Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी नवीन आठवडा कसा राहील? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 3 To 9 February 2025 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 3 To 9 February 2025 : फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवडा लवकरच सुरु होणार आहे. अनेक राशींसाठी हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीच्या लोकांना नवीन आठवड्यात आपल्या आरोग्यावर लक्ष देण्याची गरज आहे. तुमची लव्ह लाईफ चांगली असेल. तसेच, आठवड्याच्या सुरुवातीला आरोग्याची काळजी घ्या. तुम्हाला दुखापत होऊ शकते.नोकरदार वर्गातील लोकांची कामाची स्थिती चांगली असेल. तुम्हाला कामात कोणताच त्रास होणार नाही. सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा तुम्हाला मिळेल. या आठवड्यात पिवळ्या वस्तूंचं दान करणं तुमच्यासाठी शुभ ठरु शकतं.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा मध्यम फलदायी असणार आहे. व्यवसायायिक दृष्टीने बोलायचं झाल्यास, तुमचा व्यवसाय सुरळीत चालू राहील. तुम्हाला ना फायदा ना तोटा होणार आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. या आठवड्यात नकारात्मक लोकांपासून दूर राहा. त्याचा परिणाम तुमच्या वागणुकीवर आणि कामावर होऊ शकतो. मुलांना या आठवड्यात एखादी आनंदाची बातमी मिळू शकते.
धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. व्यावसायिक दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी चांगला असणार आहे. तुम्ही एकादी रिस्क देखील या कालावधीत घेऊ शकतात. तसेच, नवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी तुम्ही सक्षम असाल. या आठवड्यात तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्याच्या संधी उपलब्ध होतील. तुमच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा मध्यम फलदायी असणार आहे. या आठवड्यात तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक होणार नाही. त्यामुळे कोणाकडून विनाकारण अपेक्षा ठेवू नका. तसेच, लोकांवर जास्त विश्वास ठेवू नका. तुमच्या गोष्टी इतरांशी शेअर करु नका. तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. तसेच, आरोग्याच्या बाबतीत तुम्ही सतर्क राहण्याची गरज आहे. मानसिक शांतीसाठी योग आणि ध्यान करण्याचा प्रयत्न करा.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा आव्हानात्मक असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या पार्टनरबरोबर चांगलं वर्तन करण्याची गरज आहे.अन्यथा तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. सामंजस्याने करार करा. इतरांवर अवलंबून राहू नका. तसेच, सामाजिक कार्यात सक्रिय राहाल. आरोग्याच्या बाबतीत महिलांना जास्त काळजी घेण्याची गरज आहे. सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा संकटाचा असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला व्यवसायात अनेक समस्यांचा सामना करावा लागेल. त्यामुळे कोणतीही जोखीम घेऊ नका. तसेच, तुमच्या प्रेम जीवनात अनेक अडथळे निर्माण होतील. तुमची आर्थिक स्थिती थोडी कमजोर असेल. त्यामुळे या आठवड्यात कोणत्याही नवीन गोष्टींची खरेदी करु नका. पैशांची बचत करायला सुरुवात करा. आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशींसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज



















