सर्वात सुरक्षित समजलं जाणारं विमान कोसळलंच कसं, धृव राठीकडून शंका व्यक्त!
या बोईंग विमानाबाबत सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी (Dhruv Rathi) यानेही ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे.

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादेत प्रवासी विमान कोसळून भीषण दुर्घटना (Ahmadabad Plane Crash) घडली. तब्बल 242 प्रवाशांसह हे विमान दुपारी दीडच्या सुमारास उड्डाण केलं होतं. अहमदाबादवरुन लंडनला निघालेलं एअर इंडियाचं प्रवासी विमान (Air India Plane ) उड्डाणाच्या काही मिनिटातच कोसळलं. या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे सुद्धा या विमानातून प्रवास करत होते. हे विमान नेमकं दुर्घटनाग्रस्त कसं झालं, अपघात नेमका कसा घडला याबाबतची कारणं तपासात समोर येतील. मात्र या बोईंग विमानाबाबत सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी (Dhruv Rathi) यानेही ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. ध्रुव राठी म्हणतो, “इतिहासात प्रथमच B‑787 Dreamliner विमान क्रॅश झालं आहे. एक अत्याधुनिक आणि अतिशय सुरक्षित विमान मानलं जातं. खूपच धक्कादायक आहे"
विमानात 169 भारतीय नागरिक तर 53 ब्रिटिश नागरिक होते
अहमदाबादहून दुपारी 1 वाजता निघालेल्या या विमानात बोईंग 787-8 विमानात 242 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. त्यापैकी 169 भारतीय नागरिक तर 53 ब्रिटिश नागरिक होते. 1 कॅनेडियन नागरिक आणि 7 पोर्तुगीज नागरिक होते. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी व प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून विमानातून तब्बल 242 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. विमान जिथे क्रॅश झालं, त्याठिकाणी धुराचे मोठे लोळ पसरल्याचं दिसून येत आहेत. घटनास्थळी बचाव पथक पोहोचली आहेत. या दुर्घटनेत मोठी जिवितहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लंडनला म्हणजे दूर मार्गावर जाणार असल्याने या विमानत इंधन देखील मोठ्या प्रमाणात भरण्यात आलं होतं, त्यामुळे अपघातानंतर दुर्घटना पेट घेतला.
This is the first time in history that a B-787 Dreamliner plane has crashed.
— Dhruv Rathee (@dhruv_rathee) June 12, 2025
It is considered to be one of the safest aircrafts. Absolutely Shocking!
विशेष म्हणजे विमान दुर्घटनेपूर्वी विमानाचे पायलट कॅप्टन सुमित सभरवाल यांनी आपत्कालीनचा संदेश (मे डे कॉल) दिला होता. कॅप्टन सभरवाल यांना तब्बल 8200 तासांच्या प्रवास उड्डाणाचा अनुभव होता. विमानाने दुपारी 1.31 वाजता उड्डाण केल्यानंतर 1.38 मिनिटांनी विमानाचा शेवटचा सिग्नल मिळाला होता. त्यानंतर, ही दुर्घटना घडली. एअर इंडियाचं हे विमान एका इमारतीवर कोसळलं असून ती इमारत रुग्णालयाची असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार विमान ज्या रुग्णालयावर कोसळलं त्या रुग्णालयातील 15 डॉक्टर जखमी झाले असून काही रुग्णांना देखील गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या:
























