एक्स्प्लोर

Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्याचे; नशीब हिऱ्यासारखं चमकणार, चौफेर धनलाभाचे संकेत

Weekly Lucky Zodiacs 16 To 22 September : सप्टेंबरचा तिसरा आठवडा 5 राशींसाठी खूप भाग्याचा ठरणार आहे. या 5 राशींचं आयुष्य सुखसोयींनी भरलेलं असेल आणि त्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घ्या.

Weekly Horoscope 16 September To 22 September Lucky Zodiacs : सप्टेंबर महिन्याचा तिसरा आठवडा काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे. 16 सप्टेंबरपासून महिन्याचा नवीन आठवडा सुरू झाला आहे. या आठवड्यात मालव्य राजयोगासह (Malavya Rajyog) अनेक शुभ योग तयार होत आहेत, हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. मुख्यत: 5 राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope) लाभदायी असेल, या 5 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

मेष रास (Aries Weekly Horoscope)

मेष राशीच्या लोकांना सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात करिअर, व्यवसाय आणि परीक्षा स्पर्धा इत्यादींशी संबंधित काही चांगली बातमी मिळेल. जे लोक बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना यश मिळेल, या आठवड्यात त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. आठवड्याच्या सुरुवातीला धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. या राशीच्या स्त्रिया या आठवड्यात पूजा वगैरेमध्ये जास्त वेळ घालवतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामाचं कौतुक करतील. व्यावसायिकांनाही अपेक्षित यश मिळेल. राजकारणाशी संबंधित या राशीच्या लोकांना सन्मान मिळेल.

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ ठरेल. या आठवड्यात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आठवड्याची सुरुवात खूप छान होणार आहे. या आठवड्यात तुम्ही डोक्याने काम कराल आणि मोठं यश मिळवाल. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन आणि चांगले स्त्रोत निर्माण होतील. व्यावसायिकांना अपेक्षित नफा मिळू शकेल. या राशीचे विद्यार्थी जे कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत आहेत त्यांना काही चांगली बातमी मिळेल. तर, जे लोक एखाद्याला प्रपोज करण्याचा विचार करत होते, त्यांना होकार मिळेल.

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

तूळ राशीच्या लोकांना सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. या काळात तुमच्यामध्ये एक वेगळाच उत्साह आणि आत्मविश्वास दिसून येईल. तुम्ही तुमची सर्व कामं योग्य आणि वेळेत पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. राजकारणाशी संबंधित लोकांना या आठवड्यात काही मोठं पद किंवा जबाबदारी दिली जाऊ शकते. व्यावसायिकांसाठी आठवडा अतिशय अनुकूल असणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या धार्मिक स्थळी जाऊ शकता. आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही आठवडा तुमच्या अनुकूल असल्याचं दिसतं.

धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)

सप्टेंबरचा तिसरा आठवडा धनु राशीच्या लोकांसाठी भाग्याचा ठरणार आहे. या आठवड्यात तुम्हाला गुंतवणुकीतून चांगला नफा मिळणार आहे. नवीन गुंतवणुकीसाठी वेळ अतिशय अनुकूल असणार आहे. पण, गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या कोणत्याही हितचिंतकांचा सल्ला जरूर घ्या. परंतु, तुम्हाला या आठवड्यात उद्धटपणा टाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे. अन्यथा नफ्याऐवजी नुकसान होऊ शकतं. परीक्षा स्पर्धेत गुंतलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते. तुमचं वैवाहिक जीवन आनंदी होणार आहे.

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. या आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्यासाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील. यामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला कामाच्या संदर्भात लांब किंवा कमी अंतराचा प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचेही तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायात लाभाच्या संधी प्राप्त होतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani 2024 : शनीवर पडली सूर्याची शुभ दृष्टी; 16 सप्टेंबरपासून 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, सुख-संपत्तीत होणार अमाप वाढ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat On Chandiwal : 'चांदीवाल ते सचिन वाझे' गौप्यस्फोटांवर शिरसाट यांची प्रतिक्रियाVidhan Sabha Manchar Reaction : सख्ख्या भावांनी आम्हाला रडवलं मंचरकरांचा मूड कुणाच्या बाजूने?Chitra Wagh Akola On Supriya Sule : बारामतीच्या ताईंनी आपल्या अडाणीपणाचे प्रदर्शन नाही केलं पाहिजेDeepak Nikalje : छोटा राजनचे बंधू विधानसभेच्या मैदानात भिडणार शिंदे-ठाकरेंच्या उमेदवाराला !

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
Nana Patole on Devendra Fadnavis : आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
Donald Trump : दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
Embed widget