Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; नशीब हिऱ्यासारखं चमकणार, चौफेर धनलाभाचेही संकेत
Weekly Lucky Zodiacs 19 To 25 August : ऑगस्टचा हा आठवडा 5 राशींसाठी खूप भाग्याचा ठरणार आहे. या 5 राशींचं आयुष्य सुखसोयींनी भरलेलं असेल आणि त्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घ्या.
Weekly Horoscope 19 August To 25 August Lucky Zodiacs : ऑगस्ट महिन्याचा चौथा आठवडा काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे. 19 ऑगस्टपासून महिन्याचा नवीन आठवडा सुरू झाला आहे. हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. मुख्यत: 5 राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope) लाभदायी असेल, या 5 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
ऑगस्टचा हा आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी वरदानासमान ठरणार आहे. या आठवड्यात तुमच्या जीवनातील मोठ्या अडचणी दूर होतील. जे लोक बऱ्याच काळापासून आजारी आहेत त्यांना या आठवड्यात आराम मिळेल. नोकरीत तुम्हाला सर्वांचं सहकार्य मिळेल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला काही चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. व्यवसायाशी संबंधित लोकांना आठवड्याच्या पहिल्या भागात अपेक्षित लाभ मिळतील. कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. वैवाहिक जीवनातही आनंद राहील.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
ऑगस्टच्या चौथ्या आठवड्यात मिथुन राशीच्या लोकांना सुख, समृद्धी आणि यश मिळेल. या आठवड्याच्या सुरुवातीला परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या लोकांना चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तुमची इच्छित ठिकणी बदली होऊ शकते. बेरोजगारांना रोजगाराच्या चांगल्या संधी मिळतील. कोणत्याही योजनेत किंवा व्यवसायात केलेली मागील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देईल. प्रेमसंबंधातील गैरसमज दूर होतील.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा यश आणि सौभाग्य देणारा आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात केलेल्या प्रवासातून अपेक्षित यश मिळेल. या काळात तुम्हाला घरातील आणि बाहेरील लोकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. नोकरदार लोकांसाठी दिवस खूप फायदेशीर ठरणार आहे. तुमच्याकडे उत्पन्नाचे अनेक स्त्रोत असू शकतात. ज्या लोकांचे पैसे कुठेतरी अडकले आहेत त्यांना या आठवड्यात ते परत मिळू शकतात.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी करिअर आणि बिझनेसच्या दृष्टीने हा आठवडा खूप शुभ ठरणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. या आठवड्यात तुम्हाला जीवनात प्रगतीच्या चांगल्या संधी मिळतील. जमीन आणि इमारतींच्या खरेदी-विक्रीबाबत तुम्हाला पालकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. या राशीचे विद्यार्थी जे परीक्षा स्पर्धांची तयारी करत आहेत त्यांना काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ ठरेल. रोजगाराच्या शोधात भटकणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. राजकारणाशी संबंधित लोकांना इच्छित पद किंवा जबाबदारी मिळू शकते. जे लोक परदेशात जाऊन शिक्षण किंवा नोकरी करण्याचा विचार करत होते, त्यांची इच्छा या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या प्रियकरासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. तुमचे वैवाहिक जीवन सुखी होणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: