एक्स्प्लोर
पवन मल्होत्रा पे मत रो
आपल्या मनातल्या उर्मी मारून पवन घरच्या फॅक्टरीच्या घाण्यात शिरला. आता आपला अभिनय संपला असंच पवनला वाटलं असणार. पण नियतीच्या मनात वेगळंच होतं.

डॅनियल डे लुईस आणि पवन मल्होत्रा या दोघा अभिनेत्यांमध्ये दोन साम्य आहेत. दोघंही जबरदस्त अभिनेते आहेत हे पहिलं साम्य. दुसरं साम्य म्हणजे दोघांनी आपलं करियर गांधी चित्रपटापासून सुरु केलं होतं. पण हे साम्य इथंच संपतं. तीन ऑस्कर मिळवून प्रचंड यश मिळवून लुईस अभिनयातून निवृत्त पण झाला, पवन मल्होत्रा बिचारा अजून चाचपडतच आहे. लुईसचा अभिनेता म्हणून वापर हॉलीवूडने पुरेपूर करून घेतला. पवन मल्होत्राला मात्र आपल्या इंडस्ट्रीने पार वाया घातलं. इतक्या दीर्घ कारकीर्दीमध्ये पवनला चांगले म्हणता येतील असे फार कमी चित्रपट मिळाले. एका दिग्गज निर्मात्याने पवनला त्याच्या कारकीर्दीच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं, "इथं अभिनयक्षमतेच्या प्रमाणात कुणालाच पैसे मिळत नाही. तुम्ही जितके मोठे स्टार तितके जास्त पैसे तुम्हाला मिळणार. इथं कुणालाच अभिनयाची वगैरे काहीही पडली नाही." त्या निर्मात्याच्या मुखातून जणू प्रॉफेसीचं बोलत होती. पवनला त्या निर्मात्याच्या शब्दाचा प्रत्यय नंतर आयुष्यभर येत गेला
पवन मूळचा दिल्लीचा. त्याचे वडील छोटे उद्योजक होते. शाळेत असतानाच पवन रुचिका नावाच्या थियेटर ग्रुपशी जोडला गेला. त्या काळात त्याने इंग्रजी आणि हिंदी नाटकं केली. नंतर नंतर कॉलेजमध्ये तर पवनला नाटकाचा चस्काच लागला. पवनच्या वडिलांना अर्थातच हे रुचत नव्हतं. पोराचे रिकामे धंदे असाच त्यांचा दृष्टीकोण मुलाच्या धडपडीकडे बघण्याचा होता. त्यांनी एकदा पवनला समोर बसवलं आणि कळकळीने पवनला तू आताच्या घरच्या धंद्यात लक्ष घाल असा विनंतीवजा आदेश दिला. नाईलाजाने पवनने होकार दिला. त्याकाळात आजच्यासारखं मनोरंजन क्षेत्र फोफावलं नव्हतं. अभिनयाच्या क्षेत्रात मर्यादित संधी होत्या. आपल्या मनातल्या उर्मी मारून पवन घरच्या फॅक्टरीच्या घाण्यात शिरला. आता आपला अभिनय संपला असंच पवनला वाटलं असणार. पण नियतीच्या मनात वेगळंच होतं. त्यावेळेस 'गांधी ' सिनेमाचं प्री प्रोडक्शन जोरात सुरु होतं. थियेटर करत असताना झालेल्या एका ओळखीमधून पवनला त्या सिनेमात काम करणार का, अशी विचारणा झाली. पण अभिनय करायला मिळणार नव्हता तर, वॉर्डरोब असिस्टंट म्हणून काम करावं लागणार होतं. पवनने वडिलांची मनधरणी केली. मला शेवटचं एकदा हे काम करू द्या आणि मग मी पुन्हा धंद्यात लक्ष घालतो, अशी विनवणी केली. वडिलांनी जीवावर येऊन का होईना परवानगी दिली. शेवटची संधी म्हणून पवन दिल्लीबाहेर पडला खरा, पण त्याला यत्किंचितही कल्पना नव्हती की त्याची दिल्ली कायमची सुटणार आहे. पवन मुंबईला आला. नंतर 'गांधी' चित्रपटाच्या निमित्ताने पुणे, पटना पण फिरून आला. 'गांधी' चित्रपटाचं काम संपताच पवनला ऑफर आली ती 'जाने भी दो यारो' सिनेमाच्या सेटवर काम करण्याची. तोपर्यंत पवनने मुंबईतच जम बसवण्याचा निर्णय घेतला तिथं तो असिस्टंट डायरेक्टर असला तरी कमी बजेट असणाऱ्या सिनेमात तुम्हाला प्रसंगी पडेल ते काम करावे लागते. पवनचे सिनेमातले पहिले काही काम प्रोडक्शनमधलं होतं. पण त्याला 'नुक्कड' मध्ये अभिनय करण्याची ऑफर मिळाली आणि त्याचं आयुष्यच बदलून गेलं.
'नुक्कड' हा पवन मल्होत्राच्या कारकिर्दीमधला नव्हे तर एकूणच भारतीय टेलिव्हिजनमधला एक मैलाचा दगड आहे. त्याकाळी 'नुक्कड' टीव्हीच्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होती. 'नुक्कड' मधली हरी, गुरु, खोपडी, मधू, राधा ही पात्रं लोकांच्या मनात जाऊन बसली होती. 'नुक्कड'चं कथानक साधंसुधं होतं आणि त्यातली पात्र पण एकदम साधीसुधी. अगदी त्या काळासारखीच. खरं तर पवनच्या हरीला त्यात फारसा स्कोप नव्हता सुरुवातीला. पण हरी, मधू आणि राधामधला प्रेम त्रिकोण प्रेक्षकांना जाम आवडत आहे हे लक्षात आल्यावर पवनच्या हरीचा रोल वाढवण्यात आला. नुक्कडमुळे पवनला लोकप्रियतेची चव चाखायला मिळाली. 'नुक्कड' सिरीयल संपल्यावर पवन दिल्लीला आपल्या घरच्या फॅक्टरीमध्ये गेला होता. नुक्कड मधला हरी तिथे आला आहे हे कळल्यावर लोकांची प्रचंड गर्दी फॅक्टरीच्या आजूबाजूला जमली. गर्दी फॅक्टरीमध्ये घुसून यंत्रसामुग्रीला क्षती पोहोंचू नये म्हणून शेवटी दरवाजे आतून लावून घेण्यात आले. पण त्याचवेळेस पवनच्या अभिनयात कारकीर्द करण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या वडिलांना आपल्या मुलाचा निर्णय किती बरोबर होता ते लक्षात आलं. मुलाची लोकप्रियता बघून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू जमा झाले. वडिलांना झालेला आनंद बघून पवनच्या मनावरचं ओझं पण उतरलं.
नंतर पवनने 'सलीम लंगडे पे मत रो', आणि 'बाघ बहादूर' सारखे जबरदस्त रोल केले. या दोन्ही सिनेमांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पण दुर्दैवाने पवन मात्र राष्ट्रीय पुरस्कारांपासून वंचित राहिला.

अनुराग कश्यपचा 'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे पवन मल्होत्राच्या अभिनय क्षमतेचा साडे तीन तासाचा स्लाईड शो आहे. त्यात एक प्रसंग आहे. बॉम्बस्फोट करण्याच्या कटात सामील असणाऱ्यांची एक मिटिंग टायगर मेमन घेतो. त्यात तो सगळ्यांना एक गर्भित धमकी देतो. "जे लोक तोंड उघडतील त्याला तर मी मारेलच. पण त्याच्या अगोदर त्याच्या अख्ख्या खानदानाला मारेल. "ती धमकी ऐकून पिक्चर पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या पाठीतून एक थंड शिरशिरी जाते. दुसऱ्या एका प्रसंगात बादशहा खानला रुममध्ये बोलवून, "किधर का बादशाह तू ?" असं गुर्मीत विचारतो आणि त्याला लंबचौड भाषण देऊन कटात सामील करून घेतो. अजून एका सीनमध्ये तो बॉम्बस्फोटांची आखणी आय एस आय च्या लोकांसोबत बसून करतो. मुंबई ही भारताची लाईफलाईन आहे आणि आपण तिथंच घाव घातला पाहिजे असं तो निक्षून सांगतो. दंगलीमध्ये त्याचं दुकान जाळल्यावर अख्खी बम्बई जला देगा मै अशी धमकी ओरडून देतो. पवन मल्होत्रा शिवाय ब्लॅक फ्रायडेची कल्पनाच करता येत नाही. आणि त्यात के के, आदित्य श्रीवास्तव, नवाज असे एकाहून एक भारी लोक होते. तो भूमिकेसाठी रिसर्च करण्यासाठी चक्क डोंगरीत जाऊन राहिला होता. तिथलं पब्लिक अजून पण टायगर म्हणूनच हाक मारतं. टायगर मेमन म्हटलं की बहुसंख्य लोकांच्या डोळ्यासमोर खऱ्या टायगर मेननच्या ऐवजी पवन मल्होत्राचं येतो. पवनच्या भूमिका असणारे 'बाघ बहादूर' , 'सलीम लंगडे पे मत रो ' असे पिक्चर गाजले . पण ब्लॅक फ्रायडे हीच या देखण्या अभिनेत्याच्या आयुष्यातली डिफायनिंग मोमेन्ट असावी. पिक्चर न रखडता रिलीज झाला असता तर आज पवन अजून कुठल्यातरी भारी ठिकाणी असता. पण नियतीला हे मंजूर नसावं. पवन अजून जुन्या काळात रमला असावा. माझ्या एका ओळखीच्या असिस्टंट कास्टिंग डायरेक्टरने सांगितलं होत की पवन कास्टिंग डायरेक्टर थ्रू ऑडिशन देण्यास नाखूष असतो. ओळखीच्या डायरेक्टरने अप्रोच केलं की स्वारी खुश. इम्तियाज अलीच्या एका फोनवर त्याने जब वी मेट केला होता. पवन मल्होत्रा आणि अजय देवगण या दोघांचे डोळे इंडस्ट्रीत सगळ्यात इंटेन्स असावेत. ब्लॅक फ्रायडे मध्ये त्याच्या नजरेसमोर भले भले गळपटतात.
पवनने पंजाबी आणि दाक्षिणात्य सिनेमात पण काम केली आहेत. तिथून त्याला बऱ्यापैकी पैसा आणि काही पुरस्कार पण मिळाले. एखादा आव्हानात्मक रोल मिळाला तर पवनला मराठी सिनेमात पण काम करायला नक्की आवडेल. पवनच्या खात्यावर एक चांगला रोल जमा होईल आणि मराठीला एक चांगला अभिनेता मिळेल. विन-विन सिच्युएशन.
पवनच्या कारकिर्दीचे विश्लेषण थोडक्यात करायचं तर स्वतःला विकू न शकणारा प्रचंड क्षमतेचा अभिनेता असं करता येईल. पवनला पुन्हा एक दुसरा 'ब्लॅक फ्रायडे ' लवकरच मिळो हीच सदिच्छा.
-अमोल उदगीरकर
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग