी तोट्यात असतात. सरकारकडून आकारले जाणारे अवाजवी कर, थिएटर चालवण्याचा प्रचंड खर्च (लाइटबिल, प्रोजेक्टर इ.), हिट चित्रपटांचे अतिशय कमी प्रमाण, पायरसी, घरी चित्रपट बघण्याची झालेली सोय; यामुळे प्रेक्षकांचा सिंगल स्क्रीनकडे येणारा ओघ आटला आहे. त्यामुळे इथे काम करणाऱ्या लोकांचे पगार अनेक महिन्यापासून थकलेले असतात. मात्र, गावगाड्यात मुळात रोजगाराच्या संधीच कमी असतात. त्यामुळे आहे ती नोकरी करण्याशिवाय पर्याय नसतो. तिथलं पब्लिक सलमानचा चित्रपट, धर्मा -यशराजचे सिनेमे लागले की जरा उत्साहाने चित्रपटगृहात हजेरी लावतात. यापूर्वी मिथूनचे -नाना पाटेकरचे सिनेमे बरे चालायचे. असा एखादा सिनेमा बरा चालला की, तिच तिथे काम करणाऱ्या लोकांची दिवाळी असते. मालक हात सैल सोडतो. जरा दोन दिवस खिशात चार पैसे खुळखुळतात. त्यामुळे सिनेमे व्यवस्थित चालले तर काही हजार घरात दिवाळीचे पणत्या पेटतील. बहिष्कार टाकणाऱ्या लोकांना वरळी सी फेसवर राहणाऱ्या निर्मात्याला आणि अभिनेत्याला शिक्षा करायची असते. पण बहिष्काराची शिक्षा मिळते या ‘इंडियात’न राहणाऱ्या आणि ‘भारतात’ राहणाऱ्या हजारो परिवारांना. चित्रपट पडतो तेव्हा सिंगल स्क्रीनमध्ये काम करणारे लोक भग्न चेहरे पाडून फिरतात. अभिनेत्यांना शिक्षा करण्याचे अजून इतर खूप मार्ग आहेत. हातावर पोट असणाऱ्या  लोकांच्या पोटावर पाय कशाला? असो मला राजकीय मुद्द्यांवर चर्चा करण्यात सध्या तरी रस नाही. पण खूप वर्ष हे सिंगल स्क्रीन थियेटर आमच्यासाठी मक्का-मदिना, काशी वैगेरे सगळे होते. खोटं कशाला बोला शेवटचा चित्रपट सिंगल स्क्रीनमध्ये कधी बघितलाय ते पण आठवत नाही. त्यामुळे हे प्रकारचं अरण्यरूदनच. तर सांगायचा मुद्दा की बहिष्काराची आर्थिक झळ स्टारला कधीच बसत नाही. ती बसते बॉलिवूडमधल्या कष्टकरी नाही रे वर्गाला. अजून एक नैतिक मुद्दा असा की, बहिष्काराचे अस्त्र आपण फक्त अभिनेत्यांविरुद्धच का उपसायचं? ते सोपं आहे म्हणून? शेकडो प्रकारचे गुन्हेगारी चार्जेस असणारे राजकारणी आपण डोक्यावर चढवून ठेवले आहेतच की, त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरु झाल्याचं मला तरी दिसलं नाही. आपल्या दुधवाल्यावर गुन्हा असू शकतो, आपल्या मोबाईल प्रोव्हायडर कंपन्यांवर कर चुकवणुकीचे गुन्हे असतात. आपण टाकतो का त्यांच्यावर बहिष्कार? अभिनेत्यांवर बहिष्कार टाकणं सोपं असत आणि त्यातून देशभक्ती सिद्ध होते हा एकमेव मुद्दा आहे. मुक्त अर्थव्यवस्थेत बहिष्कार व्यवहारिक नाही. हे बहिष्कार अस्त्र कस बोथट आहे, हे सांगण्याचा हेतू सलमानच्या चित्रपटांना छपरतोड गर्दी करा असं सांगणं नाही आहे. त्याचे सिनेमे प्रचंड वाईटच असतात. ते त्याच्या कर्मानेच फ्लॉप जावेत अशी इच्छा आहे. पण सिनेमा म्हणजे फक्त नायक नव्हे, तर कुठल्याही व्यक्तीपेक्षा मोठी असणारी कलाकृती आहे, हे जरी आपल्याला कळलं तरी सिनेमा साक्षरतेच्या दृष्टीने एक पाऊल पुढं पडलेलं असेल. संबंधित ब्लॉग जोडी नंबर वन कायद्यापेक्षा सत्याशी इमान असणारा ब्योमकेश बक्षी  जसपाल भट्टी-सामान्य माणसाचा कलाकार मित्र  अल्ताफ राजा आणि त्याचा निमशहरी सोशल रिलिव्हन्स राम लक्ष्मण-दुर्लक्षित मराठी सांगीतिक कर्तृत्व सौंदर्यवती  : सोनाली बेंद्रे ब्लॉग : ‘घायल’ आणि ‘घातक’ : तत्कालिन भारतीय असंतोषाचे प्रतीक ब्लॉग : सारे