Yearly Numerology 2025 : 4, 13, आणि 22 तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी कसं असेल नवीन वर्ष 2025? जाणून घ्या भविष्य
Yearly Numerology 2025 Of Mulank 4 : ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 तारखेला झाला आहे. अशा लोकांचा मूलांक 4 असतो.
Yearly Numerology 2025 Of Mulank 4 : 2024 वर्ष सरत्या मार्गावर आहे. तर, नवीन वर्षाचं (New Year) स्वागत करण्यासाठी आपण सारेच सज्ज आहोत. पण हे नवीन वर्ष आपल्यासाठी नेमकं कसे असेल? याबाबत अनेकांना जाणून घ्यायचं कुतूहल असतं. अंकशास्त्रानुसार (Numerology) कोणत्या जन्मतारखेच्या लोकांसाठी हे नवीन वर्ष लकी असणार आहे हे आपण जाणून घेऊयात.
सर्वात आधी 2025 हे वर्ष मूलांक 9 दर्शवते. मूलांक 9 चा स्वामी ग्रह मंगळ आहे. मंगळ ग्रह हा वर्चस्व स्थापित करणारा ग्रह मानला जातो. हा ग्रह साहस, संपन्नता, आग, ऊर्जा आणि क्रोध, आक्रमकतेचं प्रतिनिधीत्व करतो.
या ठिकाणी आपण मूलांक 4 असणाऱ्या लोकांबद्दल जाणून घेऊयात. सर्वात आधी ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 12, 22 तारखेला झाला आहे. अशा लोकांचा मूलांक 4 असतो. त्यामुळे 2025 हे वर्ष मूलांक साठी कसं असेल ते जाणून घेऊयात.
कशी असेल लव्ह लाईफ? (Yearly Luv Life Numerology 2025)
प्रेमाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, नवीन वर्ष तुमच्यासाठी फार शुभकारक ठरणार आहे. या वर्षात तुमचा विवाहाचा योग जुळून आला आहे. त्यामुळे तुम्हाला जर एखादी व्यक्ती आवड असेल तर तिच्याबद्दल घरात लवकर सांगून टाका. ज्यांचं लग्न झालं आहे त्यांचं वैवाहिक जीवन सुंदर असणार आहे. कारण ग्रहांच्या स्थिती लग्न भावात असल्याने हा काळ तुमच्यासाठी उत्तम आहे.
कसं असेल करिअर? (Yearly Career Numerology 2025)
करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुमचं करिअर चांगलं असेल. जे लोक वकीली. एमबीए, किंवा तांत्रिक क्षेत्राशी संबंधित आहेत अशा लोकांना करिअरमध्ये चांगलं यश मिळू शकतं. तसेच, ऑफिसमधून तुम्हाला परदेशी जाण्याची संधीदेखील मिळू शकते. ज्या लोकांना नोकरी बदालायची असेल ते जून महिन्याच्या आधीपर्यंत नोकरी बदलू शकतात.
कशी असेल आर्थिक स्थिती? (Yearly Wealth Numerology 2025)
मूलांक 4 च्या आर्थिक स्थितीबदद्ल बोलायचं झाल्यास, नवी वर्ष तुमच्यासाठी आर्थिक भरभराट घेऊन येईल. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ देखील होऊ शकतो. तसेच, नवीन वर्षात जर तुम्हाल घर, वाहन किंवा एखादी नवीन प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. तुमच्या आर्थिक स्थितीत वाढ होण्यासाठी शुक्र आणि बुधाचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल.
कसं असेल आरोग्य? (Yearly Health Numerology 2025)
मूलांक 4 च्या आरोग्याबाबत बोलायचं झाल्यास, नवीन वर्षात मंगळ आणि केतुचा प्रभाव थोडा त्रासदायक ठरु शकतो. या काळात तुम्हाला सांधेदुखी किंवा हाडांशी संबंधित आजार उद्भवू शकतात. तसेच, जे मधुमेहाचे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी हा काळ फार आव्हानात्मक असेल. वर्षाच्या सुरुवातीला तुमचं आरोग्य चांगलं असेल मात्र, जसजसं वर्ष सरत जाईल तशा तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी सुरु होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :