Budhaditya and Lakshmi Narayan Rajyog 2025 : अवघ्या काही तासांनी बुधाचा डबल धमाका! 2 शुभ राजयोगांनी वर्षाच्या शेवटी 'या' राशींना मिळणार संधी, नवीन वर्ष जोमात
Budhaditya and Lakshmi Narayan Rajyog 2025 : व्यवहाराचा दाता बुध ग्रह आज रात्री 8 वाजून 52 मिनिटांनी वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. तो 29 डिसेंबरपर्यंत याच राशीत स्थित असणार आहे.

Budhaditya and Lakshmi Narayan Rajyog 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह दर 15 दिवसांनी राशी परिवर्तन करतात. अशातच बुध ग्रहाची अनेक ग्रहांबरोबर संयोग किंवा दृष्टी पडते. यामुळे शुभ-अशुभ राजयोग (Rajyog) निर्माण होतात. व्यवहाराचा दाता बुध ग्रह 6 डिसेंबर 2025 रोजी म्हणजेच आज रात्री 8 वाजून 52 मिनिटांनी वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. तो 29 डिसेंबरपर्यंत याच राशीत स्थित असणार आहे.
या राशीत सूर्यासह शुक्र ग्रह विराजमान आहे. त्यामुळे बुध ग्रहाबरोबर संयोग करुन बुधादित्य आणि शुक्रासह संयोग करुन लक्ष्मी नारायण योग निर्माण होणार आहे. बुध ग्रहाबरोबर 2-2 शक्तिशाली राजयोग निर्माण होणार आहेत. याचा सर्व 12 राशींवर परिणाम होणार आहे. मात्र, बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण राजयोगामुळे काही राशींचं नशीब पालटण्याची शक्यता आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचा डबल राजयोग या राशीसाठी अनेक अर्थांनी खास असणार आहे. या राशीच्या सहाव्या चरणात बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण योग निर्माण होणार आहे. त्यामुळे तुमच्या आनंदाला सीमा उरणार नाही. या काळात तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल. नवीन कामाच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर पडती. मात्र, तुम्ही त्या प्रामाणिकपणे पार पाडाल.
सिंह रास (Leo Horoscope)
बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण योग सिंह राशीसाठी लाभदायी ठरणार आहे. या राशीच्या चौथ्या चरणात हा डबल राजयोग जुळून येणार आहे. या काळात तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. धनसंपत्ती भरभराट होणार आहे. या काळात तुम्हाला मित्रांचा चांगला सहवास लाभेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीसाठी हा काळ प्रगतीचा असणार आहे. बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण योगामुळे तुम्हाला अनेक गोष्टीत लाभ मिळेल. पदोन्नतीत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, या काळात तुमची रखडलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढेल. शेअर बाजारात तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, उत्पन्नाचे अनेक मार्ग खुले होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :


