रास्ते वापस हरिहरन के पास आते है तकिया कलाम : एक विलुप्त होत चाललेली कला चंकी पांडे : पहलाज निहलानी, बांगलादेश आणि उदयप्रकाश यांनी प्रतिमा घडवलेला नट सिनेमा ‘बघण्याच्या’ प्रक्रियेत झालेली इव्होल्यूशन नव्वदच्या दशकातला पडद्यावरचा दार्शनिक : मोहनीश बहल गुलशन कुमार : संगीत क्षेत्रातला धूमकेतू  जतिन -ललित मध्यमवर्गीयांच्या महत्वाकांक्षा आणि प्रेमाचा भरजरी सांगीतिक तुकडा जेपी-असा दिग्दर्शक ज्याला पाकिस्तानातून धमक्या यायच्या  एका हरवलेल्या दशकाची डायरी : एक ऐसी लडकी थी! ब्लॉग : माजघरातल्या उबदार भीतीचा चेहरा एका हरवलेल्या दशकाची डायरी : या ‘सूर्यवंशम’चं काय करायचं ? जावेद जाफरी -दुर्लक्षित गुणवत्तावान  अलका याज्ञिक : जिचं गाण्यात असणं आपण गृहीत धरायचो अशी गायिका गर्दीश : हातातून निसटत जाणाऱ्या स्वप्नांची गोष्ट  श्रीदेवी नावाचं फेनॉमेन  कुमार सानू -एका  दशकाचा  आवाज (1)
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
Kim Jong Un : किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
स्वत:च लाटली गोल चपाती, लंगरसेवाही दिली; डोक्यावर पगडी, मोदींनी गुरुद्वारात टेकला माथा
स्वत:च लाटली गोल चपाती, लंगरसेवाही दिली; डोक्यावर पगडी, मोदींनी गुरुद्वारात टेकला माथा
Savani Ravindra : मतदान केंद्रावर गेली पण शाई न लावताच परतली; गायिकेने सांगितला अनुभव, नेमकं काय घडलं?
मतदान केंद्रावर गेली पण शाई न लावताच परतली; गायिकेने सांगितला अनुभव, नेमकं काय घडलं?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Saleel Kulkarni : सुप्रसिद्ध गायक, संगीतकार सलील कुलकर्णींनं लेकासोबत बजावला मतदानाचा हक्क : ABP MajhaBeed Loksabha Pankaja Munde : बाबांची उर्जा आणि आशीर्वाद माझ्यासोबत आहे : पंकजा मुंडेParli Lok Sabha Dhananjay Munde : छोट्या बहिणीला मतदान करताना जो आनंद झालाय तो शब्दात मांडण अशक्यUddhav Thackeray Lok Sabha :   निवडणूक महाभारतासारखी, लोकशाहीचं वस्त्रहरण होतंय : उद्धव ठाकरे

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
Kim Jong Un : किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
स्वत:च लाटली गोल चपाती, लंगरसेवाही दिली; डोक्यावर पगडी, मोदींनी गुरुद्वारात टेकला माथा
स्वत:च लाटली गोल चपाती, लंगरसेवाही दिली; डोक्यावर पगडी, मोदींनी गुरुद्वारात टेकला माथा
Savani Ravindra : मतदान केंद्रावर गेली पण शाई न लावताच परतली; गायिकेने सांगितला अनुभव, नेमकं काय घडलं?
मतदान केंद्रावर गेली पण शाई न लावताच परतली; गायिकेने सांगितला अनुभव, नेमकं काय घडलं?
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल
Pravin Tarde : बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
Video: शिरुर मतदारसंघात राडा, व्हिडिओ शेअर करत अमोल कोल्हेंचा संताप; सर्वात कमी मतदान
Video: शिरुर मतदारसंघात राडा, व्हिडिओ शेअर करत अमोल कोल्हेंचा संताप; सर्वात कमी मतदान
Kareena Kapoor Saif Ali Khan Viral Video :  ही असली कामे बेडरुममध्ये करा ना; सैफीनाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी भडकले
Video : ही असली कामे बेडरुममध्ये करा ना; सैफीनाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी भडकले
Embed widget