Weekly Horoscope 17 To 23 March 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Weekly Horoscope 17-23 March 2024 : साप्ताहिक राशीभविष्याच्या दृष्टीने मेष ते कन्या राशीसाठी नवीन आठवडा महत्त्वाचा असणार आहे. या काळात काही राशींना शुभ फल प्राप्त होईल, तर काही राशींना अडचणींचा सामना करावा लागेल. मेष ते कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Weekly Horoscope 17-23 March 2024 : मार्च महिन्याचा तिसरा आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे, तर काही राशींसाठी खडतर असणार आहे. मेष आणि कर्कसह इतर राशीच्या लोकांना या काळात पैसा, करिअरबाबत विशेष लाभ मिळेल. मार्चचा नवीन आठवडा (17 March To 23 March Weekly Horoscope) तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांचा हा आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला सर्व कामांत यश मिळेल. तुम्हाला मित्रांकडून सहकार्य मिळेल, आठवड्याच्या शेवटी तुम्ही त्यांच्यासोबत कुठेतरी फिरायला जाऊ शकता. मित्रांच्या सहकार्याने तुमच्या व्यवसायातील समस्या सुटतील. या आठवड्यात घरात तुमच्या लग्नाबद्दल चर्चा होऊ शकते. आठवड्याच्या मध्यात कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. घरात काही नवीन गोष्टी घडतील, ज्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत तुम्ही जोडीदारासोबत व्यस्त असाल. तुम्ही जोडीदाराला जास्त वेळ द्याल. लव्ह लाईफमध्ये असलेल्यांच्या नात्यात बाहेरच्या लोकांमुळे तणाव वाढू शकतो, त्यामुळे सावध राहा.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला आर्थिक लाभ होईल, यामुळे तुमचं मन आनंदी होईल. या आठवड्यात तुम्ही कुठेतरी लांबच्या प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. तुम्हाला सर्व कामांत कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य मिळेल. आठवड्याच्या मध्यात भाऊ आणि मित्रांसोबत काही विषयांवर चर्चा होईल. प्रलंबित कामं पूर्ण होतील. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांची मदत लाभेल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. तुमच्या वडिलांची तब्येत खालावली असल्यामुळे तुम्ही थोडे चिंतेत असाल. कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालणं टाळा.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांचा नवीन आठवडा चांगला जाईल. तुम्ही आठवड्याच्या सुरुवातीला आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल, यामुळे तुम्हाला तुमच्या सर्व कामात यश मिळेल. वैवाहिक जीवन चांगलं असेल, तुमचा जोडीदार तुम्हाला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढेल आणि तुमची ट्यूनिंग चांगली राहील. व्यवसायात सुधारणा होईल आणि चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो. आठवड्याच्या मध्यात कौटुंबिक समस्यांवर चर्चा होईल. घरातील वातावरण सकारात्मक राहील. घरात पैशाची आवक कायम राहील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत मित्रांशी जास्त बोलणं टाळा. ऑफिसमध्ये सहकारी मदत करतील, पण कुणाशीही जास्त बोलू नका.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला जास्त खर्चामुळे त्रास होईल. तुमची तब्येत या काळात बिघडू शकते. काही कामाबाबत मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो. आठवड्याच्या मध्यात सर्व परिस्थिती सुधारेल. तब्येत चांगली राहील, मन प्रसन्न होईल. तुम्ही या आठवड्यात खूप रोमँटिक असाल. वैवाहिक जीवनात रोमान्स राहील, जोडीदाराशी चांगले संबंध राहतील. व्यवसायात प्रगतीसाठी वेळ उत्तम राहील. व्यवसायातून तुम्हाला फायदा होईल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत आर्थिक लाभ होईल, बँक बॅलन्स वाढेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल.
सिंह रास (Leo)
सिंह राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला बॉसच्या पुढे-मागे करण्यात, त्याला खुश ठेवण्यात व्यस्त राहतील. या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल, त्यामुळे तुम्ही समाधानी राहाल. आठवड्याच्या सुरुवातीला व्यवसाय चांगला चालेल. प्रेम प्रकरणात यश मिळेल आणि विवाहितांना त्यांच्या मुलांकडून प्रेम मिळेल. आठवड्याच्या मध्यात खर्च वाढतील. आरोग्य बिघडेल. तुम्ही अधिक भावूक व्हाल. आरोग्य नाजूक राहील, पण आठवड्याच्या शेवटच्या दिवसात तुमचा आत्मविश्वास वाढेल, पण अनेक समस्या देखील भेडसावतील. व्यवसायात निराशा येऊ शकते. लव्ह लाईफमध्ये अडचणी येतील.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला सकारात्मक राहतील. नोकरी-व्यवसायात तुम्ही प्रगती कराल. तुम्ही कुटुंबाकडे पूर्ण लक्ष द्याल, कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्याल. आठवड्याच्या मध्यात पैशाची आवक वाढेल. लव्ह लाईफमध्ये तुम्ही रोमँटिक राहाल. तुम्हाला तुमच्या प्रियकराचं सहकार्य मिळेल. तुमच्यामधीस काही खास गोष्टी तुमच्या बॉसला प्रभावित करतील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत खर्च वाढेल. तुमचं आरोग्य बिघडू शकतं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: