एक्स्प्लोर

मद्रास कॅफे : भारताच्या व्हिएतनामची अस्वस्थ करणारी कहाणी

'मद्रास कॅफे' हा १९८७ मधील भारतीय लष्कराच 'विएतनाम' प्रभावी पणे चित्रित करणारा चित्रपट लष्करी बळावर आजूबाजूच्या चिमुकल्या देशाना चिरडून टाकु हा गंड बाळगण्याचे भीषण परिणाम दोन्ही देशाना कसे भोगावे लागतात याची आठवण करून देतो .

स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये भारतात आणि उर्वरित जगामध्ये घडलेल्या महत्वाच्या घटनांना सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर आणण्यात एक फिल्म इंडस्ट्री म्हणून प्रचंड कमी पडलो आहोत .1989 ला बर्लिनची भिंत पडली त्यावर्षी आपल्याकडचे सर्वात हिट चित्रपट होते 'मैने प्यार किया ' आणि 'चांदनी '. 1990 ला आखाती युद्ध झालं आणि त्यावर्षी आपल्याकडचे सगळ्यात हिट सिनेमे होते 'दिल ' आणि 'आशिकी
1991 ला जागतिकीकरण भारतात आलं त्यावर्षी आपल्याकडचे सगळ्यात हिट सिनेमे होते 'साजन ' आणि 'फुल और कांटे '. हि लिस्ट अजून खूप वाढवता येईल . देशात येऊन गेलेली अन्यायकारक आणीबाणी आपल्याला अजून धड पडद्यावर व्यवस्थित आणता आली नाही . जग हलवणाऱ्या या घटनांचं प्रतिबिंब जगातली सगळ्यात मोठी इंडस्ट्री म्हणवून घेणाऱ्या भारतीय चित्रपट सृष्टीच्या एकाही चित्रपटात पडू नये हे कमाल आहे . इश्क -प्यार -मोहोब्बत ने हमको किया निकम्मा वरना हमारी फिल्म इंडस्ट्री भी थी काम की .पण 'मद्रास कॅफे ' सारखा एक सिनेमा आपल्या तरुण माजी पंतप्रधानांच्या हत्येचा पाठपुरावा करतो आणि त्या प्रकरणातली गुंतागुंत प्रेक्षकांसमोर आणतो ही महत्वाची घटना आहे . या एकवीस मे ला राजीव गांधींच्या हत्येला अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाली आहेत . त्यानिमित्ताने या हत्येचा वेध घेणाऱ्या 'मद्रास कॅफे ' या अफलातून सिनेमाचं रसग्रहण होणं आवश्यक आहे . अनेक  शक्तिमान देशांच्या आणि हुकूमशहांच्या अहंकाराची थडग चिमुकल्या आणि लौकिकार्थाने कमजोर देशांमध्ये सापडतात. औरंगझेब आणि त्याच्या उद्दाम सरदारांची ज्याप्रमाणे महाराष्ट्रात सापडतात तशी.. सर्व शक्तिमान अमेरिकेला तर या नियमाने अनेक वेळा तडाखा दिला आहे. मग ते विएतनाम युद्ध असो किंवा इराक युद्ध असो. रशिया सारख्या प्रचंड लष्करी बळ असणार्‍या देशाचे पण अफगाणिस्तान मध्ये वस्त्र हरण झाले आणि त्याना तिथून माघार घ्यावी लागली. कीबहुना या अफगाण युद्धाने रशियन कमजोर अर्थव्यवस्थेवर इतका ताण पडला की तत्कालीन सोविएत यूनियन चे विघटन होण्याला जी अनेक कारण कारणीभूत ठरली त्यात या अफगाण युद्धाचा क्रम बराच वरचा आहे. १९६२ मध्ये भारताचा दारुण पराभव करणार्‍या चिनी लाल सैन्याला १९७९ मध्ये विएतनाम मध्ये दारुण पराभव स्वीकारावा लागला. या नियमाला सिद्ध करणारा अपवाद सापडणे तसे कठीण. अगदी आपला भारत देश पण.  शूजीत सरकार या अफलातून दिग्दर्शकाचा 'मद्रास कॅफे' हा १९८७ मधील भारतीय लष्कराच 'विएतनाम' प्रभावी पणे चित्रित करणारा चित्रपट  लष्करी बळावर आजूबाजूच्या चिमुकल्या देशाना चिरडून टाकु हा गंड बाळगण्याचे भीषण परिणाम दोन्ही देशाना कसे भोगावे लागतात याची  आठवण करून देतो . आंतरराष्ट्रीय घटनांच्या पार्श्वभूमीवर चित्रपट बनण्याची वेळ भारतीय चित्रपट सृष्टीत जवळ जवळ नाहीच. ( माझया मते निव्वळ युद्ध पट या श्रेणीत मोडत नाहीत. त्यामुळे बॉर्डर आणि हकिकत हे बाद). कबीर खान चा 'काबुल एक्सप्रेस' हा नियम सिद्ध करणारा अपवाद. 'मद्रास कॅफे' हा शूजीत सरकार या दिग्दर्शकाचा दीर्घ कारकिर्दीतला हा केवळ तिसरा चित्रपट. त्याच्या पहिल्या 'यहाँ' चित्रपटात धागधगत्या काश्मीर च्या पार्श्वभूमीवर एक भारतीय मेजर आणि एक काश्मीरी मुलगी यांच्यातली प्रेम कहाणी तरल पणे मांडली होती. विकी डोनर हा स्पर्म डोनेशन वर खुष्खुशीत भाष्य करणारा त्याचा दुसरा चित्रपट बॉक्स ऑफीस वर पण चांगलाच चालला होता. विकी डोनर नंतर मोठे स्टार घेऊन सर्व सामन्यांची मनोरंजनाची मागणी पूर्ण करणारा चित्रपट बनवण्याची सेफ बेट घेण्याची संधी सोडून त्याने भारताने श्रीलंका प्रश्नात केलेला हस्तक्षेप व त्या पार्श्वभूमीवर राजीव गांधींची झालेली हत्या हा चाकोरीबाहेरचा विषय निवडून त्याने आपले वेगळेपण सिद्ध केले. कहाणी सुरू होते ती रॉ ही भारतीय गुप्तहेर संघटना मेजर विक्रम सिंग या आपल्या अधिकार्‍याला तमिळ प्रश्नात वाढणारे अण्णा (प्रभाकारन या तमिळ दहशतवाद्यावर बेतलेल पात्र ) चे वर्चस्व कमी करून त्याला जाफना या तामिळ बहूल भागात एक दुसरा राजकीय पर्याय उभा करण्याच्या कामगिरीवर पाठवते. विक्रम सिंग जेंव्हा श्रीलंकेत प्रवेश करतो तेंव्हा सलामिलाच त्याला अनेक भारतीय शांती सेनेतील सैनिकांचे मृतदेह दिसतात. आपल्या पुढयात काय वाढून ठेवल आहे याची चुणूक विक्रम सिंग ला मिळते. अण्णा ला राजकीय पर्याय उभा करताना त्याला हे ही जाणवते की फितुरी आणि दगाबाजी यानी भारतीय राजकीय आणि लष्करी उद्दिष्टांचा कणाच मोडून काढला आहे. तरीही विक्रम सिंग आपले सर्वस्व पणाला लावून देशासाठी लढतो. पण त्याला त्याची किंमत आपल्या वैयक्तिक आयुष्यात मोजावी लागते. तरीही विक्रम सिंग तमिळ दहशतवादी संघटनेची पाळमुल खणुन काढण्याच आपल काम चालूच ठेवतो. ही तमिळ संघटना श्रीलंके मध्ये शांती सैन्य पाठवणार्या आपल्या माजी पंतप्रधानांना  मारणार  आहे अशी त्याला खात्री पटत चालली आहे. दरम्यान अंतर्गत फितुरी , श्रीलंका सरकारचे असहकाराचे धोरण, तमिळ बंडखोरांचा  कडवा प्रतिकार आणि झालेली बेसुमार हानी यामुळे भारत आपली फौज माघारी घेतो .विक्रम सिंग आपल्या नेत्याची हत्या टाळण्यात यशस्वी होतो? अण्णा ला राजकीय पर्याय उभा राहतो? विक्रम सिंग चे पुढे काय होते? या प्रश्नांची उत्तर सत्य घटनेवर आधारित असलेला चित्रपट ( संबंधित निर्माते आणि दिग्दर्शक याचा इनकार करत असले तरी)देतो. आणि ही उत्तर नक्कीच आपला राष्ट्रीय गर्व वाढवणारी नाहीत. चित्रपट सर्वच आघाडीवर सरस आहे. कुठलेही पात्र विनाकारण घुसडलेले वाटत नाही. ना मनोरंजक गाणी, ना कॉमिक रिलीफ ना अंगप्रदर्शन त्यामुळे मनोरंजन हा शुद्ध हेतू बाळगून जाणार्‍या पब्लिक ने इकडे न गेलेलेच बरे. विक्रम सिंग ला त्याच्या कामात मदत देणारी पत्रकार नर्गिस फाखरी ने चांगली केली आहे. ' Criticizing my national policies doesn't make me anti national" हा तिचा संवाद बरेच काही सांगून जातो. आजच्या लोकांची देशद्रोही -देशप्रेमी अशी उथळ वर्गीकरण करणाऱ्या काळात तर हा संवाद अजूनच महत्वाचा ठरलाय .