(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Weekly Numerology : नवीन आठवड्यात 'या' जन्मतारखेच्या लोकांची होणार प्रगती; पावलोपावली मिळणार यश, वाचा साप्ताहिक अंकज्योतिष
Weekly Numerology Prediction : Weekly Numerology 29 January to 4 February 2024 : अंकशास्त्रानुसार 29 जानेवारी ते 4 फेब्रुवारीचा काळ काही जन्मतारखेच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. या आठवड्यात त्यांना चांगलं यश मिळेल आणि प्रगती होईल.
Weekly Numerology 29 January to 4 February 2024 : अंकशास्त्र (Numerology) देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते. अंकशास्त्रामध्ये व्यक्तीचे भविष्य, व्यक्तिमत्व इत्यादी गोष्टी जन्मतारखेच्या आधारे, म्हणजेच व्यक्तीच्या मूलांक संख्येच्या आधारे सांगितल्या जातात.
मूलांक ही जन्मतारीख असते. जर तुमचा जन्म 7 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 7 असेल. परंतु जर तुमचा जन्म 17 किंवा 26 किंवा अशाच दोन सांख्यिक तारखेला झाला असेल, तर तुमचा मूलांक 1+7 = 8, 2+6 = 8 असा काढला जातो. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 29 असेल, तर 2+9 = 11, 1+1 = 2 असेल, तर व्यक्तीचा मूलांक 2 असेल.
आता तुम्हाला तुमचा मूलांक तर मिळालाच असेल, याद्वारे तुमचा नवीन आठवडा कसा जाईल? याबाबत जाणून घेऊया.
मूलांक 1
मूलांक 1 असलेले लोक या आठवड्यात व्यावसायिक क्षेत्रात प्रगती करू शकतात. एखाद्या महत्त्वाच्या कामात किंवा प्रकल्पात तुम्हाला यश मिळू शकतं. अविवाहितांना जोडीदार मिळू शकतो. जोडीदारासोबतचे संबंध सामान्य राहतील. मन समाधानी राहील.
मूलांक 2
मूलांक 2 असलेल्या लोकांचं लव्ह लाईफ चांगलं राहील. ते त्यांच्या भविष्याशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. आर्थिक बाबतीत हा आठवडा काही विशेष असणार नाही. जीवनात आनंद मिळवण्याच्या अनेक संधी मिळू शकतात.
मूलांक 3
या लोकांची परदेशात जाण्याची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रलंबित कामं पूर्ण होतील. तुमची प्रगती होईल. तुम्हाला काही कामाचे खूप चांगले परिणाम मिळू शकतात. हुशारीने गुंतवणूक करा.
मूलांक 4
घरात धार्मिक कार्यक्रम असू शकतो किंवा तुम्ही बाहेर एखाद्या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहू शकता. तुमची प्रतिभा आणि व्यावहारिकतेच्या जोरावर तुम्ही महत्त्वाचे काम पूर्ण कराल. आर्थिक बाबतीत तुमचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. तुमची लव्ह लाईफ रोमँटिक असेल.
मूलांक 5
मूलांक 5 असलेल्या लोकांना या आठवड्यात काही सकारात्मक बातम्या मिळू शकतात. करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. तुमचा आदरही वाढेल. आर्थिक स्थिती सामान्य राहील. तुमच्या मनाचं ऐका. आठवड्याच्या शेवटी जीवनात एक नवीन सुरुवात होईल आणि समृद्धीची दारं उघडतील.
मूलांक 6
या आठवड्याच तुमचं लव्ह लाईफ बहरलेलं असेल. अविवाहितांना जोडीदार मिळू शकतो. आर्थिक लाभ होईल. तुमच्या करिअरमध्ये काही मोठं काम पूर्ण होऊ शकतं. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या तब्येतीची चिंता सतावेल.
मूलांक 7
नवीन आठवड्यात तुमचे वडिलांसोबतचे संबंध सुधारतील. सासरच्या लोकांशी पैशाचे व्यवहार टाळा. गुंतवणुकीतून लाभ होईल. तुम्हाला कामावर प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.
मूलांक 8
वाहन खरेदी करण्याची योजना बनू शकते. सरकारकडून लाभ मिळू शकतात. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर ते परत करण्याची हीच योग्य वेळ आहे. कामाच्या ठिकाणी उद्धटपणा टाळा.
मूलांक 9
तुमची आर्थिक स्थिती या आठवड्यात हळूहळू सुधारेल. गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं लग्न ठरू शकतं. कामात अडचण येऊ शकते. नवीन नोकरी शोधू शकाल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :