एक्स्प्लोर

सोलापुरातील निकालाची वैशिष्ट्ये; भाजपला अति-आत्मविश्वास नडला; शहाजी बापूंनी दाखवली कमाल

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील दोन्ही दिग्गज नेत्यांनी प्रतिष्ठा राखली. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी होम ग्राउंड अक्कलकोट नगरपरिषदेवर एक हाती सत्ता मिळवली.

सोलापूर : भाजप (BJP) नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात यंदा होत असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. सोलापुरात (Solapur) भाजपने पहिल्यांदाच 12 पैकी 12 नगरपरिषद आणि नगरपंचायतमध्ये कमळच्या चिन्हावर नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार दिले होते. मात्र स्वबळावर लढण्याचा निर्णय चुकला असं म्हणण्याची वेळ आलीय. कारण 12 पैकी केवळ 4 जागेवर भाजपला सत्ता मिळवता आलीय. तर मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने 6 जागा चिन्हावर लढवल्या होत्या त्यापैकी 3 जागावर विजय मिळवता आला. काँग्रेस मात्र जिल्ह्यातून हद्दपार झाली असून एका ही नगराध्यक्ष पदावर विजय मिळवता आला नाही. त्यामुळे, भाजपला अति-आत्मविश्वास नडला असंच म्हणावं लागेल. याशिवाय, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते शहाजी बापूंनी (Shahaji bapu) विजयाची कमाल केली आहे. 

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील दोन्ही दिग्गज नेत्यांनी प्रतिष्ठा राखली. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी होम ग्राउंड अक्कलकोट नगरपरिषदेवर एक हाती सत्ता मिळवली. तर मैंदर्गी नगरध्यक्ष पदी भाजपच्या अंजली बाजारमठ विजयी. 135 वर्षांपासून स्थानिक आघाडीची सत्ता असलेल्या मैंदर्गी नगर परिषदेवर पहिल्यांदाच एखादया राष्ट्रीय पक्षाच्या चिन्हावर नगराध्यक्ष झाला. तर दूधनी नगरपरिषदेवर नुकतच काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले माजी मंत्री सिद्धारम म्हेत्रे यांनी पुन्हा एकदा सत्ता मिळवली. सिद्धाराम म्हेत्रे यांचे पुतणे प्रथमेश म्हेत्रे शिंदे गटाचे नगराध्यक्ष.   

बार्शी : विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कमबॅक केलंय. बाजार समिती निवडणुकीनंतर भाजपने बार्शी नगरपरिषदेवर ही कमळ फुलवलं. ठाकरे गटाचे विद्यमान आमदार दिलीप सोपल यांना झटका देत भाजपच्या उमेदवार तेजस्विनी कथले नगराध्यक्ष ठरल्या.

मोहोळ : मोहोळ नगरपरिषद निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत चूरशीचा सामना पाहायला मिळाला. अवघ्या 22 वर्षांची सिद्धी वस्त्रे शिवसेना शिंदे गटाची उमेदवार अवघ्या 170 मतांच्या आघाडीने नगराध्यक्ष ठरली. या ठिकाणी भाजप विरोधातल्या लढाईत शिवसेनेला अजित दादांच्या राष्ट्रवादीने ही पाठिंबा दिला होता. मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायत सर्वाधिक चर्चेचा विषय राज्यात ठरली होती. आज अखेर अनगरच्या भाजपच्या सर्व उमेदवारांच्या बिनविरोध विजय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित करत त्यांना प्रमाणपत्र दिले. उज्वला थिटे यांच्या उमेदवारी अर्ज बाद झाल्याने ही नगरपंचायत चर्चेत आली होती.

सांगोल्यात नगरपालिका निवडणुकीत शहाजी बापूंना एकटे पाडल्याचा विषय प्रकर्षाने समोर आला आणि यातूनच सर्वसाहानुभूती बापूंना मिळाल्याने येथे भाजप आमदार बाबासाहेब देशमुख यांचा शेतकरी कामगार पक्ष आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या गटातला धारून पराभव स्वीकारावा लागला .

अकलूजमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अकलूजचा दहशतवाद संपविण्यासाठी भाजपला विजयी करण्याचे आवाहन केले होते .. मात्र ग्रुपच्या जनतेने पुन्हा एकदा मोहिते पाटील आणि शरद पवार गट यांच्या मागे आपली ताकद उभी केली .. मात्र अकलूज मध्ये पहिल्यांदाच भाजपच्या कमळावरील चार नगरसेवक विजयी झाले हे वैशिष्ट्य ठरले ..

पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही ठिकाणी दिवंगत आमदार भारत भालके यांनी एकत्रित येऊन उभी केलेल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीने दोन्ही नगरपालिकेत नगराध्यक्षपदी विजय मिळविला मात्र नगरपालिकेत बहुमत मात्र भाजपालाच मिळाले .. असे असले तरी विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा बदला भगीरथ भालके यांनी भाजप आमदार समाधान आवताडे यांच्यासोबत घेतला आहे ..

करमाळ्यात पहिल्यांदाच भाजप, अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार जयवंतराव जगताप अशा दिग्गजांना धक्का देत नवख्या सावंत यांनी करमाळ्यात सत्ता आणली ..

कुर्डूवाडी नगरपालिकेत उद्धव ठाकरे गटाने आपली सत्ता काबिज करत पुन्हा एकदा भगवा फडकवला आहे. 

