(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अजिंक्य रहाणेचं कमबॅक आणि 'भाग मिल्खा भाग' चित्रपटातील तो डायलॉग..!
Ajinkya Rahane Comeback : अजिंक्य रहाणेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या संघात स्थान मिळाले... ही बातमी ऐकताच डोक्यात फरहान अख्तरच्या चित्रपटाचा डायलॉग आला... 'ये आपके जिंदगी की आखरी रेस साबित हो सकती है..!' भाग मिल्खा भाग या चित्रपटातील हा डायलॉग तुम्हाला आठवत असेलच... त्याला मिल्खा सिंह याने दिलेले उत्तरही माहित असेल... आता हे सांगण्याचे कारण अजिंक्य रहाणे आहे. होय आधी उप कर्णधारपद गमावले.. त्यानंतर टीम इंडियातून स्थान गमावले. 'अजिंक्य रहाणे याचे क्रिकेट संपले... तो फक्त टेस्ट प्लेअर आहे... असे प्रत्येकजण म्हणत होता...' त्याचवेळी अजिंक्य रहाणेला चेन्नईने संघात स्थान दिले.. त्यानंतर जणू अजिंक्यला प्रत्येकजण सांगत होते... तुला ही अखेरची संधी मिळाली आहे. अजिंक्य रहाणे याने त्यांना उत्तरही तसेच दिले... आयपीएलमध्ये अजिंक्य रहाणे याने वादळी फलंदाजी केली. अजिंक्य रहाणे याला याआधी असे फटके मारताना पाहिले नव्हते.. टिपिकल कसोटी प्लेअर असा शिक्का बसलेल्या रहाणेला धोनीचा परीसस्पर्श झाला अन् तो 360 डिग्री बदलला... आयपीएलच्या सोळाव्या हंगामात अजिंक्य रहाणे 200 च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडत आहे. बर... तो धावा काढताना आपल्या ताकदीवरच आहे.. तो तेच फटके मारतोय.. कोणतेही आडवेतिडवे फटके मारुन चौकार-षटकार मारण्याचा प्रयत्न करत नाही.. तो आपल्या ताकदीवर कायम आहे. टीम इंडियातून स्थान गमावले तेव्हा तो खचला नाही. अजिंक्य रहाणे याने मेहनत, चिकाटी, संयम आणि परफॉर्म याच्या जोरावर संघात पुनरागमन केलेय.. पण संघात पुनरागमन करण्यासाठी रहाणेला प्रचंड मेहनत घ्यावी लागली.
2020-21 मध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली होती. त्यावेळी पहिल्याच कसोटीच्या दुसऱ्या डावात टीम इंडिया अवघ्या 36 धावांवर ऑलआऊट झाला होता.. त्यानंतर जगभरातून टीम इंडियाची खिल्ली उडवली... त्या कसोटीसामन्यानंतर विराट कोहली सुट्टीवर होता.. त्यामुळे अजिंक्य रहाणे याच्याकडे कर्णधारपद आले. शमी दुखापतग्रस्त झाला.. आघाडीचा फलंदाज गेला.. अशातच अजिंक्य रहाणे याच्याकडे नेतृत्व आले. ऑस्ट्रेलिया ही मालिका 4-0 ने जिंकणार असे भाकित प्रत्येक क्रीडा तज्ज्ञ वर्तवत होता. पण अजिंक्य रहाणे याच्या डोक्यात अन् नशीब वेगळेच काही होते.. अजिंक्य रहाणे याने संघाची कमान सांभाळली अन् चित्र पलटले. रहाणे याने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत करुन दाखवले... त्यानंतर अजिंक्य रहाणे याच्यावर कौतुकचा वर्षाव सुरु झाला.. पण तेथूनच त्याचा बॅडपॅचही सुरु झाला.. रहाणे याने आधीच वनडे आणि टी 20 मधून स्थान गमावले होते.. त्यात त्याला कसोटीतूनही स्थान गममावे लागले... दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाचा दारुण पराभव झाला. त्यानंतर बीसीसीआयने अजिंक्य राहणे याला डच्चू दिला.. त्याकाळात रहाणे याच्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या.. तसे पाहायला गेले तर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही धावा काढता आल्या नव्हत्या.. पण कुऱ्हाड फक्त रहाणेवर कोसळली. अजिंक्य रहाणे याने त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये नशीब अजमावले... पण त्या काळात आयपीएलमध्येही रहाणे याला किंमत राहिली नव्हती..त्याला 2023 आयपीएलआधी कुणी खरेदीदारही मिळाला नाही. चेन्नईने मूळ किंमतीत त्याला खरेदी केले.. अन् तेथूनच रहाणेच्या करिअरला वेगळे वळण मिळाले. धोनीच्या परीसस्पर्शाने अजिंक्य रहाणे याचे सोने झाले. धोनीने अजिंक्य रहाणेला सल्ला दिला... रहाणेमध्ये प्रतिभा, चिकाटी, जिद्द आधीच ढिगाने होते.. त्याला फक्त दिशा द्यायची गरज होती..धोनीने त्याला ती दिशा दर्शवली.. त्यानंतर अजिंक्य रहाणे 2.O पाहायाला मिळाला.. श्रेयस अय्यरची दुखापत अजिंक्य रहाणे याच्या पथ्यावर पडली.. टीम इंडियाला मधल्याफळीत अनुभवी आणि आक्रमक फलंदाजाची गरज होती. सुर्यकुमार यादव याला बॉर्डर गावस्कर मालिकेत संधी देण्यात आली. पण सुर्यकुमार यादव याने निराशा केली. पंत आणि अय्यर हे दोन्ही खेळाडू नसल्यामुले मध्यक्रम कमकुवत जाणवत होता. त्याचवेळी अजिंक्य रहाणेसारखा पर्याय टीम इंडियाला दिसला.. टीम इंडियाने अजिंक्य रहाणे याला संधी दिली आहे.
अजिंक्य रहाणे याने 82 कसोटीतील 140 डजावात 4931 धावा चोपल्या आहेत. यामध्ये 12 शतके आणि 25 अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय सामन्यातही 87 डावात रहाणे याने 2962 धावा केल्या आहेत. तर 20 टी20 सामन्यात 375 धावा केल्या आहेत. अजिंक्य रहाणे याने 16 महिन्यानंतर टीम इंडियात पुनरागमन केलेय. 11 जानेवारी 2022 रोजी अजिंक्य रहाणे याने अखेरचा कसोटी सामना खेळला होता. एकदिवसीय सामन्यात तर रहाणे 2018 पासून बाहेर आहे. भारतामध्ये यंदाचा विश्वचषक होत आहे. बीसीसीआय अनुभवी अजिंक्य रहाणेचा विचार करणार का? याकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागले आहे.