Weekly Horoscope : तूळ आणि वृश्चिक राशींसाठी यंदाची दिवाळी खर्चिक, देवी लक्ष्मीची राहील कृपा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 20 To 26 October 2025 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ आणि वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 20 To 26 October 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ऑक्टोबर महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या महिन्यात दिवाळी देखील असणार आहे. तसेच, या आठवड्या दरम्यान अनेक छोटे-मोठे ग्रहदेखील नक्षत्र परिवर्तन तसेच, राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ आणि वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास साप्ताहिक राशीभविष्य (Libra Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - या आठवड्यात तुमच्या लव्ह लाईफमध्ये शांती पाहायला मिळेल. पार्टनरबरोबर तुम्ही चांगला संवाद साधाल. जे लोक सिंगल आहेत त्यांना चांगला पार्टनर भेटण्याची शक्यता आहे.
करिअर (Career) - तुमची प्रोफेशनल लाईफ चांगली असेल. कामाच्या ठिकाणी प्रगतीचे अनेक संकेत तुम्हाला मिळतील. कामाच्या बाबतीत तुम्ही एकदम प्रामाणिक असाल. तसेच, टीमवर्क मध्येही काम करणं तुम्हाला सहज शक्य होईल.
आर्थिक स्थिती (Wealth) - या आठवड्यात विचारपूर्वक पैशांचा खर्च करा. दिवाळी असल्या कारणाने तुमच्या खिशाला कात्री लागू शकते. अशा वेळी पैशांचा जपून वापर करा. विचारपूर्वक निर्णय घ्या.
आरोग्य (Health) - जोपर्यंत तुम्ही बॅलेन्स रुटीन फॉलो करत आहात तोपर्यंत तुम्हाला आरोग्याची काळजी करण्याची गरज नाही. यासाठी नियमित योग, व्यायाम करणं गरजेचं आहे.
वृश्चिक रास साप्ताहिक राशीभविष्य (Scorpio Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - नवीन आठवड्यात प्रेमाच्या बाबतीत तुम्ही फार भाग्यवान असाल. पार्टनरबरोबर छान वेळ घालवाल. तसेच, तुमच्या नात्याला वेगळं वळण लागू शकतं. भावना व्यक्त करत राहा.
करिअर (Career) - नवीन आठवड्यात तुमच्या करिअरची गाडी अगदी सुस्साट वेगाने चालणार आहे. कामाच्या निमित्ताने तुम्हाला बाहेर जाण्याची संधी मिळेल. तुमच्या बॉसचा तुमच्यावर प्रचंड विश्वास असेल. तसेच, टीमवर्कमध्ये काम कराल.
आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिकदृष्ट्या तुम्ही सक्षम असाल. तुमच्या गरजा तुम्ही स्वत: पूर्ण करु शकता. त्यासाठी तुम्हाला इतरांवर अवलंबून राहावं लागणार नाही. तसेच, या आठवड्यात तुमच्या जुन्या गुंतवणुकीतूनही तुम्हाला चांगला लाभ मिळेल.
आरोग्य (Health) - जर तुम्ही तणावापासून दूर राहिलात तर तुमची मानसिक स्थिती चांगली राहील. यासाठी बाहेरचे तेलकट, तिखट पदार्थ खाऊ नका. संसर्गजन्य आजारांपासून दूर राहा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















