कोल्हापुरात ढगफुटीसदृश्य पाऊस, तळकोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा हायअलर्ट; हवामान विभागाचा अंदाज काय?
Maharashtra Weather Update: .यावेळी वाऱ्याचा वेग 50 ते 60 किलोमीटर प्रति तास राहणार असून सोसाट्याच्या वाऱ्यासह ढगांचा गडगडाट व विजा पडण्याची शक्यता आहे .

Maharashtra Weather Update : राज्यभरात आता पुन्हा एकदा पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे . गेल्या दोन दिवसांपासून विविध भागात पावसाची हजेरी लागत असून आज कोल्हापूर शहरासोबत ग्रामीण भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला . जोरदार वारा आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होत आहे . वीज पडण्याची शक्यता असल्याने सुरक्षित स्थळी थांबण्याचे आवाहन प्रशासनाने केलंय . दरम्यान, राज्यभरात पुढील दोन दिवस पावसाचे तीव्र अलर्ट हवामान विभागाने दिले आहेत. तळकोकणासह दक्षिण महाराष्ट्र व विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. (Rain Update)
हवामान विभागाचा अंदाज काय ?
हवामान विभागाने आज संपूर्ण राज्याला पावसाचे तीव्र अलर्ट दिले आहेत .तळ कोकणासह दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे .सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आला असून कोल्हापूर सांगली रत्नागिरी जिल्हा ना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय .तसेच विदर्भात वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर व चंद्रपूर या जिल्ह्यांनाही पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे . उर्वरित भागात मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय . येत्या तीन दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केलंय .

12 ते 17 जूनपर्यंत महाराष्ट्रात जोरदार पावसाची हजेरी
भारतीय हवामान केंद्राच्या प्रादेशिक हवामान केंद्रानुसार, नैऋत्य मौसमी पावसाने आता मुंबईसह अहिल्यानगरचा पट्टा व्यापला आहे .आता मान्सून पूर्वेकडील भागात म्हणजे विदर्भ ,छत्तीसगड ,ओडिसा या भागात येथे 48 तासात व्यापणार आहे .बंगालच्या उपसागरात दक्षिणेकडील भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय असल्याने कर्नाटका छत्तीसगड मराठवाडा तसेच कर्नाटकातील अंतर्गत भागात पावसाचा जोर वाढणार आहे .
12 ते 17 जून पर्यंत महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी राहणार असल्याचा सांगण्यात आलाय .कोकण मध्य महाराष्ट्रात तीव्र व अति तीव्र पावसाची हजेरी लागणार असून आजपासून पुढील तीन दिवस म्हणजेच 15 जून पर्यंत कोकणपट्ट्यात जोरदार पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागाने सांगितला आहे .यावेळी वाऱ्याचा वेग 50 ते 60 किलोमीटर प्रति तास राहणार असून सोसाट्याच्या वाऱ्यासह ढगांचा गडगडाट व विजा पडण्याची शक्यता आहे .कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या दोन दिवसात प्रचंड पावसाची शक्यता आहे .
पावसाचे तीव्र अलर्ट
पुढील दोन दिवस हवामान विभागाने पावसाचे तीव्र अलर्ट दिले असून तळ कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात रेड ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहेत .विदर्भातही पावसाचा जोर येत्या काही दिवसात वाढणार आहे .दरम्यान मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आहे .काही भागात हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे .























