Weekly Horoscope 22 To 28 July 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Weekly Horoscope 22 July To 28 July 2024 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.
Weekly Horoscope 22 July To 28 July 2024 : जुलै महिन्याचा चौथा आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे, तर काही राशींसाठी खडतर असणार आहे. वृषभ आणि मेषसह इतर राशीच्या लोकांना या काळात पैसा, करिअरबाबत विशेष लाभ मिळेल. जुलै महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा काहीसा आव्हानात्मक असण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुमची आर्थिक स्थिती कमजोर असेल. त्यामुळे पैशांचा जपून वापर करा. तुम्ही तीर्थयात्रेला जाण्याचा विचार करू शकता. विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन रमेल. आठवड्याच्या शेवटी तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल. या आठवड्यात तुमच्या टार्गेट्सवर फोकस करा.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी जुलै महिन्याचा नवीन आठवडा अत्यंत उत्साहवर्धक असणार आहे. जे तरूण स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत त्यांना चांगलं यश मिळेल. या आठवड्यात तुम्ही वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही बाबतींत स्थिर राहाल. तुमच्या आत्मविश्वास वाढलेला दिसेल. निर्णय घेण्याची आणि ठाम राहण्याची वृत्ती तुमची या आठवड्यात दिसेल.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला जाणार आहे. या आठवड्यात तुम्ही ठरवलेली कामे पूर्ण करू शकता. तसेच, तुम्हाला जर नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा तुमच्यासाठी चांगला काळ आहे. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमचं मन कामात रमेल. फालतू गोष्टींमध्ये तुम्ही टाईमपास करणार नाहीत.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा अनुकूल असणार आहे. तुम्हाला जर धार्मिक यात्रेला जायचं असेल तर तुम्ही जाण्याचा प्लॅन करू शकता. आर्थिक बाबतीत असलेली चणचण लवकरच दूर होईल. शैक्षणिक बाबतीत तुमची चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, जोडीदाराचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा खर्चिक असणार आहे. छोट्या-मोठ्या गोष्टींवर तुमचे जास्त पैसे खर्च होतील. मात्र, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. त्यामुळे एक प्रकारे सकारात्मक दृष्टीकोन राहील.या आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत सतर्क असणं फार गरजेचं आहे.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला जाणार आहे. या आठवड्यात तुम्ही नवनवीन प्रयोग करून स्वत:ला पडताळू शकता. अनेक नवीन धोरणं स्विकारण्यासाछी तयार राहा. तसेच, पैशांचा जपून वापर करा. विनाकारण पैसे खर्च करू नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: