Weekly Horoscope : मेष ते मीन राशीसाठी 2022 चा शेवटचा आठवडा कसा असेल? जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 26 December 2022 to 1 January 2023: 26 डिसेंबर 2022 पासून सुरू होणारा आठवडा तुमच्या राशीसाठी नफा की तोटा घेऊन येईल? जाणून घ्या साप्ताहिक राशिभविष्य
Weekly Horoscope 26 December 2022 to 1 January 2023 : 2022 वर्षाच्या (2022 Year) शेवटच्या आठवडा मेष ते मीन या 12 राशींबाबत कसा राहील? याची उत्सुकता सर्वांनाच आहे. साप्ताहिक राशीभविष्याबाबत (Weekly Horoscope) म्हणायचं झालं तर, मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या यासह सर्व 12 राशींसाठी (Zodiac Sign) विशेष असणार आहे. डिसेंबरच्या या आठवड्यात ग्रहांच्या हालचालीतही मोठे बदल होत आहेत. धनु आणि मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खास राहणार आहे, तुमचा आठवडा कसा राहील? जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य.
मेष
मेष राशीच्या लोकांसाठी आठवडा खूप खास असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला षष्ठ योगाचा लाभ मिळेल. काही रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. कुटुंब किंवा मित्रांसोबत ख्रिसमस साजरा करण्याची योजना देखील तयार केली जाऊ शकते. तुमच्या जोडीदारासोबत तुमचा वाद होण्याची शक्यता आहे, तुमच्या एखाद्या चुकीच्या कोणत्याही सवयीमुळे नात्यात समस्या येऊ शकतात. वैवाहिक जीवनात दुरावा येण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यात लगेच बदल करा. आरोग्याची काळजी घ्या. हा आठवडा तुमच्यासाठी शुभ आहे.
वृषभ
26 डिसेंबर 2022 पासून सुरू होणारा आठवडा तुमच्यासाठी व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. कला, फॅशन, मनोरंजन इत्यादी क्षेत्रांशी संबंधित असलेल्यांना लाभ मिळू शकतो. चांगली मित्रसंगत तुमच्या वाट्याला येऊ शकतात. वैवाहिक जीवन चांगले राहणार आहे, या आठवड्यात नवीन कर्ज घेणे टाळा. घर सजवण्यासाठी तुम्ही मोठी शॉपिंग करू शकता. विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा आठवडा खास आहे.
मिथुन
या आठवड्यात अनावश्यक खर्चाला आळा घालण्याचा प्रयत्न करा. सध्या कोणतेही नवीन कर्ज घेऊ नका. चालू असलेल्या ईएमआय वेळेवर भरण्याचा विचार केल्यास ते चांगले होईल. एखादी किरकोळ दुखापत होऊ शकते. म्हणूनच काळजी घ्या. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्या कुटुंबासोबत साजरी करणार. कोणताही जुनाट आजार असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याचे योग्य पालन करा.
कर्क
26 डिसेंबर 2022 ते 1 जानेवारी हा काळ तुमच्यासाठी चढ-उतारांचा असणार आहे. या आठवड्यात वादांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. काही लोक तुम्हाला यासाठी प्रवृत्त करतील, परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष करा किंवा त्यांना टाळण्याचा प्रयत्न करा. आई-वडिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष देऊ नका. व्यवसायात नफा मिळू शकतो. एखादी चांगली डील फायनल होऊ शकते. नवीन वर्ष तुमच्यासाठी चांगल्या संधी घेऊन येत आहे. भावंडांचे सहकार्य मिळेल. कुटुंबासोबत कुठेतरी जाण्याचा बेत आखाल. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अडचणी येऊ शकतात. वेळेच्या व्यवस्थापनाकडे लक्ष द्या.
सिंह
या आठवड्यात तुमचे मन अस्वस्थ राहील. ऑफिसमध्ये होणार्या उलथापालथीमुळे काळजी वाटेल. पैशाच्या बाबतीत हा आठवडा संमिश्र जाईल. घरातील काही गोष्टींवर पैसा खर्च होऊ शकतो. आठवड्याच्या मध्यात कामातील व्यस्तता वाढू शकते. नुकसान करण्याचे काम शत्रू करू शकतात. व्यवसायात लाभाची स्थिती असू शकते. मोबाईलवर जास्त वेळ घालवून विद्यार्थी वेळ वाया घालवतील. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष द्यावे. तुमच्या लव्ह पार्टनरवर रागावू नका. जीवनसाथीचे सहकार्य मिळेल. जोडीदाराचा सल्ला घेऊनच नवीन कामाला सुरुवात करा, यश मिळेल.
कन्या
आठवड्याच्या सुरुवातीला काही आव्हाने येऊ शकतात. कुटुंबातील सदस्याच्या तब्येतीमुळे काळजी वाटेल. आठवड्याच्या मध्यात गोष्टी पुन्हा रुळावर आल्याचे दिसेल. पैशाच्या बाबतीत विशेष काळजी घ्या, नुकसान होण्याची शक्यता आहे. तुम्ही नवीन गुंतवणूक करणार असाल तर आत्ताच थांबा. आरोग्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. विद्यार्थ्यांना काही चांगली बातमी मिळू शकते. नवीन लोकांशी संबंध निर्माण होऊ शकतात. नोकरी, करिअरमध्ये त्यांना फायदा होऊ शकतो. वैवाहिक जीवनासाठी हा आठवडा चांगला जाणार आहे. तुम्ही एखाद्या लांब प्रवासाची योजना देखील करू शकता.
तूळ
26 डिसेंबर 2022 पासून सुरू होणारा आठवडा काही बाबतीत तुमच्यासाठी खास असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला कुटुंबासोबत पार्टी करू शकता, कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आठवड्याच्या मध्यात तुम्ही एखाद्या मोठ्या व्यवहाराकडे वाटचाल करू शकता. परदेशातूनही लाभाची स्थिती आहे. व्यवसायात काहीतरी नवीन करण्याचा विचार करू शकता. यासाठी तुम्ही निधी उभारण्यातही यशस्वी व्हाल. या दरम्यान, लक्षात ठेवा की, तुमच्या ऑफिसमधील काही सहकारी तुम्हाला निशाणा करतील, त्यामुळे सावध राहा. वैवाहिक जीवनासाठी हा आठवडा चांगला आहे. जीवनसाथीचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्याला मेहनतीची कमतरता पडू देऊ नका.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. पैसा आणि प्रतिमेच्या बाबतीत नुकसान होऊ शकते. काही लोकं तुम्हाला चुकीचा सल्ला देऊन नुकसानदायक ठरू शकतात, त्यामुळे सावध राहा. ऑफिसमध्ये काहीही नवीन करण्याआधी वास्तवाला सामोरे जा. अन्यथा त्याचा चुकीचा परिणाम होऊ शकतो. वैवाहिक जीवनात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आठवड्याच्या शेवटी काही समस्या कमी होऊ शकतात. स्वार्थ साधण्यासाठी चुकीचा मार्ग पत्करू नका. विद्यार्थ्यांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
धनु
26 डिसेंबर 2022 पासून या वर्षाचा शेवटचा आठवडा सुरू होत आहे. हा आठवडा 1 जानेवारी 2023 रोजी म्हणजेच नवीन वर्षात संपत आहे. येणारे सात दिवस पैशाच्या दृष्टीने तुमच्यासाठी शुभ असतील. नवीन कर्ज वगैरे घेऊ नका. कुटुंबातील सदस्यांसह घरी पार्टी करू शकता. मित्रांना घरी मेजवानीसाठी आमंत्रित करू शकता. या आठवड्यात घरात नवीन पाहुणे येण्याची शक्यता आहे. तुम्ही लग्नासाठी योग्य वधू-वर शोधत असाल तर तेही पूर्ण होऊ शकते. विद्यार्थ्यांनी चुकीच्या संगतीपासून दूर राहा, शिस्तीचे पालन करावे.
मकर
सर्व राशींमध्ये हा आठवडा तुमच्यासाठी खास आहे. 26 डिसेंबरपासून आठवडा सुरू होत आहे. उद्या म्हणजेच 28 डिसेंबर 2022 रोजी ग्रहांचा राजकुमार बुध तुमच्या राशीत भ्रमण करणार आहे. यानंतर 29 डिसेंबर रोजी विलासी जीवनाचा कारक शुक्राचे संक्रमण तुमच्या राशीत होणार आहे. तुमच्या राशीत शनि आधीच बसला आहे. असे म्हणता येईल की या आठवड्यात तुमच्या राशीमध्ये जास्तीत जास्त ग्रहांची हालचाल दिसून येईल. या आठवड्यात पैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. लव्ह पार्टनरसोबत वाद होऊ शकतो. समस्या अचानक वाढू शकतात. म्हणूनच काळजी घ्या. पैशाचा खर्च वाढू शकतो.
कुंभ
नवीन आठवडा तुमच्यासाठी तणाव आणणारा आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही काही जुन्या गोष्टींबाबत तणाव घेण्याची शक्यता आहे. हे टाळण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात फायद्यासाठी या आठवड्यात तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. तांत्रिक अडचणींमुळे नफ्यावर परिणाम होईल. दिलेल्या वेळेत आश्वासन पूर्ण न केल्यामुळे तुमच्या प्रतिमेवरही परिणाम होऊ शकतो. वैवाहिक जीवनात दुरावण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. विद्यार्थ्यांना शिक्षकांचे सहकार्य मिळेल.
मीन
मीन राशीच्या लोकांसाठी साप्ताहिक राशी विशेष आनंद घेऊन येत आहे. जे अविवाहित आहेत, त्यांना आयुष्यात नवा पाहुणा येऊ शकतो. लग्नाची बोलणी पुढे जाऊ शकते. वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतील. जीवनसाथीसोबत जवळीक वाढेल. सासरच्या मंडळींकडून भेटवस्तू मिळू शकतात. विद्यार्थ्यांना चांगले निकाल मिळतील. पैशाचा खर्च वाढू शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या
Gemini Weekly Horoscope : मिथुन राशीच्या लोकांना 'या' आठवड्यात मिळेल भाग्याची पूर्ण साथ, जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य