Weekly Horoscope : धनु आणि मकर राशींना डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 8 To 14 December 2025 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? धनु, मकर राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या..

Weekly Horoscope 8 To 14 December 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, डिसेंबरचा (December) दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा फार महत्त्वाचा असणार आहे. कारण, या आठवड्याच्या दरम्यान अनेक छोटे-मोठे ग्रहदेखील नक्षत्र तसेच, राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे डिसेंबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ आणि वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
धनु रास साप्ताहिक राशीभविष्य (Sagittarius Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - या काळात प्रेमाच्या बाबतीत बोलायचं तर प्रेम संबंध मजबूत होतील. जर तुम्ही लग्नाचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुमचे कुटुंब त्यांची संमती देऊ शकते. वैवाहिक जीवन आनंदी राहील
करिअर (Career) - करिअरच्या बाबतीत हा आठवडा करिअर आणि व्यवसायासाठी अत्यंत शुभ राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. बेरोजगार व्यक्तींना त्यांच्या इच्छेनुसार नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, आठवड्याच्या उत्तरार्धात पैसा येण्याचे संकेत आहेत. कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्ये विजय मिळण्याची शक्यता आहे.
आरोग्य (Health) - नवीन आठवड्यात आरोग्य सामान्य राहील. मानसिक शांती आणि ऊर्जा राहील, परंतु अतिरेकी मजा आणि निष्काळजीपणा टाळावा.
मकर रास साप्ताहिक राशीभविष्य (Capricorn Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - या राशीच्या लोकांना नातेसंबंधांमध्ये सुसंवाद राखणे महत्वाचे आहे. तुमच्या जोडीदाराशी वाद टाळा आणि धीर धरा. तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर केल्याने तुमचे वैवाहिक जीवन मजबूत होईल.
करिअर (Career) - या आठवड्यात कामाच्या ठिकाणी सकारात्मक पद्धतीने कामे पूर्ण करण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. नवीन नोकरी मिळण्याचे मोठे संकेत दिसत आहेत.
आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास, या आठवड्यात आर्थिक बाबतीत घाईघाईने निर्णय घेणे टाळावे. कागदपत्रे वेळेवर पूर्ण करणे अत्यंत महत्वाचे आहे, अन्यथा तुम्हाला आर्थिक आणि मानसिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
आरोग्य (Health) - आठवड्यात तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. थकवा, ताणतणाव किंवा जुन्या समस्या पुन्हा उद्भवू शकतात. संतुलित आहार आणि विश्रांती आवश्यक आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :




