व्यवसायिक गुप्तहेर अधिकार्‍याच्या भूमिकेत जॉन अब्राहम चक्क शोभून दिसतो. माठ अभिनेता म्हणून ओळखल्या जाणार्‍या या अभिनेत्याने प्रोड्यूसर म्हणून वेगवेगळे विषय निवडून चांगलीच चमक दाखवली आहे. शंतनू मोइत्रचे क्रेडिट्स च्या वेळी येणारे मौला हे गाणे अप्रतिम. युद्धग्रस्त  श्रीलंकेला कॅमेरया मध्ये अप्रतिम पणे बद्ध करणारी सिनेमॅटोग्राफी पण खूप जबरदस्त होती .
पण चित्रपटाचे खरे नायक आहेत ते प्रचंड रिसर्च करून पटकथा लिहिणारी सोमनाथ डे आणि शुभेन्दु भट्टाचार्य ही जोडगोळी व दिग्दर्शक शूजीत सिर्कार. जर विकी डोनर ची पुण्याई नसती तर कदाचित हा चित्रपट पडद्यावर आला असता की नाही याबद्दल शंका घ्यायला वाव आहे.
'मद्रास कॅफे ' च्या प्रदर्शनाला तामिळनाडू मध्ये जोरदार विरोध झाला होता . कारण त्यामध्ये प्रभाकरन या तमिळ ईलम साठी लढा देणाऱ्या नेत्याचं चित्रण खलनायकी स्वरूपात केलं होत . राजीव गांधी यांची निर्घुण हत्या घडवून आणणाऱ्या प्रभाकरन बद्दल देशात संतापाची भावना असली तरी तामिळनाडूमध्ये त्याला मानणारा एक मोठा वर्ग आहे हे एक उघड गुपित आहे . अगदी करुणानिधी यांचा द्रमुक हा पक्ष पण प्रो -प्रभाकरन होता . मागच्याच वर्षी श्रीलंकन सेनेने निर्घुणपणे ज्याची हत्या केली होती त्या प्रभाकरनच्या लहान मुलावर तामिळनाडूमध्ये चित्रपट आला होता . 2014 मध्ये पंजाबमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांच उदात्तीकरण करणाऱ्या 'कौम दे हिरे ' या चित्रपटावरून मोठ वादळ उठल होत . भिंद्रनवाले आणि खलिस्तान चळवळीबद्दल ममत्व बाळगणारा एक मोठा वर्ग आजही पंजाबमध्ये आहे .कधी कधी हे प्रादेशिक राष्ट्रवाद एकमेकाच्या विरुद्ध उभे ठाकतात . महाराष्ट्र -कर्नाटक सीमावादावर बनलेल्या 'मराठा टायगर्स ' या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून चालू असलेला वाद हे याचे उदाहरण . या सिनेमाच्या निमित्ताने कन्नड अस्मिता आणि मराठी अस्मिता यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली होती  . चित्रपट हे मॅक्रो पातळीवर नसले तरी माइक्रो लेवल ला खूप मोठे बदल घडवून आणू शकतात हे माझे मत. एसी कॅबिन मध्ये बसून भरल्या पोटी भारताने पाकिस्तान वर त्वरित हल्ला चढवून पाकिस्तान नष्ट करावा अशी स्टेटस फेस्बूक वर अपडेट करणार्‍यांपैकी काही लोका ना तरी युद्ध हे किती वाईट असते आणि आपले काहीच स्टेक वर नसताना प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढणार्‍याला किती तरी गमवावे लागते याची जाणीव होऊन त्यानी युद्धखोरीची वांझ भावना बदलली तरी मद्रास कॅफे हा १०० कोटी कमावणाऱ्या  इतर चित्रपट पेक्षा यशस्वी होईल.

संबंधित ब्लॉग :

बॉलिवूडमधल्या पहिल्या हिट अँड रनची गोष्ट

'हम आपके है कौन' आणि आपली बदललेली लग्न

सोशल मीडिया, सिनेमा आणि आपण  चित्रपटांवरच्या बहिष्कारामागचं अ(न)र्थशास्त्र  जोडी नंबर वन कायद्यापेक्षा सत्याशी इमान असणारा ब्योमकेश बक्षी  जसपाल भट्टी-सामान्य माणसाचा कलाकार मित्र  अल्ताफ राजा आणि त्याचा निमशहरी सोशल रिलिव्हन्स राम लक्ष्मण-दुर्लक्षित मराठी सांगीतिक कर्तृत्व सौंदर्यवती  : सोनाली बेंद्रे ब्लॉग : ‘घायल’ आणि ‘घातक’ : तत्कालिन भारतीय असंतोषाचे प्रतीक ब्लॉग : सारे रास्ते वापस हरिहरन के पास आते है तकिया कलाम : एक विलुप्त होत चाललेली कला चंकी पांडे : पहलाज निहलानी, बांगलादेश आणि उदयप्रकाश यांनी प्रतिमा घडवलेला नट सिनेमा ‘बघण्याच्या’ प्रक्रियेत झालेली इव्होल्यूशन नव्वदच्या दशकातला पडद्यावरचा दार्शनिक : मोहनीश बहल गुलशन कुमार : संगीत क्षेत्रातला धूमकेतू  जतिन -ललित मध्यमवर्गीयांच्या महत्वाकांक्षा आणि प्रेमाचा भरजरी सांगीतिक तुकडा जेपी-असा दिग्दर्शक ज्याला पाकिस्तानातून धमक्या यायच्या  एका हरवलेल्या दशकाची डायरी : एक ऐसी लडकी थी! ब्लॉग : माजघरातल्या उबदार भीतीचा चेहरा एका हरवलेल्या दशकाची डायरी : या ‘सूर्यवंशम’चं काय करायचं ? जावेद जाफरी -दुर्लक्षित गुणवत्तावान  अलका याज्ञिक : जिचं गाण्यात असणं आपण गृहीत धरायचो अशी गायिका गर्दीश : हातातून निसटत जाणाऱ्या स्वप्नांची गोष्ट  श्रीदेवी नावाचं फेनॉमेन  कुमार सानू -एका  दशकाचा  आवाज (1)

