Weekly Horoscope 27 May To 2 June 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Weekly Horoscope 27 May To 2 June 2024 : साप्ताहिक राशीभविष्याच्या दृष्टीने तूळ ते मीन राशीसाठी नवीन आठवडा खास असणार आहे. नवीन आठवडा काही राशींसाठी चांगला ठरेल, तर काही राशींना या काळात नुकसान सहन करावं लागेल. तूळ ते मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.
Weekly Horoscope 27 May To 2 June 2024 : मे महिन्याचा पाचवा आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे, तर काही राशींसाठी खडतर असणार आहे. धनु आणि कुंभसह इतर राशीच्या लोकांना या काळात पैसा, करिअरबाबत विशेष लाभ मिळेल. मे महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांना येत्या आठवड्यात आयुष्यात पुढे जाण्याची संधी मिळेल. तुम्हाला अपेक्षित यश मिळवायचं असेल तर तुमची ऊर्जा वाया जाऊ देऊ नका. आरोग्याबाबत कोणत्याही प्रकारे निष्काळजी राहू नका. तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी सावलीसारखा उभा राहील. कोणताही निर्णय घेताना भावनेच्या भरात घेऊ नका.
वृश्चिक रास (Scorpio)
नवीन आठवडा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरेल. या आठवड्यात तुम्हाला तुमचा आळस सोडावा लागेल. आजचं काम उद्यावर ढकलू नका. जर तुम्ही आर्थिक तंगीने त्रस्त असाल तर या आठवड्यात तुम्हाला थोडा आराम मिळू शकतो. मस्करी करताना इतरांचा अपमान करू नका. कोर्टात गोष्टी तुमच्या बाजूने असल्याचं स्पष्ट दिसून येईल. आठवड्याचा शेवट चांगला होईल.
धनु रास (Sagittarius)
धनु राशीचे लोकांसाठी नवीन आठवडा शुभ ठरेल. व्यावसायिक आठवड्याच्या सुरुवातीला व्यवसायात सुधारणा करण्याचा प्रयत्न करतील आणि त्यात त्यांना यशही मिळेल. काही नवीन संपर्क बनवल्याचा फायदा तुम्हाला मिळेल. वैवाहिक जीवनातही तुम्ही एकमेकांना साथ द्याल. आठवड्याच्या मध्यात तुम्ही काही सिक्रेट स्ट्रॅटेजी बनवू शकता, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात मदत होईल. तब्येत कमजोर होऊ शकते, त्यामुळे काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत अचानक एखादे काम पूर्ण झालं तर तुम्ही आनंदी व्हाल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला भावांची साथ मिळेल.
मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती आठवड्याच्या सुरुवातीला चांगली राहील. सर्व इच्छा पूर्ण झाल्यामुळे मनामध्ये आनंदाची भावना राहील. तुमचं वैवाहिक जीवन सुखाचं असेल. तुम्हाला जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल. तरुणांची लव्ह लाईफही चांगली असेल. व्यवसायात प्रगती होईल, तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल. आठवड्याच्या मध्यात खर्च वाढेल. हा आठवडा तुम्ही कामात व्यस्त राहाल. व्यवसायाच्या निमित्ताने लांबचा प्रवास होऊ शकतो. या आठवड्यात तुमचं आरोग्य नाजूक राहील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत तुम्ही मौजमजा कराल. वैवाहिक जीवन देखील आनंदाने भरलेलं असेल.
कुंभ रास (Aquarius)
येणारा आठवडा कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. तुमची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रत्येक लहान-मोठा व्यक्ती तुमच्या मदतीसाठी पुढाकार घेताना दिसेल. तुम्ही बऱ्याच दिवसांपासून नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमचा शोध संपणार आहे. तुम्ही व्यवसाय करत असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी चांगला राहील. आठवड्याच्या मध्यात तुम्ही घरासाठी पैसे खर्च करू शकता. वैवाहिक जीवनात आनंद राहील.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र परिणाम देणारा ठरेल. या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. बराच काळ अडकलेला सरकारी पैसा परत मिळू शकेल. कोणाशीही बोलत असाल तेव्हा आवाज सौम्य ठेवा, नाहीतर परिस्थिती बिघडू शकते. या आठवड्यात तुम्ही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता. या आठवड्यात तुमचे छंद जोपासण्यावर तुमचा अधिक पैसा खर्च होऊ शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: