Weekly Horoscope : तूळ आणि वृश्चिक राशीला डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात धनलाभाचे संकेत, लक्ष्मीच्या पावलांनी घरात येणार पैसा; साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 8 To 14 December 2025 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ आणि वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून

Weekly Horoscope 8 To 14 December 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, डिसेंबरचा (December) दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा फार महत्त्वाचा असणार आहे. कारण, या आठवड्याच्या दरम्यान अनेक छोटे-मोठे ग्रहदेखील नक्षत्र तसेच, राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे डिसेंबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ आणि वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास साप्ताहिक राशीभविष्य (Libra Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - या काळात प्रेमाच्या बाबतीत बोलायचं तर प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. जर तुम्ही अविवाहित असाल तर तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार एखादी व्यक्ती भेटू शकते. तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील.
करिअर (Career) - करिअरच्या बाबतीत आठवड्याच्या सुरुवातीला काही गोंधळ होऊ शकतो, परंतु आठवड्याच्या मध्यापर्यंत गोष्टी सुरळीत होतील आणि तुम्हाला आराम मिळेल. कामावर तुमचे विरोधकही तुमची प्रशंसा करतील.
आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, आठवड्यात पैशांची चणचण भासू शकते, व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय सुज्ञपणे पुढे नेण्याची आवश्यकता असेल. तरच पैसा येईल
आरोग्य (Health) - नवीन आठवड्यात आठवड्यात मानसिक ताण टाळा. ध्यान आणि हलका व्यायाम आरोग्य राखण्यास मदत करेल. संतुलित आहाराकडे विशेष लक्ष द्या.
वृश्चिक रास साप्ताहिक राशीभविष्य (Scorpio Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - या राशीच्या लोकांना या आठवड्यात प्रेमप्रकरण आणि प्रेमसंबंध अनुकूल राहतील. वैवाहिक जीवन आनंदी आणि गोड राहील.
करिअर (Career) - या आठवड्यात कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघेही दयाळू असतील. तुमची ऊर्जा पातळी उच्च राहील आणि सकारात्मक पद्धतीने कामे पूर्ण करण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील.
आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास, या आठवड्यात व्यवसायात नफा आणि व्यवसाय विस्तार योजना यशस्वी होतील. समान विचारसरणीमुळे भागीदारी व्यवसायांना गती मिळेल.
आरोग्य (Health) - आठवड्यात संतुलित आहार आणि हलका व्यायाम राखा. मानसिक आणि शारीरिक आरोग्याला प्राधान्य द्या.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :



