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold price hike dollar rate: अबब! सोने दरात मोठी उसळी, एका आठवड्यात 5000 रुपयांनी भाव वाढला, एक तोळा सोन्याची किंमत किती?
सोने दरात मोठी उसळी, एका आठवड्यात 5000 रुपयांनी भाव वाढला, एक तोळा सोन्याची किंमत किती?
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
Maharashtra Live blog: अखेर ऊस दराची पहिल्या उचलीची कोंडी फुटली, पहिली उचल 2725 जाहीर
Maharashtra Live blog: अखेर ऊस दराची पहिल्या उचलीची कोंडी फुटली, पहिली उचल 2725 जाहीर
Gold : सोनं आणखी महागणार, 2026 मध्ये सोनं 35 -40 हजारांनी वाढणार? कोणत्या कारणानं सोन्याचे दर भडकणार? जाणून घ्या 
सोनं आणखी महागणार, 2026 मध्ये 30 टक्के दर वाढणार, कोणत्या कारणानं सोन्याचे दर भडकणार? जाणून घ्या 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sayaji Shinde :सयाजींची भूमिका सत्ताधाऱ्यांना पटेना, वृक्षतोडीला सयाजी शिंदेंचा विरोध Special Report
Nitesh Rane : झाडांचा गेम, बकऱ्यांवरून नेम; पर्यावरणप्रेम आणि बकऱ्यांचा संबंध तरी काय? Special Report
Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
Mumbai Goregaon Vivek College : गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बुरखा आणि हिजाबबंदीवरून तणाव
Kishori Pednekar on Nashik : साधुसंतांना पुढे करून वृक्षतोड करणार असाल, तर कोणी सहन करणार नाही

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold price hike dollar rate: अबब! सोने दरात मोठी उसळी, एका आठवड्यात 5000 रुपयांनी भाव वाढला, एक तोळा सोन्याची किंमत किती?
सोने दरात मोठी उसळी, एका आठवड्यात 5000 रुपयांनी भाव वाढला, एक तोळा सोन्याची किंमत किती?
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
Maharashtra Live blog: अखेर ऊस दराची पहिल्या उचलीची कोंडी फुटली, पहिली उचल 2725 जाहीर
Maharashtra Live blog: अखेर ऊस दराची पहिल्या उचलीची कोंडी फुटली, पहिली उचल 2725 जाहीर
Gold : सोनं आणखी महागणार, 2026 मध्ये सोनं 35 -40 हजारांनी वाढणार? कोणत्या कारणानं सोन्याचे दर भडकणार? जाणून घ्या 
सोनं आणखी महागणार, 2026 मध्ये 30 टक्के दर वाढणार, कोणत्या कारणानं सोन्याचे दर भडकणार? जाणून घ्या 
Yavatmal Bus Accident : चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू  चिरत गेला, दोघांचा मृत्यू, 14 जखमी
चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू चिरत गेला, दोघांचा मृत्यू
Hardik Pandya : हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, गुजरात विरुद्धच्या मॅचचं ठिकाण बदलावं लागलं, आता पांड्याची SMAT मधून एक्झिट, कारण समोर
हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, आयोजकांवर सामन्याचं ठिकाण बदलण्याची वेळ, काय घडलं?
Modi-Putin : नरेंद्र मोदी- पुतिन यांचा एकाच कारमधून प्रवास, दोन्ही नेते महाराष्ट्र पासिंग SUV Toyota फॉर्च्यूनरमधून रवाना 
नरेंद्र मोदी- पुतिन यांचा एकाच कारमधून प्रवास, दोन्ही नेते महाराष्ट्र पासिंग SUV Toyota फॉर्च्यूनरमधून रवाना 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
Embed widget