एक्स्प्लोर

सिनेमांच्या शीर्षकांमधल्या टॅगलाईन्स : काही निरीक्षणं

कधी कधी मराठी सिनेमाच्या नावापुढे विचित्र टॅगलाईन लागते आणि मजेशीर प्रकार घडतात . आपले मराठी दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्या सैल या चित्रपटाची टॅग लाईन 'सैल - द लूज ' अशी होती असे ऐकतो!!!समीर धर्माधिकारीचा "ओरखडा : द स्क्रॅच." (हो का? आम्हाला माहीतच नव्हतं) नावाचा सिनेमा आला होता .

विषय म्हणाल तर गंभीर पण आणि रोचक पण. हा विषय म्हणजे, चित्रपटांच्या टायटलपुढे येणाऱ्या टॅगलाईन्स. या टॅगलाईनने चित्रपटा कशासंदर्भात आहे याबद्दल एक इंटरेस्टिंग स्टेटमेंट करणं अपेक्षित असत. सिनेमाच्या ट्रेलरसाठी आणि पोस्टरसाठी टॅगलाईन लिहिणं ही सिनेमाच्या मार्केटिंगची सुरुवात असते. सिनेमाच्या शीर्षकात हल्ली हमखास एक टॅगलाईन जोडलेली दिसते. ही टॅगलाईन कधी चित्रपटाचा लेखक लिहितो, तर कधी दिग्दर्शक पण ती निर्माण करतो. कधी कधी सिनेमाचं मार्केटिंग करणारी एजन्सी पण टॅगलाईनबद्दल सूचना करते. जाहिरातीमध्ये जे कॉपीचं महत्व असतं तेच महत्व सिनेमाच्या टॅगलाईनमध्ये असतं. सिनेमाची टॅगलाईन लिहिताना अनेक घटकांचा विचार करावा लागतो . जस सिनेमाचा जॉनर, प्लॉट, टोन आणि झालंच तर सिनेमात कोण अभिनेता-अभिनेत्री आहेत याचा पण विचार करावा लागतो. सिनेमाच्या पोस्टरवर आकर्षक व्हिज्युअलसोबत जेंव्हा एक चांगली टॅगलाईन असते तेंव्हा त्या पोस्टरचे जेणेकरून सिनेमाचं इम्प्रेशन प्रेक्षकांच्या मनावर फार चांगलं पडत . काही लँडमार्क सिनेमांच्या टॅगलाईनची उदाहरणं बघण्यासारखी आहेत . 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ' ची टॅगलाईन होती 'Come ,fall in love '. 'एलियन ' ची टॅगलाईन होती 'In space no one can hear your scream .' पण काही फिल्म्सच्या टॅगलाईन इतक्या विचित्र असतात त्या वाचून गुदगुल्या झाल्यासारखं फिलिंग येतं . एक संजय दत्त , चंद्रचूड सिंग आणि महिमा चौधरीचा 'दाग ' नावाचा चित्रपट होता . त्याच्यापुढे दिग्दर्शकाने 'द फायर' अशी टॅगलाईन जोडून टाकली होती . दाग आणि द फायर या दोन दूरदूरपर्यंत संबंध नसलेल्या शब्दांमुळे हा एकूणच हे विनोदी प्रकार झाला . बहुतेकजण त्या पिक्चरचा उल्लेख 'दाग द फायर ' असाच एका दमात करतात . दाग द फायर वर शेखर सुमन बोलला होता की आता एक सिनेमा येईल त्याचं नाव असणार आहे Aag the stain. असली जबरदस्त कॉमेंट शेखर सुमन सारख्या अवलिया विनोदवीरालाच सुचू शकते .सलमानच्या 'क्यूँ की ' ची टॅगलाईनअशीच विचित्र होती - 'क्यूँ की -इट्स फेट . सध्या सर्वकालीन ट्रॅशी चित्रपटाच्या स्पर्धेत आघाडीवर असणाऱ्या 'जानी दुश्मन ' ची टॅगलाईन होती - जानी दुश्मन -एक अनोखी प्रेमकहानी . आता ज्यांनी हा पिक्चर बघितला आहे आणि ज्यांना यातली अनोखी प्रेमकहानी काय आहे हे माहित आहे त्यांना ही टॅगलाईन वाचून तुफान हसू येईल . अशाच काही विचित्र टॅगलाईन म्हणजे 'आन -मॅन ऍट वर्क ' ,' 'EMI - ली है तो चुकानी पडेगी ' ,' तेरे संग - A Kidult story ' . कधी कधी या टॅगलाईन मध्ये दिग्दर्शकाचा आपल्या चित्रपटाबद्दलचा आत्मविश्वास दिसतो . उदाहरणार्थ रमेश सिप्पीच्या 'शोले ' ची टॅगलाईन होती -The greatest story ever told..'शोले' सिनेमाचे चाहते या टॅगलाईनशी एकदम सहमत असतील .  काही टॅगलाईन चित्रपटाच्या विषयाला खूप सुंदर न्याय देतात . "तेजाब " ची tagline ही भारी होती...The Violent Love Story... 'लक्ष्य ' ची टॅगलाईन होती -It took him 24 years and 18000 feet to find himself”. 'लक्ष्य' सिनेमा ज्यांनी पाहिला आहे आणि हृतिकने साकारलेल्या करण शेरगिलचा आयुष्याशी जिंकलेला झगडा ज्यांना प्रचंड आवडलेला आहे , त्यांना या टॅगलाईनची यथार्थता कळेल .  'स्वदेस' चीटॅगलाईन होती -We The People . भारतीय संविधानातल्या "We the people of India ' या सुप्रसिद्ध शब्दांमधले पहिले तीन शब्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरने  चित्रपटाच्या टायटलला सपोर्ट करण्यासाठी खुबीने वापरले . कोणे एके काळी जेंव्हा रामगोपाल वर्मा 'रामगोपाल वर्मा 'होता  तेंव्हा त्याने  त्याने 'जंगल' नावाचा सिनेमा  केला  होता. जंगलची टॅगलाईन होती -It took his love!'जंगल ' मधला  खलनायक कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनवर आधारलेला होता . तो जंगलात सहलीला गेलेल्या नायिकेचं अपहरण करतो आणि मग नायक तिला सोडवण्यासाठी कशी खटपट करतो याची कथा सिनेमात होती . काही टॅगलाईन्स चित्रपटांच्या पोस्टरला खूप चांगल्या पद्धतीने कॉप्लिमेंट देतात . 'लगे रहे मुन्नाभाई ' च्या पोस्टरवर बाईकवर बसलेल्या मुन्ना आणि सर्किटच्या बॅकग्राउंडला ढगाने गांधीजींच्या चेहऱ्याची आऊटलाईन दाखवून टॅगलाईन दिली होती -They are back -and they are not alone . 'कहानी ' च्या पोस्टरवर प्रेग्नन्ट विद्याची छबी होती आणि पोस्टरवर टॅगलाईन होती -'Mother ' of all story . किंवा नुकत्याच आलेल्या 'दंगल ' ची टॅगलाईन होती - म्हारी छोरियां छोरों से कम हैं के. 'न्यूटन ' चीटॅगलाईन आहे -सिधा इन्सान उलटी दुनिया '.एम. एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी या शीर्षकापुढेही द मॅन यू नो, द जर्नी यू डू नॉट अशी छान टॅगलाइन होती. अर्थात अनेकदा उत्तम टॅगलाइनमुळे चित्रपटाबद्दलच्या अपेक्षा उंचावल्या जातात आणि मग एखादा एरवी चांगला वाटला असता, असा चित्रपटही 'काहीच दम नाही' असा कॅटेगरीत जातो. माझं एम. एस. धोनी...बद्दल काहीसं असंच झालं..पण हॉलिवूडचे लोक याबाबतीत पण सरस आहेत आपल्यापेक्षा . नोलनच्या 'प्रेस्टिज' ची टॅगलाईन मस्त आहे. "Are you watching closely?" . हाॅलिवूडच्या ‘quiz show’ ची टॅगलाईन पण मस्त होती... -Fifty million people watched, but no one saw a thing. सिनेमा पाहिल्यावर हे किती चपखल आहे ते कळतं. पण पाहिला नसेल तर हे डेंजर वाटतं.यात अजून एक मजेशीर addition.आधीच सिनेमाचं नाव 'Eternal Sunshine of the Spotless Mind' इतकं मोठं होतं आणि ते कमी confusing वाटलं की काय म्हणून charlie Kaufman ने त्याला tagline जोडली. - "You can erase someone from your mind. Getting them out of your heart is another story." सोशल नेटवर्क ' ,'एलियन वर्सेस प्रिडीटर ' , 'आय एम लेजंड ' यांच्याटॅगलाईन गुगलून बघा . भन्नाट प्रकार आहे . मराठी सिनेमाला काही सन्माननीय अपवाद वगळता हे टॅगलाईन प्रकरण झेपतच नाही की काय अशी शंका येते . कधी कधी मराठी सिनेमाच्या नावापुढे विचित्र टॅगलाईन लागते आणि मजेशीर प्रकार घडतात . आपले मराठी दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्या सैल या चित्रपटाची टॅग लाईन 'सैल - द लूज ' अशी होती असे ऐकतो!!!समीर धर्माधिकारीचा "ओरखडा : द स्क्रॅच." (हो का? आम्हाला माहीतच नव्हतं) नावाचा सिनेमा आला होता . .दाक्षिणात्य चित्रपट आणि टॅगलाईन यावर एक विद्यापीठ उभा राहिल.दाक्षिणात्य सिनेमांच्या टॅगलाईन्स या अनेकवेळा बटबटीत आणि नायकाचं उदात्तीकरण करणाऱ्या असतात . सध्या देशभरात खासगी मनोरंजन वाहिन्यांचे पेव फुटले आहे . या चॅनल्स ला पण टॅग लाईन्स आहेत आपल्या कडे..याची काही उदाहरण पुढीलप्रमाणे : Star- रीशता वही सोच नयी. SAB - असली मजा सब के साथ आता है. Zee- उम्मीद से सजे जिंदगी. या शिवाय स्टुडिओ लोगो /3 ओपनिंग क्रेडिट हा सुद्दा एक वेगळा विषय आहे. यशराज च पहा ना... सालानुरुप त्यात बदल झाले. लता दीं चा आवाज त्यात एक भारदस्त पणा आणतो. कोलंबिया, फाॅक्स स्टार हे ही दरवेळेस बघावे वाटतात. तर बाजीराव मस्तानी /३०० यांचे ओपनिंग तथा एन्ड क्रेडिट अॅनिमेशन पुन्हा पुन्हा पहावेसे वाटतात. एकूणच टॅगलाईन हा इंटरेस्टिंग विषय आहे . अजून भरपूर लिहिण्याइतका.
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune traffic Update: थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर
थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर
Pune Mahanagarpalika Election 2026: 15 जागांची यादी पाहून भाजपने विषयच सोडला, पुण्यात शिवसेना-भाजपची युती कशी तुटली, वाचा इनसाईड स्टोरी
15 जागांची यादी पाहून भाजपने विषयच सोडला, पुण्यात शिवसेना-भाजपची युती कशी तुटली, वाचा इनसाईड स्टोरी
BJP Candidate : भाजपच्या दिग्गज नगरसेवकांना धक्का, तरुण कार्यकर्त्यांना संधी; पुण्यात निम्म्या विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, नागपुरात 11 तरुण नवे चेहरे
भाजपच्या दिग्गज नगरसेवकांना धक्का, तरुण कार्यकर्त्यांना संधी; पुण्यात निम्म्या विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, नागपुरात 11 तरुण नवे चेहरे
BMC Election 2026: वंचितने काँग्रेसकडून 63 जागा मागितल्या, पण 16 जागांवर उमेदवारी अर्ज भरलेच नाहीत, समोर आलं मोठं कारण
वंचितने काँग्रेसकडून 63 जागा मागितल्या, पण 16 जागांवर उमेदवारी अर्ज भरलेच नाहीत, समोर आलं मोठं कारण
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune traffic Update: थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर
थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर
Pune Mahanagarpalika Election 2026: 15 जागांची यादी पाहून भाजपने विषयच सोडला, पुण्यात शिवसेना-भाजपची युती कशी तुटली, वाचा इनसाईड स्टोरी
15 जागांची यादी पाहून भाजपने विषयच सोडला, पुण्यात शिवसेना-भाजपची युती कशी तुटली, वाचा इनसाईड स्टोरी
BJP Candidate : भाजपच्या दिग्गज नगरसेवकांना धक्का, तरुण कार्यकर्त्यांना संधी; पुण्यात निम्म्या विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, नागपुरात 11 तरुण नवे चेहरे
भाजपच्या दिग्गज नगरसेवकांना धक्का, तरुण कार्यकर्त्यांना संधी; पुण्यात निम्म्या विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, नागपुरात 11 तरुण नवे चेहरे
BMC Election 2026: वंचितने काँग्रेसकडून 63 जागा मागितल्या, पण 16 जागांवर उमेदवारी अर्ज भरलेच नाहीत, समोर आलं मोठं कारण
वंचितने काँग्रेसकडून 63 जागा मागितल्या, पण 16 जागांवर उमेदवारी अर्ज भरलेच नाहीत, समोर आलं मोठं कारण
Prakash Surve : एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार, वॉर्ड 4 आणि 5 मधून कोण रिंगणात?
एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार
Malaika Arora Ready For Second Marraige: अरबाजसोबतच्या घटस्फोटानंतर मलायका अरोरा दुसरं लग्न करणार? म्हणाली, 'यासाठी मी पूर्णपणे तयार...'
अरबाजसोबतच्या घटस्फोटानंतर मलायका अरोरा दुसरं लग्न करणार? म्हणाली, 'यासाठी मी पूर्णपणे तयार...'
Chhatrapati Sambhaji Nagar Rashid Mamu: चंद्रकांत खैरेंच्या नाकावर टिच्चून छत्रपती संभाजीनगरध्ये रशीद मामूंनी उमेदवारी मिळवलीच, अंबादास दानवेंची सरशी
चंद्रकांत खैरेंच्या नाकावर टिच्चून छत्रपती संभाजीनगरध्ये रशीद मामूंनी उमेदवारी मिळवलीच, अंबादास दानवेंची सरशी
Neha Bhasin Decides Never Wants To Have Kids: 43 वर्षांच्या गायिकेचा मूल न होऊ देण्याचा निर्णय, लग्नाच्या नऊ वर्षांनीही ठाम; पती जबाबदार असल्याचंही थेट सांगून टाकलं
43 वर्षांच्या गायिकेचा मूल न होऊ देण्याचा निर्णय, लग्नाच्या नऊ वर्षांनीही ठाम; पतीलाच धरलं जबाबदार
Embed widget