एक्स्प्लोर

Weekly Horoscope 24 June To 30 June 2024 : जून महिन्याचा शेवटचा आठवडा 'या' राशींसाठी ठरणार फलदायी; अनपेक्षित स्रोतांतून होणार धनलाभ, वाचा सर्व 12 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 24 June To 30 June 2024 : साप्ताहिक राशीभविष्याच्या दृष्टीने काही राशीसाठी नवीन आठवडा खास असणार आहे. तर काही राशींना या काळात नुकसान सहन करावं लागेल. सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 24 June To 30 June 2024 : नवीन आठवडा काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे. उद्यापासून नवीन आठवडा सुरू होत आहे. हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. काही राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope) लाभदायी असेल.  जून महिन्याचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मेष रास (Aries Weekly Horoscope)

नवीन आठवड्यात तुमची तब्येत सर्वसामान्य असणार आहे. फक्त या आठवड्यात तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. कारण महिना संपत येतोय, त्यामुळे पैशांचा जपून वापर करा. मित्राच्या सहकार्याने तुमची अनेक कार्य पूर्ण होतील. तसेच, या काळात तुम्ही धार्मिक यात्रेला जाऊ शकता. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सहकार्य तुम्हाला मिळेल. तसेच, व्यावसायिक लोकांसाठी देखील हा काळ चांगला आहे. फक्त तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. 

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांच्या आरोग्यासाठी हा काळ उत्तम आहे. या काळात तुम्ही कोणताही निर्णघ घेताना काळजीपूर्वक घ्या. या दिवसांत तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. तसेच, तुम्हाला धनलाभाच्याही संधी मिळतील. तुमचे विरोधी या काळात तुम्हाला त्रास देणार नाहीत. तसेच, तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. 

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

या काळात तुमच्या मनात अनेक विचारांची उलथा-पालथ सुरु असेल. तसेच, धार्मिक गोष्टींवर तुमचे पैसे खर्च होतील. पण, याचा लाभ देखील तुम्हाला नंतर मिळेल. तुमच्या प्रॉपर्टीमधून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. 

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

कर्क राशीच्या लोकांनी नवीन आठवड्यात आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. तुमच्या खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा. या कालावधीत तुमचे खर्च नकळतपणे वाढतील. त्यामुळे वेळीच खर्चावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळेल. तुमचं वैवाहिक जीवन फारच सुखी आणि आनंदी असेल. 

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

सिंह राशीच्या लोकांना नवीन आठवड्यात उत्पन्नाच्या अनेक संधी मिळू शकतात. या काळात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णयाला प्राधान्य दिले जाईल. तसेच, तुम्ही जर वाहन चालवत असाल तर वाहन चालवताना काळजी घ्या. या काळात तुमचा धार्मिक गोष्टींकडे कल वाढताना दिसेल. 

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

कन्या राशीच्या लोकांना नवीन आठवड्यात आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचं चांगलं सहकार्य मिळेल. तुम्ही आखलेल्या योजनांचा विचार केला जाईल. तसेच, अनेक दिवसांपासून तुमच्या मनात जे विचार सुरु होते त्यांना आता पूर्णविराम बसलेला दिसेल. कारण, नवीन आठवड्यात तुमचा आत्मविश्वास वाढेल. 

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

नवीन आठवडयात तुमची तब्येत सुधारेल. या काळात आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला व्यवसायातही यश मिळेल. व्यवसायातील प्रगतीमुळे तुम्हाला आनंद देईल. नोकरी करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळू शकतं. तुम्ही तुमच्या बॉसच्या जवळ असाल आणि तो तुम्हाला सर्व कामात पाठिंबा देईल, तुम्हाला सहकार्य करेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात काही अडचणी येऊ शकतात. नवीन आठवड्यात तुमचे विरोधक शांत असतील. या काळात लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात तुम्ही व्यस्त असाल. यावेळी तुमचा अनपेक्षित खर्चही होऊ शकतो. वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात.

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

येत्या दिवसांत तुमची तब्येत खालावू शकते, म्हणून तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला कुटुंबाकडून पुरेपूर सहकार्य मिळेल. नोकरीमध्ये तुम्ही खूप चांगलं काम कराल आणि काही लोक तुम्हाला घाबरतील. तुम्ही नवीन यश मिळवण्याचा प्रयत्न कराल.  व्यवसायात देखील तुमची चांगली प्रगती होईल. नवीन गुंतवणूक पर्याय तुम्ही शोधाल. नोकरी करणाऱ्यांना अपेक्षित परिणाम न मिळाल्याने ते निराश होऊ शकतात.

धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)

वैवाहिक जीवनात आनंद आणि रोमान्स असेल. लव्ह लाईफसाठी मात्र नवीन आठवड्याचा काळ थोडा तणावपूर्ण असेल. या काळात तुमचं उत्पन्न खूप चांगलं असेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. या काळात तुमच्या नोकरीत काही अडचणी येऊ शकतात. काम करताना कामात तुमच्याकडून काही चुका होऊ शकतात, त्यामुळे विरोधकांचं पारडं जड असेल. व्यवसायासाठी हा काळ चांगला आहे. या काळात तुमचं आरोग्यही उत्तम राहील. उच्च शिक्षणासाठी हा काळ चांगला आहे.

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

मकर राशीसाठी नवीन आठवडा अनुकूल असेल. करिअरसाठी हा काळ चांगला आहे. नोकरीत तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नोकरीत तुम्ही प्रगतीच्या मार्गावर असाल. व्यवसाय करणाऱ्यांचा नवीन लोकांशी संपर्क वाढेल, जे तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी फायदेशीर ठरेल. या काळात तुम्ही धार्मिक प्रवास कराल, जो तुमच्या मनाला आनंद देईल. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ होईल, पण खर्च देखील जास्त होईल.

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

येत्या आठवड्यात तुमची तब्येत ठीक राहील, पण पोटाची काळजी घ्या. तुम्ही आत्मविश्वासाने भरलेले असाल. नवीन आठवड्यात तुम्ही व्यवसायात जोखीम घेण्यास मागेपुढे पाहणार नाही. मित्रांच्या सहकार्याने काही नवीन काम करू शकाल. जोडीदाराकडूनही सहकार्य मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. लव्ह लाईफमध्ये थोडे खटके उडतील, पण बाकी खूप रोमान्स आणि प्रेम देखील असेल. उत्पन्नवाढीसाठी हा चांगला काळ आहे. येत्या दिवसांत तुम्ही नोकरी बदलू शकता.

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

नवीन आठवड्यात तुमचे खर्च वाढतील, यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. कौटुंबिक जीवनात तणाव वाढेल. समजूतदारपणाचा अभाव संबंध बिघडवू शकतो. लव्ह लाईफसाठी हा चांगला काळ आहे. कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य मिळेल. एखादा छोटा धार्मिक प्रवास करू शकता. या काळात तुम्हाला आर्थिक लाभही होईल. फक्त तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Rajyog : बुध-सूर्याच्या युतीमुळे 'या' राशींना मिळणार जबरदस्त लाभ; नोकरी-व्यवसाय गाठणार नवी उंची, प्रमोशनसह पगारवाढीचे संकेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
Embed widget