हेही वाचा

चंदगड ते गडचिरोली; भाजपच्या विजयी नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील सहा वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील चार वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी कार्यरत. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Railway Fare Increase :लाखो रेल्वे प्रवाशांना धक्का, भारतीय रेल्वेकडून सहा महिन्यात दुसऱ्यांदा प्रवासभाड्यात वाढ, 26 डिसेंबरपासून नवे दर लागू 
लाखो रेल्वे प्रवाशांना धक्का, भारतीय रेल्वेकडून प्रवासभाड्यात वाढ, 26 डिसेंबरपासून नवे दर लागू 
Muktainagar Nagarparishad Election Result 2025: 'एकनाथ खडसे आमच्यासाठी अपशकुन ठरले', मुक्ताईनगरमधील भाजपच्या पराभवाचं खापर गिरीश महाजनांनी खडसे कुटुंबावर फोडलं
'एकनाथ खडसे आमच्यासाठी अपशकुन ठरले', मुक्ताईनगरमधील भाजपच्या पराभवाचं खापर गिरीश महाजनांनी खडसे कुटुंबावर फोडलं
अरे आवाज कुणाचा!... छत्रपती संभाजीनगरमध्ये गुलाल कुणी उधळला? निकाल हाती; वाचा कुठे कोण नगराध्यक्ष?
अरे आवाज कुणाचा!... छत्रपती संभाजीनगरमध्ये गुलाल कुणी उधळला? निकाल हाती; वाचा कुठे कोण नगराध्यक्ष?
पन्हाळ्यापासून शिरोळपर्यंत ते चंदगडपासून हातकणंगलेपर्यंत! कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 13 नगराध्यक्षांना कोणत्या पक्षातून आघाडीतून गुलाल लागला? यादी एकाच ठिकाणी
पन्हाळ्यापासून शिरोळपर्यंत ते चंदगडपासून हातकणंगलेपर्यंत! कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 13 नगराध्यक्षांना कोणत्या पक्षातून, आघाडीतून गुलाल लागला? यादी एकाच ठिकाणी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Beed Ambajogai Namita Mundada : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊनही पराभव; नमिता मुंदडांची जादू
Dhananjay Munde on Nagarpanchayat Result : विरोधकांनी आपली लायकी काय आहे बघितली पाहिजे
Laxman Hake : विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके, सोनवणेंचा करेक्ट कार्यक्रम लागणार
Shahaji Bapu Patil : मला अभिमान वाटतोय, सांगोला नगरपरिषदेव शहाजीबापूंची एकहाती सत्ता
Assam Elephant Death : रुळ ओलांडताना हत्तीच्या कळपाला रेल्वेची धडक, 7 हत्तींचा मृत्यू Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Fare Increase :लाखो रेल्वे प्रवाशांना धक्का, भारतीय रेल्वेकडून सहा महिन्यात दुसऱ्यांदा प्रवासभाड्यात वाढ, 26 डिसेंबरपासून नवे दर लागू 
लाखो रेल्वे प्रवाशांना धक्का, भारतीय रेल्वेकडून प्रवासभाड्यात वाढ, 26 डिसेंबरपासून नवे दर लागू 
Muktainagar Nagarparishad Election Result 2025: 'एकनाथ खडसे आमच्यासाठी अपशकुन ठरले', मुक्ताईनगरमधील भाजपच्या पराभवाचं खापर गिरीश महाजनांनी खडसे कुटुंबावर फोडलं
'एकनाथ खडसे आमच्यासाठी अपशकुन ठरले', मुक्ताईनगरमधील भाजपच्या पराभवाचं खापर गिरीश महाजनांनी खडसे कुटुंबावर फोडलं
अरे आवाज कुणाचा!... छत्रपती संभाजीनगरमध्ये गुलाल कुणी उधळला? निकाल हाती; वाचा कुठे कोण नगराध्यक्ष?
अरे आवाज कुणाचा!... छत्रपती संभाजीनगरमध्ये गुलाल कुणी उधळला? निकाल हाती; वाचा कुठे कोण नगराध्यक्ष?
पन्हाळ्यापासून शिरोळपर्यंत ते चंदगडपासून हातकणंगलेपर्यंत! कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 13 नगराध्यक्षांना कोणत्या पक्षातून आघाडीतून गुलाल लागला? यादी एकाच ठिकाणी
पन्हाळ्यापासून शिरोळपर्यंत ते चंदगडपासून हातकणंगलेपर्यंत! कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 13 नगराध्यक्षांना कोणत्या पक्षातून, आघाडीतून गुलाल लागला? यादी एकाच ठिकाणी
कोल्हापूर जिल्ह्यात 10 नगरपालिका आणि 3 नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची जोरदार मुसंडी; भाजपची काय स्थिती?
कोल्हापूर जिल्ह्यात 10 नगरपालिका आणि 3 नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची जोरदार मुसंडी; भाजपची काय स्थिती?
तासगावमध्ये आर.आर. आबांच्या लेकास दे धक्का;रोहित पाटलांचा पराभव, संजय काकांना अखेर गुलाल
तासगावमध्ये आर.आर. आबांच्या लेकास दे धक्का;रोहित पाटलांचा पराभव, संजय काकांना अखेर गुलाल
मोठी बातमी! नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील 6 भाजप उमेदवारांचा पराभव; लोकांनी घराणेशाहीला नाकारले
मोठी बातमी! नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील 6 भाजप उमेदवारांचा पराभव; लोकांनी घराणेशाहीला नाकारले
Kolhapur District Nagar Palika Election: नगराध्यक्ष निवडणुकीत कोल्हापुरात पन्हाळा मलकापुरात जनसुराज्य, चंदगडला भाजप, मुरगुड, हातकणंगले, मुरगुडला शिवसेंना शिंदे गटाचा झेंडा
नगराध्यक्ष निवडणुकीत कोल्हापुरात पन्हाळा मलकापुरात जनसुराज्य, चंदगडला भाजप, मुरगुड, हातकणंगले, मुरगुडला शिवसेंना शिंदे गटाचा झेंडा
Embed widget