Weekly Horoscope 23 To 29 December 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 23 To 29 December 2024 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.
Weekly Horoscope 23 To 29 December 2024 : 2024 वर्षातल्या शेवटच्या महिन्यातला शेवटचा आठवडा सुरु व्हायला अवघे काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे अनेक राशींसाठी हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. डिसेंबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
नवीन आठवड्याच्या सुरुवातीला मेष राशीच्या लोकांच्या तब्येतीत जरा बिघाड झालेला दिसेल. व्यावसायिक दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी फार चांगला असणार आहे. तुम्हाला अनेक शुभ संकेत मिळतील. तसेच, या आठवड्यात कोणताही निर्णय घेताना घरातील सदस्यांचं मत विचारात घेऊन करा. विवाहाचे नवीन प्रस्ताव येतील. तसेच, नोकरीची स्थिती चांगली असेल त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. व्यावसायिक दृष्टीकोनातून तुमचा व्यवसाय अगदी सुरळीत सुरु राहील. आठवड्याच्या सुरुवातीला कुटुंबात वाद निर्माण होतील. पण, हे वाद फार मोठे नसतील. आठवड्याच्या शेवटी मात्र तुमची तब्येत बिघडू शकते. अशा वेळी वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. आणि वेळेवर औषधपाणी घ्या.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या आठवड्यात तुमचं आरोग्य अगदी ठणठणीत राहील. तुमच्या व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ फार चांगला सुरु आहे. तसेच, तुमच्या रोजगारात चांगली वाढ झालेली पाहायला मिळेल. आठवड्याच्या शेवटी कोणताच निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. अन्यथा तुमचंच नुकसान होऊ शकतं.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सकारात्मक असणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने हा काळ मध्यम फलदायी ठरेल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, या आठवड्यात तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची शक्यता आहे. तुमच्या आरोग्यात हळुहळू सुधारणा पाहायला मिळेल. तसेच, या आठवड्यासाठी लाल रंग तुमच्यासाठी फार शुभ असणार आहे.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असणार आहे. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ फार महत्त्वाचा आहे. तुमच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. या आठवड्यात तुम्ही कुटुंबियांबरोबर बाहेर फिरायला जाऊ शकता. या आठवड्यात कोणाशीही विनाकारण वाद घालू नका. तसेच, तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभकारक असणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या खर्चात वाढ होईल. मात्र, नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल. तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. तसेच, आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या व्यवसायातून नवीन काहीतरी शिकायला मिळेल. आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुमचे आरोग्य एकदम ठणठणीत असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :