एक्स्प्लोर

Weekly Horoscope 23 To 29 September 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

Weekly Horoscope 23 To 29 September 2024 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 23 To 29 September 2024 : सप्टेंबर महिन्याचा चौथा आणि शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. भाद्रपद महिना देखील सुरु आहे.  त्यामुळे अनेक राशींसाठी हा महिना खास असणार आहे, तर काही राशींसाठी खडतर असणार आहे. वृषभ आणि मेषसह इतर राशीच्या लोकांना या काळात पैसा, करिअरबाबत विशेष लाभ मिळेल. तर, मिथुन राशीला आर्थिक चणचण भासेल. एकूणच सप्टेंबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा फार खास असणार आहे. या राशींच्या जीवनात लवकरच आनंदाचा वर्षाव होणार आहे. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या तुमच्या अडचणी या काळात लवकरच संपुष्यात येतील. तसेच, कुटुंबियांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल. आयुष्य अगदी आनंदी जगण्याचा प्रयत्न कराल. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने देखील हा आठवडा खूप खास असणार आहे. 
तसेच, मित्रांबरोबर तुम्ही ट्रिपला जाण्याचा प्लॅनदेखील आखू शकता. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा हा उत्साहवर्धक असणार आहे. तुम्हाला अनेक गोष्टींचे सरप्राईजेस या आठवड्यात पाहायला मिळतील. तसेच, एखाद्या अनोळखी व्यक्तीशी भेट झाल्यामुळे तुमचं आयुष्य पूर्णपणे पालटेल. जोडीदाराबरोबर काही मतभेद असतील तर ते लवकरच संपवण्याचा प्रयत्न करा. कोणताही व्यवहार करताना समजुतदारीने करणं गरजेचं आहे. फक्त खर्चावर नियंत्रण ठेवा. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. तुमच्या भावना तुमच्या जोडीदाराबरोबर व्यक्त करण्याचा प्रयत्न करा. तसेच, व्यवहारात तुमची चांगली प्रगती दिसून येईल. कामानिमित्त तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळेल. तसेच, वैवाहिक जीवनात अनेक चढ-उतार दिसून येतील. नवीन आठवड्यात गुंतवणूक करताना वरिष्ठांचा सल्ला नक्की घ्या. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. काही वेळा संकट तर काही वेळेला आनंदाचे क्षण येतील. या दोन्ही परिस्थितीचा सामना करायला शिका. स्वत:ला खंबीर बनवा. तरच समाजात तुम्ही टिकून राहाल, अन्यथा तुमचा गैरफायदा घेतला जाईल. तसेच, नवीन आठवड्यात तुमच्या जुन्या चुकांवर लक्ष ठेवून काम करा. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा उत्साहाचा असणार आहे. या आठवड्यात तुमची वैवाहिक स्थिती चांगली असेल.जोडीदाराबरोबर तुमचे चांगले संबंध जुळून येतील. तुमच्या पार्टनरबरोबर तुम्ही नवीन व्यवसाय देखील सुरु करु शकता. कामाच्या ठिकाणी तुमची चांगली प्रगती दिसून येईल. तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ फार सुखाचा असणार आहे. तुमच्या बौद्धिक क्षमतेत चांगला विकास झालेला तुम्हाला जाणवेल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची कामाप्रती एकाग्रता दिसून येईल. जर तुम्ही परीक्षेची तयारी करत असाल तर त्याचे परिणाम तुम्हाला चांगले मिळतील. तुमच्या करिअर क्षेत्रात चांगली प्रगती झालेली दिसेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Weekly Horoscope 23 To 29 September 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असणार? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Onion Import : कांद्याची आयात थांबवा अन्यथा, मंत्र्यांच्या गाडीवर कांदे फेकू, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक 
कांद्याची आयात थांबवा अन्यथा, मंत्र्यांच्या गाडीवर कांदे फेकू, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक 
