Solapur Crime: बॉईज हॉस्टेलमध्येच इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल, वडिलांचा फोन येताच भयंकर घटनेचा उलगडा, सोलापूरमध्ये खळबळ
Solapur Crime: सोलापूर शहरातील नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमधील बॉईज हॉस्टेलमध्ये एका 20 वर्षीय विद्यार्थ्याने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Solapur Crime: सोलापूर (Solapur) शहरातील नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमधील बॉईज हॉस्टेलमध्ये एका 20 वर्षीय विद्यार्थ्याने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. 18) रात्री उघडकीस आली. विद्याधर प्रकाश शिंदे (वय 20, रा. कळंब, जि. धाराशिव) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, या घटनेमुळे कॉलेज परिसरात तसेच कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे. विद्याधर हा कॉलेजमध्ये ई अँड टीसी (E&TC) शाखेच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता आणि तो कॉलेजच्या बॉईज हॉस्टेलमध्ये वास्तव्यास होता.
Solapur Crime: वडिलांच्या फोनमुळे प्रकार उघडकीस
विद्याधर हा दररोज रात्री वडिलांना फोन करून संपर्कात राहत होता. मात्र, गुरुवारी रात्री नेहमीच्या वेळेत फोन न आल्याने चिंतेत पडलेल्या वडिलांनी साडेआठच्या सुमारास थेट हॉस्टेल प्रशासनाशी संपर्क साधला. त्यानंतर हॉस्टेलमधील कर्मचाऱ्यांनी त्याच्या खोलीकडे जाऊन दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडला नसल्याने पुढील तपासणी करताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.
Solapur Crime: रूममध्ये होता एकटाच
मिळालेल्या माहितीनुसार, विद्याधर ज्या खोलीत राहत होता त्या खोलीतील इतर विद्यार्थी अमावस्येच्या सुट्टीमुळे गावी गेले होते. त्यामुळे तो त्या दिवशी खोलीत एकटाच होता. दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास त्याने आपल्या वडिलांशी फोनवर संवाद साधला होता. त्यानंतर रात्री संपर्क न झाल्याने हा प्रकार उघडकीस आला.
Solapur Crime: पोलीस व रुग्णालयीन प्रक्रिया
घटनेची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पुढील कार्यवाही करत विद्याधरला सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी सोलापूर तालुका पोलीस अधिक तपास करत असून, आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. मृत विद्याधर शिंदे याच्या पश्चात आई-वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. होतकरू तरुणाच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि कॉलेज परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
























