Weekly Lucky Zodiacs: नवीन आठवड्याची सुरुवात दिवाळीने! 5 राशींसाठी असेल भाग्याचा, साप्ताहिक भाग्यशाली राशी, जाणून घ्या
Weekly Lucky Zodiacs: 13 ते 19 नोव्हेंबर 2023, नवीन आठवड्याची सुरुवात दिवाळीने होणार आहे, या आठवड्यात या 5 राशींचे भाग्य बदलू शकते. जाणून घ्या
Weekly Lucky Zodiacs : 13 ते 19 नोव्हेंबर 2023, साप्ताहिक भाग्यशाली राशी: नवीन आठवड्याची सुरुवात दिवाळीने होणार आहे, 13 ते 19 नोव्हेंबर 2023 साप्ताहिक राशीभविष्य, नोव्हेंबरचा नवा आठवडा सुरू होत आहे, पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील अमावास्येपासून आठवडा सुरू होत आहे. धार्मिक दृष्टिकोनातून हा आठवडा विशेष आहे. या आठवड्यात या 5 राशींचे भाग्य बदलू शकते. जाणून घ्या त्या 5 राशी कोणत्या आहेत? ज्या खूप भाग्यशाली आहेत.
मेष
मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा उत्तम ठरणार आहे. तुमची अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली सर्व कामे पूर्ण होतील. तुम्हाला स्वतः नोकरीसाठी कॉल येण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्हाला मोठी जबाबदारी मिळू शकते. लव्ह पार्टनरसोबत आनंदी राहाल.
कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्यशाली असेल. जर तुम्ही कुठे गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला फायदा होईल. नोकरी करणाऱ्या महिलांसाठीही आठवडा भाग्याचा ठरेल. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल.
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्यशाली असेल. या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास वेगळ्या पातळीवर असेल. प्रत्येक कामात तुम्हाला तुमचे कुटुंब आणि मित्रांकडून सहकार्य मिळेल. प्रेम संबंध चांगले राहतील.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आनंद देईल. आयुष्यातील समस्यांना तुम्ही एकटेच सामोरे जाल. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी भाग्यवान असेल. तुम्हाला तुमच्या प्रिय जोडीदाराकडून सरप्राईज मिळू शकते.
मीन
मीन राशीच्या लोकांना या आठवड्यात भाग्याची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. बोनसमुळे तुमच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर येईल. या आठवड्यात तुम्ही कुटुंब आणि मित्रांसोबत बाहेर जाऊ शकता.
धार्मिक दृष्टिकोनातून हा आठवडा विशेष
13 ते 19 नोव्हेंबर 2023 साप्ताहिक राशीभविष्य, नोव्हेंबरचा नवा आठवडा सुरू होत आहे, पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील अमावास्येपासून आठवडा सुरू होत आहे. धार्मिक दृष्टिकोनातून हा आठवडा विशेष आहे. 13 नोव्हेंबर 2023 रोजी सोमवती अमावस्या आहे, जी 2023 ची शेवटची अमावस्या आहे. या आठवड्यात ग्रहांच्या हालचाली देखील बदलत आहेत, 16 नोव्हेंबर 2023 रोजी मंगळ वृश्चिक राशीत बदलेल, जो खूप महत्वाचा मानला जातो. यासोबत 17 नोव्हेंबर 2023 रोजी सूर्याचे भ्रमण होत आहे. या खगोलीय घटनांचा या आठवड्यात तुमच्या राशीवरही मोठा प्रभाव पडणार आहे, जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Weekly Horoscope 13-19 November 2023: नोव्हेंबरचा नवा आठवडा 'या' राशींसाठी खास! 12 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या