Chandrashekhar Bawankule: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या संस्थेला 5 कोटींचा भूखंड फुटकळ दरात बहाल
अजितदादांच्या अर्थखात्याचा विरोध डावलून चंद्रशेखर बावनकुळेंच्या संस्थेला 5 कोटींचा भूखंड फुटकळ दरात बहाल
पंडीत पाटील विधानसभा लढवणार, जयंत पाटील काय भूमिका घेणार? अलिबागमध्ये विधानसभेच्या उमेदवारीवरुन शेकापत गृहयुद्ध
पंडीत पाटील विधानसभा लढवणार, जयंत पाटील काय भूमिका घेणार? अलिबागमध्ये  विधानसभेच्या उमेदवारीवरुन शेकापत गृहयुद्ध
Congress : विदर्भ भाजपच्या हातून गेलाय, मोदी शाह जोडीने कितीही प्रयत्न केले तर काँग्रेस 45 जागा जिंकणार, विजय वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर
मोदी चंद्रपूर अन् भंडारा गोंदियाला गेले तिथं पराभव झाला, नागपूरला आले असते तर गडकरी हरले असते : विजय वडेट्टीवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Encounter : मूळ आरोपींना वाचवण्यासाठी अक्षयची हत्या, वडिलांचा आरोपTOP 80 : 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 25 Sept 2024 :  ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8 AM : 25 Sept 2024 : ABP MajhaAmit Shah : आंदोलने, कृषीमालाचे प्रश्न नेत्यांवर सोडा, कामाला लागा; शाहांचा कानमंत्र, इनसाईड स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Onion Import : कांद्याची आयात थांबवा अन्यथा, मंत्र्यांच्या गाडीवर कांदे फेकू, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक 
कांद्याची आयात थांबवा अन्यथा, मंत्र्यांच्या गाडीवर कांदे फेकू, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक 
Chandrashekhar Bawankule: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या संस्थेला 5 कोटींचा भूखंड फुटकळ दरात बहाल
अजितदादांच्या अर्थखात्याचा विरोध डावलून चंद्रशेखर बावनकुळेंच्या संस्थेला 5 कोटींचा भूखंड फुटकळ दरात बहाल
पंडीत पाटील विधानसभा लढवणार, जयंत पाटील काय भूमिका घेणार? अलिबागमध्ये विधानसभेच्या उमेदवारीवरुन शेकापत गृहयुद्ध
पंडीत पाटील विधानसभा लढवणार, जयंत पाटील काय भूमिका घेणार? अलिबागमध्ये  विधानसभेच्या उमेदवारीवरुन शेकापत गृहयुद्ध
Congress : विदर्भ भाजपच्या हातून गेलाय, मोदी शाह जोडीने कितीही प्रयत्न केले तर काँग्रेस 45 जागा जिंकणार, विजय वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर
मोदी चंद्रपूर अन् भंडारा गोंदियाला गेले तिथं पराभव झाला, नागपूरला आले असते तर गडकरी हरले असते : विजय वडेट्टीवार
शेतमालाचे दर वाढले की सरकारच्या पोटात गोळा येतो, कांद्याच्या आयातीवरुन जयंत पाटलांचा हल्लाबोल
शेतमालाचे दर वाढले की सरकारच्या पोटात गोळा येतो, कांद्याच्या आयातीवरुन जयंत पाटलांचा हल्लाबोल
Manoj Jarange Patil: अंतरवाली सराटीत मध्यरात्री हालचालींना वेग, राजेश टोपे अचानक मनोज जरांगेंच्या भेटीला, नेमकं काय घडलं?
अंतरवाली सराटीत मध्यरात्री हालचालींना वेग, राजेश टोपे अचानक मनोज जरांगेंच्या भेटीला, नेमकं काय घडलं?
Weather Update: राज्यात पुन्हा मुसळधार! पुढील 4 दिवस परतीच्या मान्सूनचा फटका, पुण्याला रेड तर बाकी जिल्ह्यात यलो अलर्ट
राज्यात पुन्हा मुसळधार! पुढील 4 दिवस परतीच्या मान्सूनचा फटका, पुण्याला रेड तर बाकी जिल्ह्यात यलो अलर्ट
Uddhav Thackeray : अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरेंचा भाजपला धक्का, बडा नेता समर्थकांसह मुंबईकडे रवाना 
उद्धव ठाकरेंचा भाजपला मोठा धक्का, बडा नेता समर्थकांसह मुंबईकडे रवाना, विधानसभाची उमेदवारी मिळणार?  
Embed widget