Weekly Horoscope 23 To 29 September 2024 : पुढचे 7 दिवस सर्व 12 राशींसाठी ठरणार खास; कसा असणार नवीन आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 23 To 29 September 2024 : काही राशींसाठी नवीन आठवडा खास असणार आहे, तर काही राशींना या काळात नुकसान सहन करावं लागेल. सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.
Weekly Horoscope 23 To 29 September 2024 : नवीन आठवडा काही राशींसाठी भाग्याचा ठरणार आहे. आजपासून नवीन आठवडा सुरू झाला आहे. हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. काही राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope) लाभदायी असेल. सप्टेंबर महिन्याचा चौथा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा फार खास असणार आहे. या राशींच्या जीवनात लवकरच आनंदाचा वर्षाव होणार आहे. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या तुमच्या अडचणी या काळात लवकरच संपुष्यात येतील. तसेच, कुटुंबियांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल. आयुष्य अगदी आनंदी जगण्याचा प्रयत्न कराल. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने देखील हा आठवडा खूप खास असणार आहे. तसेच, मित्रांबरोबर तुम्ही ट्रिपला जाण्याचा प्लॅनदेखील आखू शकता.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा हा उत्साहवर्धक असणार आहे. तुम्हाला अनेक गोष्टींचे सरप्राईजेस या आठवड्यात पाहायला मिळतील. तसेच, एखाद्या अनोळखी व्यक्तीशी भेट झाल्यामुळे तुमचं आयुष्य पूर्णपणे पालटेल. जोडीदाराबरोबर काही मतभेद असतील तर ते लवकरच संपवण्याचा प्रयत्न करा. कोणताही व्यवहार करताना समजुतदारीने करणं गरजेचं आहे. फक्त खर्चावर नियंत्रण ठेवा.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. तुमच्या भावना तुमच्या जोडीदाराबरोबर व्यक्त करण्याचा प्रयत्न करा. तसेच, व्यवहारात तुमची चांगली प्रगती दिसून येईल. कामानिमित्त तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळेल. तसेच, वैवाहिक जीवनात अनेक चढ-उतार दिसून येतील. नवीन आठवड्यात गुंतवणूक करताना वरिष्ठांचा सल्ला नक्की घ्या.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. काही वेळा संकट तर काही वेळेला आनंदाचे क्षण येतील. या दोन्ही परिस्थितीचा सामना करायला शिका. स्वत:ला खंबीर बनवा. तरच समाजात तुम्ही टिकून राहाल, अन्यथा तुमचा गैरफायदा घेतला जाईल. तसेच, नवीन आठवड्यात तुमच्या जुन्या चुकांवर लक्ष ठेवून काम करा.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा उत्साहाचा असणार आहे. या आठवड्यात तुमची वैवाहिक स्थिती चांगली असेल.जोडीदाराबरोबर तुमचे चांगले संबंध जुळून येतील. तुमच्या पार्टनरबरोबर तुम्ही नवीन व्यवसाय देखील सुरु करु शकता. कामाच्या ठिकाणी तुमची चांगली प्रगती दिसून येईल. तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ फार सुखाचा असणार आहे. तुमच्या बौद्धिक क्षमतेत चांगला विकास झालेला तुम्हाला जाणवेल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची कामाप्रती एकाग्रता दिसून येईल. जर तुम्ही परीक्षेची तयारी करत असाल तर त्याचे परिणाम तुम्हाला चांगले मिळतील. तुमच्या करिअर क्षेत्रात चांगली प्रगती झालेली दिसेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
नवीन आठवडा तूळ राशीच्या लोकांसाठी शुभवार्ता घेऊन येईल. या काळात तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त फायदा मिळेल. व्यवसायाशी संबंधित केलेले प्रवास शुभ आणि लाभदायक ठरतील. नोकरीत सहकाऱ्यांचं चांगलं सहकार्य लाभेल.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन संधीची दारं उघडतील. या आठवड्यात तुमच्या घरातील काही शुभ कार्य पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्ता मिळू शकते. तुम्ही व्यवसायाशी संबंधित एखादा मोठा निर्णय घेऊ शकता, ज्याचे भविष्यात चांगले परिणाम मिळतील.
धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)
आजपासून सुरू होणारा नवा आठवडा धनु राशीच्या लोकांसाठी भाग्याचा असेल. या आठवड्यात तुमचा मान-सन्मान वाढेल. तुम्हाला एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचे भाग्य लाभेल, ज्यामुळे तुमचा सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. खाण्यापिण्याच्या सवयींची काळजी घ्या, अन्यथा पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र जाईल. या आठवड्यात तुमच्या मनात एखाद्या कामात नुकसानीची भीती राहील, परंतु तुमच्या गोष्टी पुन्हा रुळावर येताना दिसतील. नातेसंबंधांसाठी देखील आपण सकारात्मक राहावं आणि लोकांशी चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जोडीदाराच्या आरोग्याबाबत मन चिंतेत राहील.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या काळात तुमची नियोजित कामं पूर्ण होतील. वरिष्ठ आणि कनिष्ठांचं सहकार्य तुम्हाला लाभेल, त्यांच्या मदतीने तुम्ही तुमचं लक्ष्य वेळेवर पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. या आठवड्यात तुम्हाला प्रत्येक कामात विशेष लाभ मिळेल.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी नवा आठवडा शुभ आणि फलदायी ठरेल. या आठवड्यात तुमच्या काही मोठ्या इच्छा पूर्ण होतील. तुमच्या प्रियजनांना भेटण्याची संधी तुम्हाला मिळेल. तुम्ही इतर लोकांकडे आकर्षित होऊ शकता. वैवाहिक जीवनात आनंद राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: